mrityunjaymahanews
अन्य

Breaking News

 

 


आजरा साखर कारखाना अध्यक्षपदी वसंतराव धुरे एम.के. देसाई उपाध्यक्ष


                      आजरा:प्रतिनिधी

        आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव धुरे यांची तर उपाध्यक्षपदी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष एम. के. देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

        निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज कारखाना कार्यस्थळी पार पडली. निवडीपूर्वी सर्व उमेदवारांच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात आलेल्या व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि प्रमुखांनी दिलेला बंद लखोटा खोलण्यात आला. यावेळी नेते मंडळींनी सुरुवातीला अध्यक्ष म्हणून वसंतराव धुरे व उपाध्यक्ष म्हणून एम. के. देसाई यांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार धुरे व देसाई यांची निवड करण्यात आली.

        धुरे यांनी यापूर्वीही अध्यक्षपदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. त्यांना अध्यक्षपदाचा अनुभव आहे, तर देसाई हे कारखान्यातील ज्येष्ठ संचालक आहेत. या दोघांना संधी देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नही नेते मंडळींनी केल्याचे स्पष्ट होत आहे. या बैठकीपूर्वी कारखान्याच्या सर्व संचालकांना चाळोबा देव येथे फेटे बांधून एकत्रित रित्या बैठक स्थळी आणण्यात आले.

        कारखाना सद्यस्थितीला अडचणीत असला तरीही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसर पारदर्शक पद्धतीने कारखान्याचा कारभार केला जाईल. कर्जमुक्तीच्या दिशेने आवश्यक ते प्रयत्नही केले जातील असे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी सांगितले.

       यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई ,संग्रामसिंह कुपेकर, दिगंबर देसाई, शिरीष देसाई, नामदेव नार्वेकर, संभाजी तांबेकर, देवदास बोलके, जनार्दन बामणे, राजू होलम, विक्रम देसाई, गणपतराव सांगले,राजेंद्र देसाई, संचालक संभाजी पाटील, अशोक तर्डेकर, रशिद पठाण, निसार दरवाजकर, यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांच्यासह अधिकारी वर्ग, नूतन संचालकांचे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अन्यथा नगरपंचायतीच्या दारात कचरा टाकणार

नागरिकांचा बैठकीत इशारा, महिन्यात अंमलबजावणी करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

                   आजरा: प्रतिनिधी

        येथील सोमवार पेठेतील स्मशानशेडजवळ स्वच्छतेचा अभाव असून, गांधीनगरमधील कचऱ्यामुळे प्रदूषण होत आहे. कचरा आवंडी- मसोली मार्गावरील कचरा डेपोत न टाकल्यास नगरपंचायतीच्या दारात कचरा टाकण्याचा इशारा आजरा शहरवासीय अन्याय निवारण संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

        या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांशी व प्रमुख मंडळींची बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी कार्यकत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

       नगरपंचायत गांधीनगर येथे कचरा टाकत आहे. प्रदूषण होत असल्याने जनावरांना त्रास होत आहे. त्यामुळे कचरा डेपोत टाकण्याची पूर्तता कधी करणार, तसेच सोमवार पेठेतील स्मशानभूमीत स्वच्छतेचा अभाव आहे. बांधकामामुळे साहित्य विखुरलेले आहे. याची पूर्तता कधी करणार, असा सवाल निवारण संघाचे अध्यक्ष परशुराम बामणे, सदस्य गौरव देशपांडे यांनी केला. यावेळी आवंडी वसाहत व गांधीनगर वसाहतीमधील अमोल गावडे, अंकुश चौगले आदी नागरिकांनीही याबाबत जोर लावला.

        ग्रामीण रुग्णालय ते आवंडी वसाहतीपर्यंत नुकताच डांबरी रस्ता केला आहे. खडी उखडत असल्याने डांबरीकरण केलेला रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आणून दिले. कचरा, स्वच्छता व आवंडी रस्ता याबाबत महिनाभरात अंमलबजावणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

        यावेळी अमोल गावडे, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजरेकर, संजय पाटील, अमोल गावडे, महंमद दरवाजकर, संतोष चौगुले, अंकुश चौगुले, अमित येसादे यांच्यासह आवंडी व गांधीनगर वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.


छत्रपती युवा ग्रुपच्या अध्यक्षपदी सूरज रक्ताडे, उपाध्यक्षपदी अनिकेत आमणगी

                  आजरा: प्रतिनिधी

        उत्तूर येथील राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित छत्रपती युवा ग्रुपच्या अध्यक्षपदी सूरज रक्ताडे, उपाध्यक्षपदी अनिकेत आमणगी यांची निवड झाली. २०२४ मध्ये होणाऱ्या संयुक्त शिवजयंती सोहळा कार्यकारिणीच्या निवडीसाठी मंडळाची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय झाला, बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक योगेश भाईगडे होते.

       खजिनदारपदी आनंदा जावळे, सचिवपदी आकारा पोरलेकर, संपर्कप्रमुखपदी रोहन केसरकर व बातमीदारपदी आयुश जवाहिरे यांची निवड झाली. अभिजित सावंत यांनी स्वागत केले.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची माहिती

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चितळे येथे गोवा बनावटीचा ३५ हजारांचा दारुसाठा जप्त

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!