mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मगळवार  दिनांक ५ नोव्हेंबर २०२४

वेदना असह्य झाल्या ‌..
स्वतःची चिता स्वतःच रचून वृद्धाची आत्महत्या…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       चिमणे ता आजरा  येथील चंद्रकात धोंडीबा मोरे या ७३ वर्षीय वृद्धाने कर्करोगाच्या वेदना सहन न झाल्याने खोरीचे डाग नावाच्या शेतात घराजवळील लाकडांची स्वतः च चिता रचून आग लावून स्वतःला पेटवून घेतले. यातच त्यांचा मृत्यू झाला.याबाबत आजरा पोलिसांत विजय चंद्रकात मोरे वय – ४५ . रा चिमणे . ता . आजरा यांनी वर्दी दिली .

     अधिक माहिती अशी , चंद्रकांत मोरे हे खोरीचे डाग नावाच्या शेतातील घरात एकटेच राहत होते . त्यांचे वर जबड्याच्या कॅन्सरचची शस्त्रक्रिया मुंबई येथे झाली होती . गेली महिनाभर शेतातील घरात राहत होते .त्याना वेदना व त्रास होता .

      सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास शेताकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना मोरे यांच्या शेताजवळ लाकडे पेटून धूर येताना दिसला. लाकडाच्या ढीगाच्या बाजूला बुट व काठी होती अशी माहिती शेतकऱ्यांनी मुलगा विजय यास दिली. विजय हा गावातून शेताकडे आला असता लाकडाच्या ढीगा जवळ वडीलांचा मृतदेह असल्याचे दिसून आले . मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता .
चंद्रकांत मोरे यांच्या शेतातील घरा समोर लाकडाचा मोठा ढीग होता . त्या लाकडाच्या ढीगावर चटई व गादी ठेवून त्या लाकडाच्या ढीगाला आग लावून स्वतः पेटवून घेतले . त्यांच्या पश्चात दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे .
     दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नागेश यमगर हवालदार सुर्दशन कांबळे , सुधाकर हुले भेट देवून जागेवरच पंचनामा करून उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी जगेवरच शवविच्छेदन केले आले .

आजऱ्यात १२ नगरसेवकांचा आबिटकर यांना पाठिंबा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा शहरातील १२ माजी नगरसेवकांनी व मुस्लिम समाजातील कांही प्रमुख गटांनी आम.प्रकाश आबिटकर यांना पत्रकार बैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.

        यावेळी बोलतांना विलास नाईक म्हणाले, आबिटकर यांनी विकासाची गंगा आणली आहे. नगरपंचायतीची मंजूरी आणली.आजरा शहरामध्ये जो विकास झाला आहे त्यात मोठे योगदान आबिटकर यांचे आहे.

       अशोक चराटी म्हणाले,अडीच वर्षांत आम.आबिटकर यांनी १०० कोटीचा निधी आणला आहे.२० कोटींची कामे आचारसंहितेनंतर सुरु होतील.शहरातून ५ हजार चे मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपण आबिटकर यांना आमदार करूया ते निश्चित नामदार होतील असेही त्यांनी सांगितले.

       प्रा.अर्जुन आबिटकर म्हणाले,काम केल्याची पोहचपावती मतदानातून मतदार निश्चित देतील.मुस्लिम समाजासह वेगवेगळे गट आज पाठिंबा देत आहेत त्यामुळे विजयाची चिंता नाही. पुढील काळात विरोधक अफवा पसरवतील, दिशाभूल करतील, त्याकडे लक्ष देवू नका असे आवाहन त्यांनी केले.

      यावेळी अमानुल्ला आगलावे, विजयकुमार पाटील यांनीही मत व्यक्त केले.

    पत्रकार बैठकीस माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, आनंदा कुंभार, बाळ केसरकर, शकुंतला सलामवाडे, शुभदा जोशी, अतिश कुमार देसाई,समीर पारधे, एम.डी. दरवाजकर, दिलावर चॉंद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्ही विकास कामांच्या पाठीशी : सुमैय्या खेडेकर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या पाच वर्षात भरीव अशी विकास कामे केली आहेत. विकासाचा व्यापक दृष्टिकोन त्यांच्याकडे असल्यामुळे भविष्यातही शहराला घसघशीत निधी मिळवून देण्यात ते कदापिही मागे पडणार नाही याची खात्री असल्याने आपण या विधानसभा निवडणुकीत आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे
माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर व रेश्मा सोनेखान यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट करत आबिटकर यांना पाठिंबा जाहीर केला.

       यावेळी सुमैय्या खेडेकर म्हणाल्या, शहराचा विकास आबिटकर यांच्यामुळे झाला. गटतट, जातपात न पहाता त्यांनी विकासकामे केली आहेत. कामाची व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी रहात आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       यावेळी पत्रकार बैठकीस असिफ पटेल,, इम्रान सोनेखान, नवीज खेडेकर, वदूत तकीलदार, जुबेर माणगावकर, अष्कर लष्करे, रमीज लमतुरे, अमजद माणगावकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाल्या सुमैया खेडेकर पहा लाईव्ह👇

 

जे. पी. नाईक पतसंस्थेमध्ये दिपावली पाडव्याला ८७ लाखांच्या ठेवी जमा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       येथील शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये दिपावती पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्य कार्यालय ७० लाख, शाखा गडहिंग्लज ९ साथख व कोल्हापूर शाखा ८ लाख असे एकुण ८७ लाखांच्या ठेवी जमा झाल्या. स्वच्छ कारभार, आकर्षक व्याजदर, ठेवीदारांचा विश्वास आणि तत्पर सेवा यामुळेच ठेवीदारांनी ठेवी ठेवले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे थांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष सुभाष विभुते, सर्व संचालक, जनरल मॅनेजर संतोष जाधव व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी २१ लाख ४३ हजार १५० रुपये ठेवींचे संकलन


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या., आजरा संस्थेमध्ये गुढीपाढव्यानिमित्त ७ शाखांमध्ये मिळून तब्बल १ कोटी २१ लाख ४३ हजार १५० रु इतक्या ठेवींचे संकलन झाले, अशी माहिती जनता सह गृहतारण संस्थेचे अध्यक्ष श्री. मारुती मोरे यांनी दिले.

      श्री. मारुती मोरे म्हणाले, शाखा आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली, पाटणे फाटा (ता. चंदगड) या शाखेमधून वरीलप्रमाणे ठेवी जमा झाल्या असुन याकामी संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखांचे संचालक मंडळ व मुख्य कार्यालय अधिकारी, सर्व शाखांचे शाखाधिकारी व स्टाफ यांनी विशेष प्रयत्न करुन ठेवीचे संकलन केले. याबददल संस्थेचे चेअरमन मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू ; आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील घटना…कोळींद्रे येथून एकजण बेपत्ता.

mrityunjay mahanews

डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!