
वाटंगी येथील अल्पवयीन मुलीचे आजरा येथून अपहरण
वाटंगी (ता. आजरा) येथील सतरा वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद संबंधित मुलीच्या वडिलांनी आजरा पोलीस स्टेशनला दिली आहे.
कॉलेजला जातो असे तरी सांगून आलेली संबंधित मुलीचे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरून कोणीतरी अज्ञाताने अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एकास ताब्यात
आजरा तालुक्यातील मडिलगे- वडकशिवाले मार्गावर बेकायदेशीररित्या देशी दारू जवळ बाळगून ती विक्री करताना मडिलगे येथील निवृत्ती विठोबा येसणे याला आजरा पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहात पकडून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
‘ऋग्वेद’ पुरस्काराच्या सुचिता पडळकर मानकरी

आजरा येथील चैतन्य सुजन व सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘ऋग्वेद’ पुरस्कारासाठी सन २०२२ या वर्षाकरिता सुचिता पडळकर कोल्हापूर यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण समारंभ डॉ. शिवशंकर उपासे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता चैतन्य सांस्कृतिक सभागृह महाजन गल्ली आजरा येथे होणार आहे. तरी शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ऋग्वेद मासिकाचे संस्थापक संपादक सुभाष विभुते, संपादक सुनील सुतार व चैतन्य संस्थेचे संतोष जाधव आणि खजिनदार डॉ. अंजनी देशपांडे उपस्थित होते.





