mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


 

२५ गायी दगावल्या…

हरपवडे धनगरवाड्यावर गायींचे मृत्यूसत्र

पशुपालकांत भितीचे वातावरण


                   आजरा: प्रतिनिधी

       पेरणोली (ता. आजरा) येथील हरपवडे धनगरवाड्यावर देशी गाईंच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गत तीन महीन्यात सुमारे पंचवीससहून अधिक दुभत्या गायींचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे पशुपालकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. गायींचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला याबाबत पशुवैदयकिय विभागाकडून खात्री करून घेतली जात आहे. जनावरांचे व्यवस्थापन करतांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पशुधन विकास विभागाकडून करण्यात आले आहे.याबाबत पशुधन विभागाकडूनही अस्पष्टता व्यक्त केली जात असल्याने वाड्यावरील ग्रामस्थामधून चिंता व्यक्त होत आहे

       पेरणोली पैकी हरपवडे धनगरवाड्यावर सुमारे २० धनगर कुटुंबे राहतात. त्यांच्याकडे गोधन मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक कुटुंब देशी गायी पाळत असल्याने सुमारे चार- पाचशे गायी या कुटुंबांकडे आहेत. धनगर कुटुंबाना पुरेशी जमिन नसल्याने चारा व पाण्यासाठी गायींना जंगलावर अवलंबून रहावे लागते. पशुपालक चरण्यासाठी गायी जंगलात सोडतात. हा दररोजचा शिरस्ता आहे.गणपती व दसरा सणापासून गायींचा अचानक मृत्यू होण्यास सुरवात झाली आहे.

       गेल्या तीन महिन्यात अंकुश नवलु झोरे, राहुल अंकुश झोरे, भागोजी नवल् झोरे, धोंडीबा बमू गावडे, कॉडीबा जान् झोरे, बाबू ठकू येडगे यांच्या पंचवीसपेक्षा जास्त गायी मृत्यू पावल्या आहेत. गायी जमीनवर बसल्या की त्या उठत नाहीत. तोंडातून लाळ टपकते. श्वास जोराने सुरु राहतो व जागेवरच मृत्यू होतो असे पशुपालक नागेश झोरे यांनी सांगीतले.

       या मृत्युसत्राने पशुवैदयकीय विभाग सतर्क झाला असून गायींचे शवविच्छेदन करून त्यांचे रक्त व लघवीचे नमुने पूणे प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. या आजाराबाबत खात्री करून घेतली जात आहे.

मेलेली जनावरेच कारणीभूत…?

       जनावर मेले की मोकळ्या रानात फेकले जाते. ते जनावर सडल्यावर हा विषाणू वाढतो. तो वाढताना विष तयार होते. ते विष हाडाना चिकटून बसते. जनावरांच्या शरीरात कॅल्शीअम व फाॅस्फरसची कमतरता असते. त्या वेळी ती मेलेल्या जनावरांची सडलेली हाडे चघळतात. ते चघळल्यामुळे विषबाधा होते. हे विष जीवघेणा असून याच्यावर काहीही उपचार नाही पशुधन विभागाकडून सांगितले जाते.

आजाराची लक्षणे .

       विषबाधा झाल्यावर जनावरामध्ये जनावर खात- पित नाहीत. शेपटी व कानाची हालचाल मंदावते. जनावर बसले तर ते संथ गतीने उठले. शरारीतील काही मांस पेशींना लकवा मारतो व दोन चार दिवसात जनावर दगावते.


 आजरा साखर कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर सक्ती


                  आजरा: प्रतिनिधी

       प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.२१ रोजी कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहन मालक व चालक यांची कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी मोटर वाहन निरिक्षक श्री. सागर चौगुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, वाहतुक नियमांची सविस्तर माहीती दिली.

       यामध्ये प्रामुख्याने वाहन चालकांनी वाहन चालवितांना टेपरेकॉर्डर लावू नये. त्याच बरोबर मोबाईलचा वापरही करू नये. सद्या महामार्गाचे काम चालु असलेने इतर वाहनांची काळजी घेवून, वाहन चालवावीत व अपद्यात टाळावेत अश्या सुचना दिल्या. तसेच सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावणेची सुचना करून रिफ्लेक्टर लावणेत आले.

       यावेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही.के. ज्योती, शेती ऑफिस हेड क्लार्क श्री.संदिप कांबळे, केनयार्ड स्टाफ त्याच प्रमाणे ट्रक, टॅक्टर मालक व चालक मोठया संखेने उपस्थित होते.


स.पो.नि.सुनील हारुगडे यांचा सन्मान

                    आजरा: प्रतिनिधी 

      आजरा अन्याय निवारण समिती कडून आजाराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांची पदोन्नती आणि बदली झालेबद्दल आजरा तालुक्यात त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञतापूर्वक मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर कुंभार यांनी केले. तसेच दयानंद भोपळे, नाथा देसाई, गुरु गोवेकर, परशुराम बामणे, नौशाद बुड्ढेखान, यांनी आपली मनोगते सादर केली.

      स.पो.नि. हारूगडे यांनी आजरा शहरातील सर्व धर्मीय व सर्वपक्षीय मंडळींनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपणाला सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गुन्हे उघडकीस आणताना आजरावासियांचे विशेष सहकार्य लाभले. तालुक्यातील जनतेने भरपूर प्रेम दिले. तालुक्यातील गोरगरीब जनतेचा विचार करून कायद्याचा आधार घेऊन तंटे मार्गस्थ केले. या यापुढेही आजरा येथे परत यायला आवडेल असेही स्पष्ट केले.

      यावेळी संतोष भाटले, विजय थोरवत, गौरव देशपांडे, भास्कर बुरूड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


गवसे येथील साक्षीची दिल्ली पोलीस दलात निवड

                     आजरा: प्रतिनिधी

      गवसे ता. आजरा येथील कु. साक्षी सदानंद पाटील हिची दिल्ली पोलीस दलामध्ये कोल्हापूर विभागातून निवड झाली आहे.कोल्हापूर विभागातून ती एकमेव विद्यार्थिनी या पदाकरिता पात्र ठरली आहे.

        साक्षीचे प्राथमिक शिक्षण गवसे विद्या मंदिरात तर माध्यमिक शिक्षण गवसे हायस्कूल येथे झाले आहे. चारच महिन्यापूर्वी तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. अतिशय कष्टाने आई व चुलते यांच्या प्रेरणेतून साक्षी हिने सदर पदापर्यंत मजल मारली आहे.

       गवसे सारख्या ग्रामीण व डोंगराळ भागातून जडणघडण झालेल्या साक्षीची थेट दिल्ली पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘आजरा मर्चंटस् ‘च्या अध्यक्षपदी रमेश कारेकर, सुरज जाधव उपाध्यक्ष

 

                    आजरा : प्रतिनिधी 

आजरा मर्चंटस् को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, आजरा या संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश महादेव कारेकर यांची तर उपाध्यक्षपदी सुरज किशोर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सहाय्यक निबंधक सुजय कुमार येजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत सदर निवड करण्यात आली. यावेळी बसवराज गुंजाटी, दिवाकर नलवडे, शिवलिंगाप्पा तेरणी, रुद्राप्पा पाटील, ऋषिकेश महाळंक, गोपाळ पाटील, गोपाळ जाधव, शामराव कारंडे यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

पेदात गोम्स यांचे निधन… शिवजयंतीनिमित्त होणार महिलांच्या लेझीम स्पर्धा… तर सर्फनाला धरणाचे काम १४ फेब्रुवारी पासून बंद करणार… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!