शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२४


शिरसंगीत हत्ती…
पिकांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी तालुका आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घालत पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. विलास होडगे यांच्या ऊस पिकासह केळी व नारळाची झाडे यांचे मोठे नुकसाना हत्तीने केले आहे.
मसोली, कासार कांडगाव, शिरसंगी या भागात हत्तीकडून नुकसान सत्र सुरूच असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे.
ऐन सुगिच्या कालावधीत हत्तीचा उपद्रव सुरू झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.


आम. आबिटकर यांनी मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला
खानापूर मडीलगे येथे पदयात्रेत मान्यवरांचे गौरवोदगार

गारगोटी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक परिसरात काढलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावो-गावी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले तर महिलांनी आमदार प्रकाश आबिटकरांचे औक्षण करून आम्ही ही तुमच्या पाठीशी असल्याचे दर्शविले. यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, मडिलगे ही तालुक्याची उपराजधानी आहे. सुशिक्षीतांचे गाव म्हणून या गावची वेगळी ओळख आहे. या गावातील नागरीक सुजान विकासाला साथ देणारे आहेत. या गावातील मतदारांनी नेहमीच मला मोठी साथ दिली आहे. त्यामुळे यावेळी ही हा गाव माझ्या पाठीशी खंबिरपणे उभा राहील याची मला खात्री असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे म्हणाले की, आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून गावचा भगिरथ विकास झाला आहे. त्यामुळे या गावातून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळेल.
यावेळी बोलताना राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्ताजीराव उगले म्हणाले, विकासाच्या माध्यमातून आमदार आबिटकर यांनी मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलला असून राज्यामध्ये या मतदार संघाची एक विकसनशिल मतदार संघ म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ठ व अमोघ वाणीने आमदार आबिटकर यांनी राधानगरी मतदार संघाचा विधानसभेत ठसा उमटवलेला आहे. यावेळी काढलेल्या पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, सरपंच अनुराधा देसाई, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असो संचालक शिवाजीराव ढेंगे, उपसरपंच सुनील बिरंबोळे, अभिजीत देसाई, रामचंद्र सुर्वे, रणजीत ढेंगे, दत्तात्रय खाडे, बाळासो खतकर यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते.
यावेळी कलनाकवाडी येथील पदयात्रेत शरदराव निंबाळकर, संजय गाडेकर, आनंदराव पेडणेकर, शिवाजीराव पोवार, अनिल वारके, बबन निकम, विक्रम पोवार, चंद्रकांत गाडेकर मनोहर दबडे, मारुती पावले, बाळासाहेब मोरस्कर, निवृत्ती वारके, सखाराम पोवार, जयसिंगराव वारके आदींसह नागरीक सहभागी झाले होते
यावेळी खानापूर येथील पदयात्रेत भाजपाचे प्रविणसिंह सावंत, बाळासाहेब भोपळे, राजेंद्र पाटील, मानसिंग दबडे, अमर भोपळे, सरपंच शोभा गुरव, अमोल पाटील, अशोक वारके, युवराज नाईक, सुभाष गुरव, संदीप गुरव आदींसह नागरीक सहभागी झाले होते. मडिलगे खुर्द येथे काढलेल्या पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, बी. एस. खापरे, के. डी. आकोळकर, आर. डी. खापरे, दिनकर कल्याणकर, आर. एस. मांडे, एन. जी. खापरे, सुखदेव खापरे, नामदेव परीट, रणजित बिरंबोळे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते. गंगापूर येथे काढलेल्या पदयात्रेत आबासाहेब देसाई, शामराव राजीगरे, सरपंच सिमा कांबळे, दत्तात्रय पाटील, विनायक जाधव, तानाजी जाधव, अजित जाधव, भैरु गुरव, मारुती सुतार, जनार्दन पाटील, सुरेश किल्लेदार यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते.


गडहिंग्लज – हरळी बुद्रुकचा विकास साधणार : शिवाजीराव पाटील
भव्य मिरवणूक नागेश चौगले यांचा पाठिंबा

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांची शेकडो मतदारांनी भव्य मिरवणूक काढून शिवाजीराव पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला . गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक गावाला शिवाजीराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी हरळी बुद्रुक चा विकास साधणार असे आश्वासन शिवाजीराव पाटील यांनी दिले.
राजू ढवळे, भाऊ पाटील, अमित पाटील, दत्तात्रय येव्होले यांच्यासह हरळी बुद्रुक गावातील शेकडो मतदारांनी भव्य मिरवणूक काढल्यामुळे विजयाचे हात बळकट झाले असा आनंद शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. तर मतदारांनी कसल्याही अमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये आणि पाण्याची टाकी या चिन्हावरच समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले.
चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे येथे झालेल्या भव्य मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, आजरा तालुका अध्यक्ष आनंदा घंटे यांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील याना जाहीर पाठींबा दिला. तर २० नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे विजयी करू असा आत्मविश्वासही व्यक्त केला. तर उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड हा भाग विकसित मतदार संघ होणार असल्याचे ठामपणे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा शाखेने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले.त्याचबरोबर मनसेची सर्व कामे पूर्ण करण्यास सदैव सिद्ध असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले.
निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आहोत. भेदभाव सोडून शिवाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्याची नितांत गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शिवाजीराव पाटील यांचा विजय होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष कामगार सेना विवेक पाटील. सचिव तुकाराम पाटील, गडहिंग्लज तालुका महिला अध्यक्ष शितल पाटील, गडहिंग्लज शहर अध्यक्ष केंप्पांना कोरी, शहर अध्यक्षा रीमा चव्हाण , गडहिंग्लज मनसे विद्यार्थी सेनेचे प्रभात साबळे, तसेच अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील हे उपस्थित होते.

सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार संघटनाच्या वतीने आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद कागल विधान सभेचे उमेदवार समरजीत घाटगे व राधानगरी विधान सभेचे उमेदवार के. पी. पाटील यांनी आजरा येथील गिरणीकामगार ऑफिस मध्ये भेट दिली.
यावेळी बोलताना के. पी. पाटील यांनी गिरणीकामगाराना मंबईत घरे मिळण्याबाबत गिरणीकामगारांसोबत राहण्याची हमी दिली. पेन्शनरांचा प्रश्न गाव पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा व जनते सोबत सातत्याने राहणार असलेचे सांगितले. समरजीत घाटगे यांनी गिरणीकामगार व पेन्शनरांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो असून जनतेचा सेवक म्हणून तुम्हचे प्रश्न आरोग्य शिक्षण व उद्योग या विकासला चालना देण्यासाठी मला आशिर्वाद द्यावे असे आवाहन केले. यावेळी कॉ. शांताराम पाटील, धोडिबा कुंभार, काशिनाथ मोरे अभिषेक शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गोपाळ गावडे, नारायण राणे, मुकूंद देसाई उदय पवार संजय सावंत हिंदूराव कांबळे, महादेव होडगे, आबा पाटील, जानबा धडाम, दौलती राणे,भिवा गुरव पद्मिनी पिळणकर याच्या सह गिरणी कामगार उपस्थित होते आभार संजय घाटगे यांनी मानले.


आजरा- हात्तीवडे मार्गे पुणे एसटी सुरु

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगाराकडून आजरा- हात्तीवडे मार्गावर पुणे (स्वारगेट) एस.टी.ची फेरी सुरु करण्यात आली आहे.
पूर्व भागातील प्रवाशातून याबाबत समाधान व्यक्त होत आहे. आजऱ्यातून सकाळी ७ वाजता एस.टी. सुटणार आहे. दुपारपर्यंत एस.टी. पुण्यात पोहचणार आहे. पुणे येथून सायंकाळी ४ वाजता एस.टी. सुटेल. कोल्हापुर, गडहिंग्लज, महागाव, हात्तीवडे मार्ग आजऱ्याला एस.टी. येईल. पुणे व परिसरात नोकरी व्यवसायासाठी वास्तव्यास असणाऱ्या आजऱ्याच्या पूर्व भागातील नागरीक, विद्यार्थांना याचा फायदा होणार आहे.

बातमीचा इफेक्ट…

‘मृत्युंजय महान्यूज’ च्या माध्यमातून कासारकांडगाव ते चितळे मार्गावरील गतवर्षी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने बातमीची दखल घेत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून घेतली आहे.

निधन वार्ता
अशोक खोपडे

सोमवार पेठ,आजरा येथील श्री. अशोक खोपडे (खोपडे मामा/वय ६८ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. अंत्यविधी आज शुक्रवार दि.८ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहेत.
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



