सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५

खाजगी प्रवासी बस खड्ड्यात गेल्याने महिला जखमी; चालकावर गुन्हा नोंद
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महागाव–मुंबई या मार्गावर धावणाऱ्या खाजगी प्रवासी बसला उत्तूर फाट्याजवळील रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यात जबर धक्का बसला. या धक्क्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या लक्ष्मीबाई भैरू नाईक व त्यांची मुलगी सुवर्णा नाईक यांचा तोल जाऊन त्या सीटवरून खाली पडल्या. या प्रकारात लक्ष्मीबाई यांच्या मणक्याला गंभीर दुखापत होऊन हाड मोडले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
प्रवासादरम्यान बसचा वेग जास्त असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. घटनेनंतर बेदरकार वाहन चालवल्या प्रकरणी चालक आत्माराम महादेव तेली (रा. महागाव) यांच्याविरुद्ध आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मलिग्रे येथे रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न.
दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता. आजरा येथील सन २००८-९ च्या दहावी बँचच्या विध्यार्थ्यांनी पंचक्रोशीतील रूग्णाची होणारी अडचण लक्षात घेऊन रूग्णवाहीका खरेदी करून, भावेश्वरी रूग्णवाहीकेचे लोकार्पण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
केदारी रेडेकर विस्वस्त संस्थेचे सचिव अनिरुध्द रेडेकर यांच्या व कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई याच्या हस्ते रूग्णवाहीकेचे समारंभ पूर्वक लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घाटगे यानी केले.
यावेळी रेडेकर म्हणाले, दहावीच्या बँचच्या वतीने जनतेची सेवा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत रूग्णवाहीकेसाठी आँक्सिजन सिलेंडर अत्याआवश्यक असून, तो आपल्या हाँस्पीटल मार्फत देण्याचे तसेच रुग्ण कै. केदारी रेडेकर हाँस्पीटलला आणल्यास शासकीय योजनेतून मोफत सेवा व रूग्णवाहीकेसाठी डिझेल देण्याचे आश्वासन दिले.
आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी युवा नेतृत्व किशोर जाधव याच्या कार्याचा गौरव करत त्याच्या बँचच्या विध्यार्थ्यांनी रूग्णसेवेचा वसा मानवतेला जोडणारा असलेचे सांगितलं. तर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यानी मार्गदर्शन केले.
यानंतर आरोग्य सहाय्यक जे एम बोकडे, धीरज देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँ. संगिता परमार, डाँ. संध्या राऊत, उपसरपंच चाळू केंगारे, पोलीस पाटील, मोहन सावंत, माजी सरपंच अशोक शिंदे, गजानन देशपांडे, युवा नेते किशोर जाधव, महेश तर्डेकर, संदीप केंगारे, संतोष मराठे, मंगल पारधे, तालुका संघाचे संचालक भाऊ किल्लेदार, डांँ. सुदाम हरेर डाँ. एम आर खवरे, सुभाष चौगले, जगन्नाथ बुगडे, सुनंदा बुगडे, बिपीन जाधव याच्यासह अंगणवाडी सेविका,मराठी शाळा शिक्षिका, विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार विश्वास बुगडे यांनी मानले.
आजरा कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूर व महीलांची आरोग्य तपासणी व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडे चालू हंगामात ऊस तोडणी करीता आलेल्या पर जिल्ह्यातील महीला व मजूरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या महीला मंजूर व त्यांच्या मुलींसाठी कारखान्याने सॅनिटरी नॅपकीन स्वखर्चाने उपलब्ध केले आहेत. शुक्रवारी गजरगांव ता. आजरा येथे ऊस तोडणी मजूर व महीलांचे आरोग्य तपासणी करिता आरोग्य शिबीर आयोजित करून त्यामध्ये १२८ मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर मजूर महिलांना व त्यांच्या मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटपाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री.अनिल फडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव, ग्रामसेवक श्री.अजितसिंह किल्लेदार, आरोग्य विभाग स्टाफ, शेती विभाग मुख्य लिपिक श्री.संदीप कांबळे त्याचबरोबर ऊस तोडणी मजूर महीला उपस्थित होत्या.
मुम्मेवाडी व्यायामशाळेला मनसेकडून साहित्य वाटप

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा मुम्मेवाडी यांच्या वतीने मुम्मेवाडी व्यायामशाळेला विविध क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनसे शाखाध्यक्ष रोहित भिऊंगडे, उपाध्यक्ष किरण भोसले, शाखा सचिव सुरज काटे, प्रकाश भिऊंगडे, श्रीकांत कडाकणे, सुरज दादरने यांच्यासह शैलेश सावेकर, विशाल भिऊंगडे, विजय सावेकर, दशरथ सावेकर, संकेत पोटे, सुशांत सुरंगे, संकेत गुरव, आदिनाथ बेलकर, अनिकेत परीट, किरण पाटील, आदिनाथ काटे आणि बजरंग दलाचे पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मनसे शाखेच्या पुढाकारातून करण्यात आले.

आजरा एन. सी. सी. सेक्टर मार्फत ‘एन. सी. सी. दिन उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा .
आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ‘एन. सी. सी. दिनानिमित्त’ एन. सी. सी. ध्वज फडकून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त्य प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनिल चौगुले (माजी सैनिक) क्रीडा शिक्षक,गडहिंग्लज हे उपस्थित राहिले. तसेच आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ए. एन. सादळे, आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अजित तोडकर, आजरा सेक्टर सर्व एन. सी. सी. कॅडेट्स व ऑफिसर्स यांच्या उपस्थित एन. सी. सी. ध्वज्यास सलामी देण्यात आली.
एन.सी.सी. दिनाचे औचित्य साधून सर्व कॅडेट्स यांना ‘एन.डी. ए. भरती प्रकिया’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मा. श्री. अनिल चौगुले यांचे मार्गदर्शन केले. ते पुढे असे म्हणाले, सर्व एन. सी. सी. कॅडेट्स यांनी देश सेवेसाठी सेनामध्ये भरती होणे फार गरजेचे आहे. देशाची सेवा करणे हे एकप्रकारचे आत्मसन्मानाचे काम आहे. देशातील प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती सेनामध्ये भरती होणे आवश्यक आहे. कारण देशसेवा म्हणजे काय हे सेनामध्ये भरती झाल्याशिवाय कळत नाही. एन. डी. ए. मध्ये भरती होणे हे एक प्रकारची कसरत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सेनामध्ये कसे जाता येईल याची सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. त्याचे चांगल्याप्रकारे उपयोग करून आपले भविष्य अजमावणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. ए. एन. सादळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते.
निधन वार्ता
इंदिरा महाडिक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोमवार पेठ येथील श्रीमती इंदिरा ज्ञानदेव महाडिक ( वय ९९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मी मुळची कोल्हापूर येथील सुशिक्षित कुटुंबातील. हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या काठावर वसलेले स्वच्छ सुंदर व निसर्गरम्य आजरा असे मी व माझे कुटुंबीय ऐकून होते. अकरा वर्षांपूर्वी विवाहानंतर मी आजरा येथे आल्यानंतर मात्र प्रत्यक्षात या शहरांमध्ये अनेक विचित्र अनुभव येऊ लागले.
ज्या ठिकाणी आजरा- आंबोली मार्गावर आम्ही राहतो तेथे ना धड पाणी, ना रस्ते, ना वीज ना, आरोग्याच्या सोयी, ना कचरा व्यवस्थापन अशा विचित्र परिस्थितीत गेली अकरा वर्षे आम्ही काढतो आहोत. माझ्यासारखी अनेक कुटुंबे आजही पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. दोन नद्यांच्या संगमावर असणाऱ्या या शहराची ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असा प्रकार या भागामध्ये सुरू आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार तर चिखल व दलदलीमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न या भागाला सतावत आहेत. इतरांप्रमाणे आम्हीही नगरपंचायतीला जे कांही शासकीय कर आहेत ते नियमितपणे भरत असतानाही आम्हाला अशा नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. कुठे नेऊन ठेवलात आजरा शहर ? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. वारंवार विनंती करूनही लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर आता आम्हालाच सभागृहात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
प्रभाग क्रमांक सहा मधून मी माझी अपक्ष म्हणून उमेदवारी ठेवली आहे या मागचे कारण हेच आहे. निश्चितच माझ्या वेदना या अनेकांच्या वेदना आहेत. हा परिसर टँकर मुक्त करणे हे माझे प्रथम ध्येय असेल. प्रभागातील सर्वसामान्यांची निगडित प्रश्नांची जाण मला आहे. यामुळे माझ्यासारख्या सुशिक्षित व लढाऊ उमेदवाराला प्रभागातून पाठबळ मिळेल अशी आशा आहे .

विशेष सूचना :-
नगरपंचायत निवडणुकीशी संबंधित इतर सर्व बातम्या आजपासून निकालापर्यंत स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. संबंधितांनी आपल्या आघाड्यांची माहिती, बातम्या फोटोसह देऊन सहकार्य करावे.
ज्योतिप्रसाद सावंत
मुख्य संपादक
व्हाट्सअप नंबर ९६३७५९८८६६


