


चव्हाणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

चव्हाणवाडी (तालुका आजरा) येथील पांडुरंग बाळू यादव उर्फ हजाम (वय ७७) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. याबाबत सयाजी पांडुरंग यादव यांनी पोलीसात वर्दी दिली. यादव यांची गट नंबर ३६५ मध्ये जमीन आहे या शेतात विहीर आहे. या ठिकाणी त्यांनी जनावरे पाळली आहेत.
पांडुरंग हे जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीत उतरले. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. तासाभरानी त्यांची सून शेताकडे आली होती. त्यांना सासरे दिसले नाहीत. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांची टोपी तरंगताना तर चप्पल काठावर दिसले .त्यानी ही माहिती आपल्या सांगितली. सयाजी यांनी नागरिकांच्या मदतीने गळ टाकून पाहिले असता वडील पांडुरंग यांचा मृतदेह आढळला.
या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.


बुधवारी होणार तालुका संघाची अध्यक्ष निवड
विठ्ठलराव देसाई यांचे नाव आघाडीवर
आजरा तालुका खरेदी विक्री संघाची अध्यक्ष निवड बुधवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सध्या तरी ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई यांचे नाव अध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये दिसत आहे. ज्येष्ठत्वाच्या निकषावर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार असल्याने अध्यक्ष पदासाठी देसाई यांच्याबरोबर महादेव हेब्बाळकर यांचेही नाव चर्चेत आहे. उपाध्यक्ष पदाची संधी उत्तुर भागाला मिळण्याची शक्यता असून गणपतराव सांगले हे या पदाचे दावेदार मानले जातात.
महादेव पाटील धामणेकर यांनीही अध्यक्षपदी आपली निवड व्हावी अशी मागणी केली आहे. पुढच्या टप्प्यात त्यांची निवड होण्याची शक्यताही वर्तवली जाते.





