mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४

‘त्या’ अत्याचार प्रकरणी एकजण गजाआड


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भाऊबीजेनिमित्त गडहिंग्लज तालुक्यातून आजरा तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात मामाच्या गावी आईसोबत आलेल्या ४३ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचाराची घटना भाऊबीजेदिवशी घडली होती.

     या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत घटना घडलेल्या संबंधित गावातील ४७ वर्षीय व्यक्तीस ताब्यात घेऊन अटक केली. आजरा न्यायालयासमोर त्याला हजर केले असता संबंधितास शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ढोंगी लोकांचा जनताच कार्यक्रम करेल : शिवाजीराव पाटील


         चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      केवळ निवडणुकीपुरते येऊन मताचा जोगवा मागणारे खूप आहेत पण मी गेली पाच वर्षे सातत्याने तुमच्या सेवेत आहे. त्यामुळे सोंगी-ढोंगी लोकांचा जनता थेट कार्यक्रम करेल असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी केले. ते विविध गावच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते.

      पाटील म्हणाले, आरोग्य शिबिर रोजगार मेळावे, महिलांसाठी मेळावे यासारख्या कार्यक्रमातून सातत्याने चंदगड आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांच्या संपर्कात आहे. कोणतीही संस्था पाठीशी नसताना सर्वसामान्यांच्या जीवावर निवडणुकीला सामोरे जात आहे. तुमची ताकद हीच माझी शक्ती आहे, तुमच्या सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तीनही तालुक्यातील विविध एमआयडीसीमध्ये विविध उद्योग आणणे, पर्यटन विकास वाढीस चालना देणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

      यावेळी त्यांच्यासोबत भीमा कांबळे, जयवंत कांबळे, सुजय जाधव, रमेश कूड, संजय देसाई, चंदू कांबळे प्रकाश कांबळे, भाऊसाहेब देसाई, विठ्ठल जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

युवती बेपत्ता


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बहिरेवाडी ता. आजरा येथून २३ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची वर्दी संबंधित युवतीच्या पालकांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

अखेर जी. एम. पाटील, दत्ता पाटील के.पी.पाटील यांच्यासोबत...

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा सूतगिरणीचे संचालक व देवर्डे चे माजी सरपंच जी. एम. पाटील,कोरीवडे चे माजी उपसरपंच दत्ता पाटील,लाटगावचे सुधीर सुपल यांच्यासह पश्चिम भागातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

    जी. एम. पाटील व दत्ता पाटील यांच्या भूमिकेकडे पश्चिम विभागाचे लक्ष लागून होते.

     यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राहुल देसाई मुकुंदराव देसाई, माजी सभापती उदय पवार, अभिषेक शिंपी, राजू होलम, डी.ए. पाटील, संभाजी पाटील, संजयभाऊ सावंत, संकेत सावंत ,रवी भाटले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ : महायुतीच्या नेत्यांचा सहभाग


          गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आमदार राजेश पाटील यांच्या प्रचाराचा दिमाखात शुभारंभ झाला. भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, हेमंतदादा कोलेकर, शिवसेना नेते राजू मांगले, आणि संजय संकपाळ यांच्यासह महायुतीच्या अनेक मान्यवरांचा या शुभारंभात सहभाग होता. 

       यावेळी संग्रामसिंह कुपेकर म्हणाले,
चंदगड विधानसभा मतदारसंघ चुकीच्या दिशेला जाऊ नये, चुकीची संस्कृती रुजू नये व युती धर्म पाळण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी आहे.संजय संकपाळ म्हणाले,महायुती धर्म पाळून सर्वांनी एकत्रित येऊन महायुतीचे सरकार येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करूया आणि राजेश पाटील यांना विजयी करुया.यावेळी राजू मांगले,भरमाण्णा गावडा प्रकाश चव्हाण यांचीही भाषणे झाली

        आमदार राजेश पाटील म्हणाले, स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या विचारांचे खरे वारसदार हे संग्रामसिंह आहेत हे त्यांनी दाखवून दिले.आपण सर्वांनी सुचवलेली कामे आ.एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार,मंत्री मुश्रीफ यांनी पूर्ण केली आहेत. आता त्याची उतराई करण्याची वेळ आली आहे. भागातील प्रत्येक चुलीपर्यंत जाऊन केलेली विकास कामे पोहोचवा. युतीधर्म पाळून महायुतीचा विजयी पताका फडकवुया.

       प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केली.
आभार विकी कोणकेरी यांनी मानले.

यावेळी, रामाप्पा करिगार रा.काँग्रेस चंदगड विधानसभा अध्यक्ष ( अजित पवार गट ),बाबासाहेब पाटील मुगळीकर रा.काँग्रेस गड.ता.अध्यक्ष, रा.काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, एम.के.देसाई ( आजरा कारखाना व्हा. चेअरमन), राजू मुरुकटे ( आजरा कारखाना संचालक ), अनिल फडके ( आजरा कारखाना संचालक ), संभाजीराव पाटील (आजरा कारखाना संचालक ), प्रकाश देसाई, अभय देसाई, जयकुमार मुन्नोळी, विकी कोणकेरी, बाबुराव चौगुले, आर.एस.पाटील, महाबळेश्वर चौगुले, अल्बर्ट डिसोजा, नांदवडेकर सर, प्रवीण शिंदे, रवींद्र चरकदावर, सुदर्शन बाबर (चंदगड विधानसभा युवासेना प्रमुख ), सागर मांजरे ( ता. शिवसेना संपर्कप्रमुख ), निखिल पाटील, लक्ष्मण तोडकर, तानाजी भोसले, प्रदीप कडुकर, सोमनाथ घेजी, शिवानंद देसाई, रवी शेंडुरे, सचिन पवार, अजित जाधव, शेखर कडलगे, दीपक पुजारी, तात्यासो देसाई, लोहित पाटील, शुक्राचार्य चोथे, भरत झळके, विनोद मोकाशी, बी.जी.स्वामी, सुरेश धनवडे, पी.के.पाटील, निखिल शिरकोळे, सुरेश पाटील मुगळीकर, अशोक महाडिक, सिद्धनाथ महाडिक, अर्जुन थोरात, उमाकांत चव्हाण, राजू लुगडे, बंडोपंत मोरबाळे, विठ्ठल कुंभार, बाळू कुंभार, दयानंद तोडकर, सदा सावंत, सुदर्शन बाबर, सुनील आरबोळे, भरत पाटील, वैभव पाटील, गणेश सुतार, संगम गुरव, राजेंद्र चौगुले, सुजित पाटील, सोम पाटील, बी.एस.पाटील ( तनवडी ), सुनील पाटील, अन्वर कलावंत, मनोज शिरूर, संतोष पाटील, वसंत चौगुले, सागर शिंदे, हिरा कोळी, बसवान्नी कोळी, रामचंद्र गवळी, कल्लाप्पा गडकरी, सुबराव सोलापुरे, शंकर पुजारी, नरसिंग माळी, बाळासाहेब मूर्ती, संजय कागिनकर, आप्पासाहेब हुलि, विनोद आरबोळे, प्रवीण पाटील, लगमाण्णा जैन, सुजित देवण्णावर, पप्पू पाटील, दत्ता जाधव, राजू कलगुटगी, तुकाराम नाईक, संतोष नाईक, सदाशिव खोरे, नेताजी कलगुटगी, अरुण लाटकर ( स. दुंडगे ), संजू पाटील, सुरेश लाटकर, दानगोंडा नाडगोंडा, नारायण पाटील, रामलिंग दुध्यागोळ, प्रसाद जोशी, शिवकुमार संसुदी, सुरेश कुरबेट्टे, रवी यरकदावर, रमेश कलगोंडा, दयानंद देसाई ( स.बुगडीकुट्टी ), हनुमंत कानडे, अजित सावंत, सर्जेराव झुरळे, तुकाराम नाईक, सुरेश गुलगुंजी, विक्रम कुपेकर, अमर पाटील, सचिन भोई, संजय अंबी, शिवगोंडा पाटील, बसगोंडा पाटील, अमर पाटील, नाना पाटील, दत्ता पाटील, काशिनाथ संकपाळ, सुरेश गुलगुंजी, शकील सनदी, सचिन पोवार, बाळू रा.शिंदे, विनोद मोकाशी आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

के.पी.साहेब तुमच्या काळातील  विकास कामे सांगा आणि मगच मते मागा – आमदार प्रकाश आबिटकर

राधानगरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

    के.पी.साहेब आपल्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात केलेली फक्त १० विकास कामे सांगा आणि मगच मते मागायला या, असे जाहीर आव्हान आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. ते तुरंबे (ता.राधानगरी) येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी  बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडीक होते. तर प्रमुख उपस्थितीत गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, आण्णाभाऊ उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी, जेष्ठनेते के.जी.नांदेकर, प्रा.जालिंदर पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, तुमच्या निष्क्रियतेमुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सलग दोन वेळा जनतेने निवडून दिले. लोकांच्या मनातील असलेल्या विकासाच्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी अहोरात्र झटतोय. पण आपण १० वर्षाच्या काळात केलेली १० विकासकामे आठवून सांगा अन्यथा आपणास मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. राधानगरी मतदार संघातील जनता अनेकवर्ष विकासापासून दूर होती. गेल्या १० वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावली आहे. अजून अनेक कामे पूर्ण करावयाची असून भविष्यात राज्यातील प्रगत मतदारसंघ म्हणून राधानगरीची ओळख निर्माण करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन आम.आबिटकर यांनी केले.

     यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडीक म्हणाले की, राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास झालेला आहे. दुसरीकडे मात्र लबाडीचे राजकारण करून लोकांना फसविण्याचा उद्योग सुरू आहे. विस्ताराने प्रचंड मोठा असलेल्या या मतदार संघातील ३५० हून अधिक गावांचा परिपुर्ण विकास साधण्याचे काम आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून झालेले आहे. चाळीस वर्षात पाण्याच्या कलशाचे का पुजन झाले नाही ? असाही त्यांनी सवाल यावेळी उपस्थित केला. आमदार आबिटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाकडे आमदार म्हणून परिचीत आहेत. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. म्हणूनच राधानगरी मतदार संघात रस्ते, आरोग्य, पाणी, विज, लघु प्रकल्प यासारखे रखडलेल्या प्रश्नांसाठी केवळ २ वर्षाच्या कालावधीत हजारो कोटी रुपयांचा निधी आणणारा जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून आमदार आबिटकर यांचा उल्लेख करावा लागेल. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लाऊन काम करणाऱ्या माणसाला राधानगरी मतदार संघातील जनता एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     यावेळी बोलताना आण्णाभाऊ संस्था समुहाचे अशोक चराटी, प्रा.जालिंदर पाटील, आरपीआय राज्य सरचिटणीस प्रा.शहाजी कांबळे,सह्याद्री साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब नवणे आदींची भाषणे झाली.

     गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, नंदकिशोर सुर्यवंशी-सरकार, दत्तात्रय उगले, अरुणराव जाधव, कल्याणराव निकम, सुर्याजीराव देसाई, मदनदादा देसाई, निवासराव देसाई, विलास रणदिवे, तानाजीराव चौगले, वंदनाताई जाधव, प्रविणसिंह सावंत, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, डॉ.सुभाष जाधव, रंगराव मगदूम, संभाजीराव आरडे, संदीप मगदूम, गोविंदराव चौगले, जी.डी.पाटील, व्ही.टी.जाधव सर, रंगराव पाटील, ॲड.प्रशांत भावके, दिपक शेट्टी, संग्रामसिंह पाटील, संग्रामसिंह कडव, विजयराव बलुगडे, दौलतराव जाधव, विजय महाडीक, चंद्रशेखर पाटील, मानसिंग पाटील, संदीप वरंडेकर, सुभाष चौगले, विलास पाटील, विलास नाईक, दशरथ अमृते, विजयसिंह पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत विजय बलुगडे यांनी केले तर आभार अशोकराव फराकटे यांनी मानले.


लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 


 

 

संबंधित पोस्ट

डासांसाठी केलेल्या धूमीत पाच म्हैशिंसह शेळ्या व कोंबड्यांचा गुदमरून मृत्यू….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!