mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजऱ्यात चोरी…
५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास


                     आजरा:प्रतिनिधी

नेवरेकर कॉलनी, आजरा येथे रहाणाऱ्या गणपती शंकर पाटील यांच्या राहत्या घराचे फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवार दिनांक २७ जानेवारी रोजी सदर घटना घडली.

पाटील हे घराला कुलूप लावून बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचे मंगळसूत्र अंगठ्या असा मुद्देमाल लंपास केला.

याबाबतची फिर्याद गणपती शंकर पाटील यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन…

बंद घरांची कुलपे फोडून चोऱ्यांचे प्रमाण  शहरात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शहरवासीय नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवाहन पोलिसांकडून  करण्यात आले आहे. घर बंद करून बाहेर जाताना आपल्या मौल्यवान वस्तू अथवा दागिने,रोख रक्कम घरात ठेवू नयेत असेही आवाहन करण्यात आले आहे .


बाजारासाठी आलेली व्यक्ती बेपत्ता


                    आजरा: प्रतिनिधी

आजरा बाजारपेठेमध्ये बाजारासाठी आलेले संतोष खिरू लमाणी ही चाळीस वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की संतोष लमाणी यांची मूळ गाव हेगडी आळा, ता. विजापूर असून सध्या ते मोल मजुरीसाठी चाफवडे त्या.आजरा येथे राहत होते. १९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाफवडे येथून मासे आणण्यासाठी आजरा येथे आले होते. त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत.

याबाबतची वर्दी लिंबाजी भिमू नमाणी यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पोलीस नाईक संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.


आज-यात प्रजासत्ताक दिन उत्साहात…


                    आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरासह तालुक्यामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शासकीय ध्वजारोहण तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित दर्शवली.याच बरोबर तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, पतसंस्था, बँका येथेही उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुक्यात ठीक- ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


आरक्षण मिळाल्याने आनंदोत्सव


                    आजरा : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आजरा येथे मराठा महासंघाच्या वतीने आनंद व्यक्त करणेत आला‌. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मराठा महासंघ आजरा तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. ‌फटाक्यांची आतषबाजी करून साखर- पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मारूती मोरे‌, उपजिल्हाध्यक्ष सी. आर. देसाई,कार्याध्यक्ष संभाजी इंजल ,सचिव प्रकाश देसाई व सवर्व कार्यकारीणी सदस्य हजर‌. होते.


हरपवडे धनगरवाड्यावर पशुधन अधिकाऱ्यांचा ताफा


                    आजरा: प्रतिनिधी

पेरणोली (ता. आजरा) येथील हरपवडे धनगरवाड्यावर गेल्या तीन महिन्यात पंचवीसवर देशी गाईंचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त ‘मृत्युंजय महान्यूज ‘ने प्रसिद्ध केल्यानंतर पशुधन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने हरपवडे धनगरवाडा येथे जाऊन त्यांनी पशुपालकांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

या प्रकारामुळे पशुपालकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. गाईचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला याबाबत पशुवैदयकिय विभागाकडून खात्री करून घेतली जात आहे. जनावरांचे व्यवस्थापन करतांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पशुधन विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या महिन्याभरात अंकुश नवलु झोरे, राहुल अंकुश झोरे, भागोजी नवल् झोरे, धोंडीबा बमू गावडे, कॉडीबा जानू झोरे, बाबू ठकू येडगे यांच्या गायी मृत्यू पावल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर पशुवैदयकीय विभाग सतर्क झाला असून गाईचे शवविच्छेदन करून त्यांचे रक्त व लघवीचे नमुने पूणे प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.

जनावरांच्या शरीरात कॅल्शीअम व फाॅस्फरसची कमतरता असते. त्या वेळी ती मेलेल्या जनावरांची सडलेली विषयुक्त हाडे चघळतात. हाडे चघळल्यामुळे विषबाधा होते. हे विष जीवघेणे असून याच्यावर काहीही उपचार नाही असे पशुधन विस्तार अधिकारी डॉ .पी. डी. ढेकळे यांनी सांगितले.
हा साथीचा आजार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.धनगर वाड्यावरील अजूनही काही गाईंना या रोगाची लक्षणे आढळत असल्याचेही सांगण्यात आले.


आजरा सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नागेश यमगर


                     आजरा:प्रतिनिधी

आजरा पोलीस स्टेशनचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी नुकताच स्वीकारला. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी यमगर यांची नियुक्ती झाली आहे.

यमगर यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ असून त्यांनी गडचिरोली, मुंबई, कोल्हापूर, सोलापूरसह ठिकठिकाणी यापूर्वी काम केले आहे.


सांस्कृतिक…

आज गीत रामायण

नवनाट्य कलामंच,आजरा आयोजीत आणि दि आजरा अर्बन बँक प्रायोजित…

‘गीतरामायण’

सादरकर्ते ;- प्रख्यात गायक आणि संगीतकार श्रीधर फडके

( ५.३० वाजता आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये)


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

आजरा- चंदगड- गडहिंग्लज परिसर वृत्त

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!