mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४

रवींद्र आपटे यांचे निधन…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जिल्हा दूध संघाचे (गोकूळ) माजी अध्यक्ष व महानंद दूध डेअरी चे माजी उपाध्यक्ष श्री. रवींद्र पांडुरंग आपटे यांचे कर्करोगाने काल मंगळवारी रात्री उशिरा कोल्हापूर येथे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७१ वर्षे होते.

      गोकुळच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आजरा तालुक्यामध्ये दूध संस्थांच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. एम.एस. सी.(ॲग्री) शिक्षण घेतलेले आपटे हे दूध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. अनेक तरुणांना विना मोबदला रोजगार त्यांनी मिळवून दिला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे.

      आज बुधवारी दुपारी बारा वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महिलांचा सर्वांगीण विकास हे माझे ध्येय – शिवाजीराव पाटील.
शिवाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्याचा निर्धार


           चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा.

      बेरोजगारांसाठी रोजगार देणे , महिलांचा सर्वांगीण विकास साधणे हे माझे मुख्य ध्येय असून केवळ मागासवर्गीयच नव्हे तर संपूर्ण चंदगड, आजरा व गडहिंग्लज मतदार संघातील बंधू- भगिनींना स्वावलंबी बनविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासन उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी इनाम सावर्डे येथे आयोजित भव्य मेळाव्यामध्ये बोलताना दिले.माजी रो.ह.यो. मंत्री भरमूअण्णा पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

      यावेळी मेळाव्याला गोकुळ दूध संघाचे संचालक नामदेव कांबळे, श्रीकांत नेवगे, बबनराव देसाई, प्रगतशील शेतकरी डॉ.सदानंद गावडे, लक्ष्मण गावडे, सिताराम रामू कांबळे, रामदास नामदेव कांबळे, प्रकाश गुंडू कांबळे, दत्तू झीलू कांबळे, (पाटणे) संदीप गोपाळ पाटणेकर, शिवाजी बागवे, वसंत रामू कांबळे, तानाजी पवार, सरपंच विंझणे, मायाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

      यावेळी बोलताना पुढे शिवाजीराव पाटील म्हणाले, चंदगड, आजरा मतदारसंघाचा या मतदार संघाचा विकास करण्यासाठी जीवाचे रान करणार असून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

      या मेळाव्याला या भागातील मतदार बंधू व भगिनी उपस्थित होत्या.

रामाच्या विहिरीची स्वच्छता सुरू

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       येथील रामदेव गल्लीमधे रामाच्या विहीरीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी गटारीचे बांधकाम नगरपंचायतीने सुरु केले आहे.

      गटारीची गळती काढून तिचे मजबुतीकरण व जाणार आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून युध्दपातळीवर कार्यवाही सुरु झाली आहे.

     येथील रामदेव गल्लीमध्ये श्रीरामाच्या मंदिरासमोरील रामाची विहीर आहे. गल्ली, कुंभार गल्ली, वाडा गल्ली येथील नागरीक या पाण्याचा वापर करतात. या विहीरीमध्ये गटारीचे सांडपाणी झिरपून विहिरीच्या पाण्यात होते. विहीरीचे पाणी दूषित होऊन जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता होती. नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला होता. नागरीकांनी नगरपंचायतीला निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. नगरपंचायतीसमोर विहीर असून देखील कामाचा उरक होण्यास विलंब होत होता. नागरीकांच्या भावना लक्षात घेवून ट्रॅक्टरचे ब्रेकर व मजूर उपलब्ध करुन काम सुरु करण्यात आला आहे. गटारीमध्ये स्लॅब टाकला जाणार असून सिमेंट क्रॅक्रीटीकरण करून गटार मजबूत केली जाणार आहे. जेणेकरून कुठेही गळती होणार नाही याबाबतदक्षता घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी  आजरा आगारात ‘प्रवासी राजा दिन ‘ व कामगार पालक दिन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        शुक्रवार दि.८ रोजी आजरा आगारात ‘प्रवासी राजा दिन” व कामगार पालक दिन”
साजरा करणेत येणार आहे. प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करणेसाठी सदर उपक्रम राबवणेत येणार आहे.

      आजरा आगारात सकाळी १० ते.दु.२ पर्यंत प्रवाशांच्या लेखी तकारी स्विकारल्या जातील व त्यावरील उपाययोजनाबाबत मा. विभाग नियंत्रकसो आदेश देतील.

      दुपारच्या सत्रात दुपारी ३ ते ५ या वेळेत आगारातील एसटी कर्मचा-यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकुन घेवून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रवाशी व कर्मचा-यांनी आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरुपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात देणेत याव्यात असे आवाहन करणेत आले आहे.

दीपक हरणे यांची निवड


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुका जिल्हा परिषद कर्मचारी सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दीपक रामचंद्र हरणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालकांच्या विशेष बैठकीत सदर निवड झाली.सहकार विभागाचे जे.एन. बंडगर बैठकीच्या अध्यक्षपदी होते.

       या बैठकीस संचालक शांताराम माने, राजेंद्र सांगावे, रणजीत डोंगरे, मोतीराम बारदेसकर, लिंगेश्वर पापरकर, अनिल वंजारे, सौ. कविता जाधव, श्रीमती कल्पना बंडगर, श्रीमती गीता माजगावकर, सौ. माधुरी बुगडे, सचिव आर.डी. माने,डी.ए. सासुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे अप्पी पाटील मैदानात…

           महागाव : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

    चंदगड विधानसभा मतदार संघातील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार अप्पी उर्फ विनायक पाटील यांच्या उमेदवारी मुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्ते सोबत आल्याने त्यांना बळ मिळाले आहे.

    लोकसभा निवडणुकीपूर्वी चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संविधान बचाव रॅली सुरू केली. त्यामुळे तिन्ही तालुक्यात महत्वाचे नेते सोबत नसतानाही काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांना मताधिक्य मिळाले.

      संविधान बचावाच्या निमित्ताने एकत्र आलेली महाविकास आघाडी एकसंघपणे लढली. त्यानंतर विधानसभेकरिता यातील काही मंडळींनी एकत्र येऊन शाहू समविचारी आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या वतीने अप्पी उर्फ विनायक पाटील यांना उमेदवारी जाहीर करून एकसंघपणे या निवडणुकीत उतरून  अप्पी पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.समविचारी आघाडीत विविध  पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आघाडीवर आहेत.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अपघातात एक ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!