mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरदेशभारतमनोरंजनराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार  दि.१९ नोव्हेंबर २०२५

नो ऑब्जेक्शन…

तरीही नगराध्यक्ष पदाचे दोन तर नगरसेवक पदाचे दहा अर्ज अपात्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १८ तर १७ प्रभागातील १७ नगरसेवक पदासाठी १३५ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी मंगळवारी करण्यात आली. कोणीही कोणावरही हरकत घेत न घेता ही तांत्रिक त्रुटींमुळे नगराध्यक्ष पदाचे २ तर नगरसेवक पदाचे १० अर्ज अपात्र ठरले. पण यामुळे कोणीही रिंगणा बाहेर गेलेला नाही.
अर्ज माघारीसाठी शुक्रवार दि. २१ ही अंतिम मुदत आहे.

नगराध्यक्ष पदासाठी संभाजी पाटील (शिवसेना ठाकरे गट) व मंजूर मुजावर (काँग्रेस) यांनी पक्षाचे एबी फॉर्म जोडले नसल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र मंजूर मुजावर यांचा अपक्ष अर्ज आहे. नगराध्यक्ष पदासाठी १६ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये ८ तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये ५ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग तीन मध्ये रहिमतबी खेडेकर यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज अपात्र ठरला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अर्ज पात्र ठरला आहे. या प्रभागात ६ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये बाकीयु खेडेकर यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात ८ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक पाच मध्ये ८, प्रभाग क्रमांक सहा मध्ये ९तर प्रभाग क्रमांक सात मध्ये ७ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक आठ मध्ये करिष्मा शेख यांनी जात पडताळणी टोकन अर्जासोबत जोडले नसल्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरला आहे. या ठिकाणी ७ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग नऊ मध्ये ५ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग १० मध्ये सनाउल्ला चांद व उमेद चांद या दोघांचेही अर्ज काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे अपात्र ठरले आहेत. त्यांचे अपक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या प्रभागात १३ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये वृषाली केळकर यांचा तराराणी आघाडीचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात सात अर्ज पात्र आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये ८ तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये ४ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये विक्रम पटेकर यांचा काँग्रेसचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात सहा अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मध्ये ५ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १६ मध्ये रेशमा खलिफ व नाजमीन लष्करे या दोघींचेही अर्ज काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे अपात्र ठरले आहेत. मात्र त्यांचे अपक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या प्रभागात ११ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मध्ये सरिता गावडे यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात ८ अर्ज पात्र ठरले आहेत.

नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्र उतरण्याचा अन्याय निवारण समितीचा निर्णय

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीत अन्याय निवारण समिती समविचारी मंडळींसोबत स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असून तसा निर्णय आघाडी व समविचारी मंडळींच्या वतीने पत्रकार बैठकीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एक वेळ नगरपंचायत निवडणुकांची समीकरणे बदलली आहेत. शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक व लेखक डॉ.श्रद्धानंद ठाकूर यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक चौरंगी तर नगरसेवक पदांच्या लढती अपवादात्मक प्रभाग सोडल्यास बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

आघाडी जाहीर करताना डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, जनतेच्या आग्रहास्तव घराणेशाही व भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायत करण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात स्वतंत्र उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेले काही दिवस अन्याय निवारण समिती शहरवासीयांच्या विविध प्रश्नांसाठी झगडत आहे. आमच्यासह सोबत असणाऱ्या समविचारी मंडळींची शहरातील नेमकी ताकद किती आहे हे यामुळे स्पष्ट होणार आहे.१ नोट- १ वोट धर्तीवर हि निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजऱ्याची पाणीपुरवठा योजना, सुशोभीकरणाऱ्या नावाखाली जुन्या शासकीय दवाखान्या जवळील गाळ्यांमध्ये झालेला गोलमाल, शहराचे करण्यात आलेली विद्रुपीकरण या सर्वच बाबी या निवडणूक निमित्ताने आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत.

प्रा.सुधीर मुंज म्हणाले, आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने गेल्या दोन वर्षांत तळागळात काम केले आहे.पाण्याचा प्रश्न चांगला हाताळल्यामुळे आजरेकरांना टंचाई भासली नाही.प्रशासनाला वठणीवर आणत अन्याय निवारण समितीने रात्रीचा दिवस करत पाणी मिळवून दिले.वाढीव घरफाळा रोखण्यासाठी भव्य मोर्चा काढून न्याय मिळवून दिला. याशिवाय अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. आजरेकर हे विसरणार नाहीत.आम्ही समविचारी आघाडी बनवली आहे.जनता या आघाडीला नक्की स्विकारणार.

अरुण देसाई म्हणाले, स्वैराचार व भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासकांकडे दुर्लक्ष केले आहे.निधी हा शासनाकडून येतो त्यामुळे तो आपण आणला हा कांगावा त्यांनी करु नये.त्यांची नितीमत्ता घसरत चालली आहे.सत्ताधाऱ्यांचे प्रमुखांना खूप कामे आहेत. अनेक संस्था आहेत त्यामुळे तिकडे लक्ष देण्यासाठी नगरपंचायतीतून मुक्त करुया. २७ कोटींच्या पाणी योजना मॅनेज केली आहे. ठेकेदाराची मुदत संपूनही तो अडीच काम करत आहे.समितीने अनेक आंदोलने केली मात्र एकही नगरसेवक यावेळी प्रशासनाला जाब विचारला आले नाहीत. नगरपंचायत कंत्राटदारांची नाही तर सर्वसामान्यांची होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला परशुराम बामणे,नाथ देसाई, सुधीर कुंभार, दयानंद भुसारी, राजेंद्र चंदनवाले, गौरव देशपांडे, जावेद पठाण, हर्षद परुळेकर, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोजा यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सरोळी येथून एक जण बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सरोळी ता. आजरा येथून संतोष दत्तात्रय सनवक्के ही ४० वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची वर्दी वडील दत्तात्रय वीरभद्र सनवक्के रा. सरोळी यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

१५ नोव्हेंबर पासून केस कटिंगच्या दुकानात जातो असे सांगून घराबाहेर गेलेले संतोष हे अद्याप घरी परतलेले नाहीत. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत. ‌

खड्डे मुजवा…
अन्यथा आंदोलन

उत्तूर -हालेवाडी रस्ता प्रश्नी ‘सार्वजनिक बांधकाम’ ला इशारा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हालेवाडी ते उत्तुर दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना या मार्गावर वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. यापूर्वी दुचाकी खड्ड्यात जाऊन अपघातही झाले आहेत. जीवित हानी होण्यापूर्वीच सदर खड्डे मुजवावेत, आठ दिवसात हे खड्डे मुजवले नाहीत तर २८ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव व आरदाळ येथील कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

स्व. मुकुंदराव आपटे यांनाअभिवादन
सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जि.प. चे माजी अर्थ व शिक्षण सभापती स्व. मुकुंदराव आपटे यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध राजकीय, सामाजिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही गावकऱ्यांच्या स्मरणात असून त्यांचे नाव अजरामर आहे. शिक्षण आणि समाजभान जपणारे नेते म्हणून त्यांचा लौकिक राहिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ यावर्षी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. मुकुंदराव आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योगपती विश्वनाथ करंबळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष उमेश आपटे, माजी चेअरमन वसंतराव धुरे, माजी उपसभापती शिरीष देसाई, गणपतराव यमगेकर, सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रा. पं. सदस्य महेश करंबळी, राजू खोराटे, शिवलिंग सन्ने, श्रीपती यादव, दादू सावंत, एस.टी.हळवणकर, कृष्णा पाकले, व्ही. एस.कांबळे, रमेश ढोणुक्षे, सचिन फाळके, अमित येसादे, संग्राम घोडके, सतिश चोरगे, व्यंकटेश मुळीक, बाळासो आडके, महेंद्र मिसाळ, भारत जाधव,अभी आरेकर, विजय वांद्रे, आतिष देसाई, प्रदीप लोकरे, प्रवीण लोकरे, विठ्ठल उत्तूरकर, डी.बी.सावंत, दिपक आमणगी स्वप्निल पाटील, मंदार हळवणकर आदींचा समावेश होता.

आपटे परिवारातर्फे उमेश आपटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आभार प्रदर्शन संजय आपटे यांनी केले.

 

निधन वार्ता
दिनकर कातकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे ता. आजरा येथील दिनकर गणपती कातकर (वय ६६ वर्षे )यांचे यांचे वृद्धापकाळाने काल मंगळवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात, दोन विवाहित मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.ग्रामपंचायत सदस्या शामल कातकर यांचे ते सासरे होत.

गजदर्शन…

धनगरमोळा परिसरात हत्तीचे खुलेआम दर्शन आता होऊ लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

संबंधित पोस्ट

पेद्रेवाडीत हत्ती…

mrityunjay mahanews

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

mrityunjay mahanews

आंबोली घाटात चिरा डंपर कोसळला…सौ. संजीवनी सावंत यांचा आंतरराज्य पुरस्काराने गौरव…क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे घवघवीत यश…चंद्रशेखर फडणीस यांची निवड

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!