mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


रोजरी चर्चची घंटा विसावली…

मोजेस डिसोजा यांचे निधन

                    आजरा: प्रतिनिधी

      आजरा येथील ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान व प्रार्थनास्थळ असणाऱ्या रोजरी चर्चमध्ये गेली ४२ वर्षे घंटा देण्याचे काम अखंडपणे बजावणारे मोजेस फिलीप डिसोजा यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. स्थानिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेणाऱ्या मोतेश यांच्या निधनाने चर्चची घंटादेखील कांही काळ विसावली असे म्हणण्यास हरकत नाही.

   तरुणपणापासूनच डिसोजा यांनी चर्चची घंटा वाजवण्याची जबाबदारी स्वीकारली. काम साधे असले तरी ते अखंडपणे व वेळेवर पार पाडण्याची जबाबदारी फारशी सोपी नव्हती. त्यांनी ती जबाबदारी मृत्यूपर्यंत पार पाडली. दुपारी बारा वाजता व सायंकाळी सात वाजता न चुकता घंटा देण्याचे काम त्यांनी चालू ठेवले होते. नुकत्याच झालेल्या त्यांच्या निधनामुळे त्यांच्या या कामाची पुन्हा एक वेळ चर्चा सुरू आहे.

     अविवाहित असणाऱ्या मोतेश यांच्या पश्चात दोन विवाहित भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे. मोजेस यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


पिसाळलेल्या माकडाचा आल्याच्यावाडीत धुमाकूळ


                    आजरा: प्रतिनिधी

      आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे पिसाळलेल्या माकडाने अनेकांचा चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, गावात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने थैमान घातलेले आहे. हे माकड गावात ज्या भागात जाईल त्या भागातील अबालवृद्ध नागरिकांच्या मागे लागून त्यांना ओरबडण्यासह चावाही घेत आहे. त्यामुळे नागरीक गंभीर जखमी होत आहेत येथील माडभगत व मुळीक कुटुंबातील तब्बल आठ जणांचा माकडाने चावा घेतला आहे. माकडाच्या दहशतीमुळे गावातील नागरिक खूप धास्तावले आहे.

       येणाऱ्या दोन दिवसात संबंधित माकडाचा बंदोबस्त न केल्यास. वनविभागासमोर येऊन निदर्शने करणार असल्याचे माजी उपसरपंच देवराज माडभगत यांनी सांगितले आहे.


वजन-मापे विभागाच्या तपासणीत आजरा साखर कारखान्याचे वजन काटे निर्दोष


                आजरा : प्रतिनिधी

      जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे आदेशाने निरीक्षक, वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांचे भरारी पथकाने आजरा साखर कारखान्याच्या दोन्ही ऊस वजन काटयाची तपासणी करण्यासाठी दुपारी अचानक भेट दिली व वजन काटयांची संपुर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा वजन केलेल्या व नविन वाहनांची वजने घेतली. तसेच ८ टनाची वजने प्रत्यक्षात ते पडताळणी केली. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही.

       त्यामुळे आजरा साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक निर्दोष असलेचे स्पष्ट झाले. काटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला.

       भरारी पथकाचे अधिकारी एम.व्ही.देसाई, निवासी नायब तहसिलदार, के.डी. ढेरे, पोलिस प्रतिनिधी, एल.जी.आकुलवार, तृतीय विशेष लेखापरिक्षक प्रतिनिधी व अविनाश शिगांडी निरीक्षक वैदयमापन शास्त्र, गडहिंग्लज यांनी काटे तपासणी केली. त्यावेळी प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेंजर (प्रोडक्शन) श्री.एस, के.सावंत ऊस पुरवठादार शेतकरी, केनयार्डचे कर्मचारी उपस्थित होते.


रवळनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक शिंपी : उपाध्यक्षपदी समीर गुंजाटी


                    आजरा : प्रतिनिधी

       आज-यातील श्री. रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक जयवंतराव शिंपी यांची तर उपाध्यक्षपदी समीर विश्वनाथ गुंजाटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल पाटील होते.

      यावेळी नुतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर अध्यक्ष शिंपी बोलताना यांनी भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांच्या हिताची जपणूक होईल अशा दृष्टीचे धोरण आखून संस्थेचा कारभार केला जाईल असे स्पष्ट केले. याकरिता संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असेही नमूद केले.

       निवड सभेला संचालक युसूफ आदम गवसेकर, विश्वास कृष्णा जाधव, विक्रम अर्जुन पटेकर, सौ.माधुरी अशोक पाचवडेकर, सौ.अर्चना संतोष मराठे, सुधीर नार्वेकर यांच्यासह सचिन शिंपी, अशोक पोवार आदी उपस्थित होते. स्वागत व आभार संस्थेचे मॅनेजर विश्वास हरेर यांनी मानले.


अन्यथा ३१ जानेवारी रोजी पाणी मोर्चा…


                    आजरा: प्रतिनिधी

       आजरा शहरांमध्ये गेले वर्षभर नळ पाणीपुरवठा योजनेचे नियोजन बिघडले असून शहरवासीयांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा सोडणार झाल्यास ३१ जानेवारी रोजी आजरा नगरपंचायतीवर पाणी मोर्चा काढण्याचा इशारा आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीमार्फत देण्यात आला आहे.

      पाणीपुरवठा योजनेचे नियोजन बिघडल्याने शहरातील महिला वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रसंगी खाजगी पाण्याची टँकर विकत घ्यावे लागत आहेत. यामुळे शहरवासीयांना आर्थिक भर दंड बसत असून त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार आहे. नगरपंचायतीने तातडीने पाणीपुरवठा नियोजन मार्गावर आणून दररोज पाणीपुरवठा न केल्यास ३१ जानेवारी रोजी सदर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचे लेखी निवेदन नगरपंचायत अधिकाऱ्यांना देऊन चर्चाही केली आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष सुधीर कुंभार, पांडुरंग सावरकर, विजय थोरवत, दयानंद भोपळे, वाय.बी. चव्हाण, अतुल पाटील, गौरव देशपांडे, गुरु गोवेकर,अशोक गाईंगडे ,मारियान डिसोजा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


निधन वार्ता
दिगंबर हवालदार


          पेरणोली ता. आजरा येथील दिगंबर राजाराम हवालदार ( वय ४५ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, आई-वडील भाऊ-बहीण असा परिवार आहे.


संबंधित पोस्ट

कककक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!