मंगळवार १८ नोव्हेंबर २०२५



नगराध्यक्ष पदासाठी १८ तर नगरसेवक पदासाठी १३५ अर्ज दाखल : आज अर्जांची छाननी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १४ जणांनी १८ व नगरसेवक पदासाठी ९४ जणांनी १३५ अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही पदासाठी मिळून एकूण १५३ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान दाखल अर्जाची आज मंगळवारी सकाळी ११ वा. छाननी प्रक्रिया होणार आहे.
एकूण दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे : (कंसात एकूण अर्ज)
नगराध्यक्ष पद (१४ जणांचे १८ अर्ज)
मंजूर मुजावर (३), अंजीरेआलम तकिलदार, अमानुल्ला आगलावे, संजय सावंत (२), संभाजी पाटील, अबूताहेर तकीलदार, मौजूदअहमद माणगावकर, श्रद्धानंद ठाकूर, अशोक चराटी (२), परशुराम बामणे, सुधीर कुंभार, सिद्धेश नाईक, नियामत मुजावर, बाकीम खेडेकर.
प्रभाग एक (८)
अश्विनी चव्हाण (२), भैरवी सावंत (२), भाग्यश्री थोरवत, श्रद्धा देसाई (२), अनसा माणगावकर
प्रभाग दोन (५)
संभाजी पाटील (२), संजय इंगळे, पूजा डोंगरे (२)
प्रभाग तीन (७)
सुमय्या खेडेकर (२), रहिमतबी खेडेकर (३), समीना खेडेकर (२)
प्रभाग चार (९)
जावेद पठाण, नदीम मुल्ला, मुसासरफराज पटेल (२), आदम खेडेकर, बाकीयू खेडेकर, सोयल पठाण, रशीद पठाण (२)
प्रभाग पाच (८)
निशात चाँद (२), इरम चाँद, जस्मिन सय्यद (२), नाझिया खेडेकर (२), अस्मा दरवाजकर
प्रभाग सहा (९)
साधना मुरुकटे (२), शाहीन तकीलदार (२), नूरजहाँ तकीलदार, सरोज बिरजे, अन्वी केसरकर (२), रुमाना तकीलदार
प्रभाग सात (७)
कलाबाई कांबळे (२), अंजना कांबळे, बालिका कांबळे (२), पौर्णिमा कांबळे, गीता कांबळे
प्रभाग आठ (८)
असिफ सोनेखान (२), इकबाल शेख (२), सुहेल काकतिकर, अबूबक्कर पठाण (२), करिष्मा शेख
प्रभाग नऊ (५)
रेशमा बुड्डेखान (२), रहिताझबी बुड्डेखान, यास्मिन लतीफ, रुमाना तकीलदार
प्रभाग दहा (१५)
सनाउल्ला चाँद (३), निसार लाडजी (२), उमेद चाँद (२), लहू कोरवी, मेहताब आगा, वासीम दरवाजकर, सिकंदर दरवाजकर (२), ताहीर लमतुरे, विजय कुंभार, आनंदा कुंभार
प्रभाग अकरा (८)
गीता सावंत (२), साक्षी फडके, स्मिता परळकर, वृषाली केळकर (२), आरती हरणे (२)
प्रभाग बारा (८)
समीर गुंजाटी (२), दिलशाद पटेल, दत्तराज देशपांडे, समीर तकीलदार, अनिकेत चराटी (२), संतोष परिट
प्रभाग तेरा (४)
पांडुरंग सुतार, रवींद्र पारपोलकर, परेश पोतदार (२)
प्रभाग चौदा (७)
सूर्यकांत नार्वेकर, अभिषेक शिंपी (२), सिद्धेश नाईक (२), विक्रम पटेकर, आरती हरणे
प्रभाग पंधरा (५)
परशराम बामणे, शैलेश सावंत (२), सतीश बामणे, अनिरुद्ध फडके
प्रभाग सोळा (१३)
रेशमा खलिफ (२), नजमीन लष्करे (२), बानू तळगुले, मीनाक्षी पुजारी (२), आसावरी खेडेकर (२), शफूरा मुराद, अश्विनी कांबळे, श्रुती पाटील, संगीता चंदनवाले
प्रभाग सतरा (९)
जयश्री पटेकर (२), पूनम लिचम (२), स्नेहा निकम, आरती मनगुतकर, सरिता गावडे (३).

विद्यमान नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका सौ. अस्मिता जाधव, सौ.सीमा पोवार सौ.यासिराबी लमतुरे, सौ.शुभदा जोशी, सौ.संजीवनी सावंत, शकुंतला सलामवाडे, रेश्मा सोनेखान, यास्मिन बुडृडेखान आलम नाईकवाडे, अनिरुद्ध केसरकर, किशोर पारपोलकर, विलास नाईक या मंडळींनी यावेळी उमेदवारी अर्जच दाखल केलेले नाहीत. यातील काहींना आरक्षणाचा फटका बसला आहे.


भाजपा शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षांच्या ताराराणी आघाडीचे उमेदवार जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षांनी आजरा नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर तयार केलेल्या ताराराणी आघाडीच्या अधिकृत उमेदवाऱ्या पत्रकार बैठकीद्वारे आघाडी प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी जाहीर केल्या. त्या पुढील प्रमाणे…
नगराध्यक्ष : अशोक चराटी
प्रभाग १ : सौ.अश्विनी संजय चव्हाण
प्रभाग २ : सौ. पुजा आश्चिन डोंगरे
प्रभाग ३ : सौ. समिना वसीम खेडेकर
प्रभाग ४ : रशीद महंमद पठाण
प्रभाग ५ : सौ. निशांत समीर चाँद
प्रभाग ६ : सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर
प्रभाग ७ : सौ. बालिका सचिन कांबळे
प्रभाग ८ : इकबाल इब्राहीम शेख
प्रभाग ९ ; सौ. यास्मिन कुदरत लतीफ
प्रभाग १० : सिकंदर इस्माईल दरवाजकर
प्रभाग ११ : सौ. गीता संजय सावंत
प्रभाग १२ : अनिकेत अशोक चराटी
प्रभाग १३ : परेश कृष्णाजी पोतदार
प्रभाग १४ : सिद्धेश विलास नाईक
प्रभाग १५ : शैलेश नारायण सावंत
प्रभाग १६ : सौ. आसावरी महेश खेडेकर
प्रभाग १७ : सौ. पुनम किरण लिचम
यावेळी बोलताना आघाडी प्रमुख अशोक चराटी म्हणाले पालकमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील,खास. धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम उमेदवार देण्याचा आपण प्रयत्न केला आहे.
गतवेळी नुकतीच नगरपंचायत स्थापन झाल्याने नगरपंचायत मंजुरी नंतर समजण्यात थोडा वेळ गेला.दोन वर्षानंतर निधी आला मात्र कोरोनामुळे कामे लांबली.त्यानंतर विकास कामे झाली.२७ कोटींची नळपाणी पुरवठा योजना मंत्री आबिटकर यांच्या प्रयत्नातून मिळाली.३४ कोटी रुपये रस्त्यांसाठी आले मात्र आधी पाणी योजना करुन नंतर रस्त्यांची कामे सुरु होणार आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे काम रखडले मात्र आमच्यावर आरोप झाले याची प्रचारात योग्य उत्तरे देणार असल्याचीही त्यांनी स्पष्ट करत या आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी विजयकुमार पाटील, विलास नाईक, सुरेश डांग,संजय सावंत अनिकेत चराटी,बाळ केसरकर, रमेश कुरुणकर, अण्णा फडके, संजय चव्हाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विरोधकांचे उमेदवार ठरेनात…
एकीकडे आपल्या आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर केले असताना विरोधी आघाडीमध्ये मात्र नगराध्यक्षपदावर एकमत नसण्याबरोबरच प्रभाग निहाय उमेदवारांवरही एकमत होऊ शकत नाहीत. अशी मंडळी शहराचा विकास काय करणार ? असा सवाल ही चराटी यांनी उपस्थित केला.
१६ नवीन चेहऱ्यांना संधी
आघाडीतून तब्बल १६ नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे.


पतसंस्थेत चोरीचा प्रयत्न
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील महागाव मार्गावर असणाऱ्या भुसारी बिल्डिंग मधील श्रीमाता पतसंस्था, बेळगावच्या आजरा शाखेमध्ये लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून दुसऱ्या मजल्यावरील मुख्य लोखंडी शटरचा दरवाजा व त्याला लागून असणाऱ्या आतील लोखंडी ग्रीलचे दरवाजाचे कुलूप तोडून शाखेत प्रवेश करून चोरी करण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
याबाबतची फिर्याद शाखा व्यवस्थापक समीर पांडुरंग देसाई राहणार उचंगी ता. आजरा यांनी पोलिसात दिली आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.


उत्तूर परिसरात १२ दिवसीय कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या १२ दिवसांच्या कालावधीत उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील १७ गावांमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी २५ पथकांद्वारे आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.
या तपासणीदरम्यान त्वचेवरील गाठी, न बरी होणारी किंवा न दुखणारी जखम, कानपाळ्या जाड होणे, हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, अशक्तपणा, हातातून वस्तू गळणे, डोळा सतत उघडा राहणे, त्वचा तेलकट व गुळगुळीत दिसणे इत्यादी कुष्ठरोगाशी संबंधित लक्षणांची तपासणी करून रुग्णांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.या मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व पुरुष स्वयंसेवक यांचे पूर्व प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मोहिमेचे नियोजन डॉ. रविकांत शर्मा व डॉ. सौरभ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक व सहाय्यिका यांनी केले आहे.

निधन वार्ता
हरिबा येजरे

मूळ गजरगाव ता. आजराचे रहिवासी व सध्या वास्तव्यास दाभिल येथे असणारे हरीबा येजरे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आज मरगुबाईची यात्रा…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील सुतार गल्ली परिसरात मरगुबाई देवीची यात्रा आज मंगळवार दिनांक नोव्हेंबर रोजी होणार आहे.
यात्रेनिमित्त सायंकाळी सहा वाजता मरगुबाई देवीची महापूजा व रात्री नऊ वाजता सन्मित्र भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद व रात्री आठ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मरगुबाई देवालय उत्सव कमिटीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.



