

निधी नसेल तर आमची मंगळसूत्रे घ्या… वर्गणीही काढतो… पैसे देतो…पण हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करा… आजरा मनसेच्या महिलाही आक्रमक...

निधी नसेल तर आमची मंगळसूत्रे घ्या. वर्गणीही काढतो व पैसे देतो पण मार्ग खड्डेमुक्त करा असे आवाहन करत आजरा मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली तर महिलांनी चक्क गळ्यातील मंगळसूत्रे काढून अधिकाऱ्यांसमोर ठेवली या प्रकारामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
व्हीक्टोरिया पुलावर केलेल्या खुदाई प्रकरणी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत तातडीने खड्डे बुजवा असे आवाहनही केले होते. परंतु याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी न घेतल्याने आज मनसेने आक्रमक होत मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल तासभर सदर आंदोलन सुरू होते . गोवा व कर्नाटक राज्याला जोडणारा रस्ता असून या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.मुजोर अधिकाऱ्यांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे असे मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यावेळी म्हणाले.
उपतालुका प्रमुख आनंदा घंटे म्हणाले, बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची डागडुजी करणे अवघड झाले आहे. त्यातच मोबाईल कंपन्यांनी खुदाई करून संपूर्ण पुलाचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. तर प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनीही प्रशासनाचा निषेध करत आपले मत व्यक्त केले व आंदोलनाला पाठिंबा दिला.
. यावेळी उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, ता. सचिव चंद्रकांत साबरेकर, आजरा शहरप्रमुख कुमार कांबळे, ता. उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, महिला आघाडी तेजस्वीनी देसाई, सह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

आजरा कारखान्यावर ‘साखर कारखानदारी व कामगार’ या विषयावर वसंत भोसले यांचे व्याख्यान
आजरा साखर कारखान्यास आर्थिक सहकार्य केलेल्या पत संस्था, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, कारखाना अधिकारी व कर्मचारी वर्ग, मालपुरवठादार, कंत्राटदार इत्यांदीनी मोलाचे सहकार्या केलेमुळेच हंगाम यशस्वीरित्या पार पाडला.
पुढील काळात म्हणजेच हंगाम 2022-23 मध्ये कारखाना पुर्ण क्षमतेने चालावा या उददीष्ठाने कार्यक्षेत्रात जादा ऊसाचे उत्पादन होवून कारखान्यास कार्यक्षेत्रातुन जादा ऊस गळीतास यावा यासाठी शेतकरी वर्गात उत्साह निर्माण होवून भागात ऊसाचे उत्पादनास चालना मिळावी यासाठी शेतकरी मेळावे घेवून शेतक-यांना कमी क्षेत्रात जादा ऊस उत्पादन करणेस प्रवृत्त केले. साखर कारखान्याकडे गाळप हंगाम 2021-22 मध्ये प्रत्येक शेती गट क्षेत्रातुन सर्वात जास्त ऊस पुरवठा केलेले शेतकरी तसेच सर्वात जास्त ऊस पुरवठादारांचा व जादा ऊस तोडणी/वाहतुक केलेल्या कंत्राटदारांचा सत्काराचे औचित्य साधुन कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक यांना साखर कारखानदारी बददल विशेष माहिती देणेसाठी दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांचे “साखर कारखानदारी व कामगार” या विषयावर व्याख्यान बुधवार दि.20.04. 2022 इ. रोजी दुपारी 2.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित केले आहे,
सर्व सभासद ऊस उत्पादक शेतक-यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे अवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी केले आहे.

छाया वृत्त :-
हाजगोळी बुद्रुक येथे हत्ती चा ‘लॉंग मार्च ‘…
दुचाकीसह पाण्याच्या टाक्यांचे केले नुकसान

आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुक येथे हत्तीनेे लाँग मार्च करत रविवारी रात्री व सोमवारी पहाटे काजू केळी या झाडांचे मोठे नुुकसान केेेले .पेद्रेवाडी मार्गे आलेल्या हत्तीने थेट हाजगोली गावात प्रवेश केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. हत्तीने दुचाकींंचेही नुकसान केले आहे.





