mrityunjaymahanews
गुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

आजरा आंबोली मार्गावर अपघातात विटा येथील तरुण ठार…वाटंगी येथील एका विरोधात पोक्क्सो अंतर्गत गुन्हा नोंद… प्रेम प्रकरण ,मुलाचे पोलिसांकडून मारहाण वडिलांना


 

दुचाकी अपघातात विटा येथील एक ठार

दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात किशोर माणिक माळी (वय 24, रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान ते गवसे दरम्यानच्या घनदाट जंगल परिसरात रस्त्याकडेला घडल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले.

मोबाईल दुरुस्ती कारागीर किशोर माळी हा गोव्याहून सांगलीच्या दिशेने चालला होता. त्याची दुचाकी (एम. एच. 10, डी. एच. 4262)   गवसे ते सुळेरान दरम्यान तुलसी धाब्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या वळणावर आली असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व तो साईड सोडून जावून रस्त्याकडील झाडाला धडकला व त्यात तो गंभीर जखमी होऊन झाडीत जाऊन पडला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर अपघात दोन दिवसापूर्वी झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. जंगलामधील झुडपांमध्ये जाऊन मोटरसायकलसह दुचाकीस्वार पडल्याने सदर घटना उघडकीस येण्यास दोन दिवसाचा कालावधी उलटला. याबाबतची फिर्याद शांताराम पाटील (रा.शेळप) यांनी आजरा पोलीसात दिलीअसून अधिक तपास आजरा पोलीस करीत आहेत.

वाटंगी येथील तरुणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद

वाटंगी (ता. आजरा) येथील अमित मनोहर जाधव (वय 27) याच्या विरोधात पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी जाधव याने अल्पवयीन मुलींचे आजरा येथून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद आजरा पोलिसात दाखल् करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक तपास करून अमित जाधव यास ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस करीत आहेत.

प्रेम प्रकरण मुलाचे… पोलिसांकडूनमारहाण आई-वडिलांना ..

 कोळींद्रे येथील दाम्पत्य पोलिसांच्या मारहाणीत जखमी 

आजरा तालुक्यातील पूर्व भागातील कोळींद्रे येथील एका तरुणाचे गावामध्ये ,पाहुणी म्हणूनआलेल्या निपाणी येथील एका मुलीशी सूत जमले. यातूनच त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे ते दोघे निघून गेले. परंतु याबाबतची फिर्याद निपाणी पोलिसात मुलीच्या पालकांनी दिली.

या फिर्यादीवरून निपाणी पोलिसांनी आजरा पोलिसांकडे चौकशी केली. आजरा पोलिसांनी संबंधित मुलाच्या आई-वडिलांना बोलावून चौकशी केली असता आई-वडिलांनी याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा गडहिग्लज पोलिसांकडून या दांपत्याची चौकशी झाली यातूनही काही निष्पन्न झाले नाही. अखेर निपाणी पोलिसांनी फिर्यादीच्या पार्श्वभूमीवर मुलाचे आई वडील व मुलगी या तिघांना चौकशीसाठी बोलावून घेतले. यामध्ये चौकशीच्या नावाखाली एका कॉन्स्टेबलने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचे वडील गंभीर जखमी झाले. अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच संबंधित कॉन्स्टेबलने दवाखान्याचा खर्च पदरने देऊन सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु यानंतर संबंधित मुलाच्या नातेवाईकांमध्ये व मित्रपरिवार मध्ये संतापाची लाट उसळली.

याबाबत वरिष्ठ पातळीवर न्याय मागणयासाठी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख यांना याबाबतची तक्रार देण्यात आली आहे.आता या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून सुरू झाली आहे मुलाच्या प्रेम प्रकरणातून आई-वडिलांना झालेल्या मारहाणीची चर्चा मात्र सर्वत्र जोरात सुरू आहे.

उचंगी प्रकल्पाच्या कुशीत चाफवडेच्या डाव्या तिरावर लोकसहभागातून आकार घेतंय एक नविन गाव

 

आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाने चाफवडे येथील नविन वसाहतीस (आदर्श वसाहतीस) जलजीवन मिशन योजने अंतर्गत ५८ लाखांची न.पा.पू. योजना व संपुर्ण वसाहतीस ९२ पोलच्या थ्रीफेज, घरगुती व स्ट्रीट लाईट योजनेस महावितरण व जिल्हा नियोजन समितीकडून १८ लाख रुपये असा एकून ७६ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून जून पर्यंत दोन्ही कामे पुर्ण होतील, अशी माहिती सरपंच विलास धडाम यांनी दिली.

उचंगी प्रकल्पामुळे गावकऱ्यांना विस्थापित उचले लोक ही ब्रिदावली न लावू देता आपल्याच मातीत आपण वसवू आपले सुंदर गाव
या संकल्पनेतून दुरदृष्टी ठेवून ५ वर्षे अफाट मेहनत घेऊन
शेतकऱ्यांना संघटीत करून नविन गावची संकल्पना ग्रामस्थांच्या मनात रूजवून तब्बल २० एकर शेत जमिनीमध्ये नियोजनबद्ध लेआऊट प्लॅन आखून १५० निवासी भूखंडाची, रूंद रस्ते व मुबलक सार्वजनिक जागेंसह नविन वसाहत उदयास आणली आहे‌.
सरपंच विलास धडाम, नविन गाव नियोजन कमिटी अध्यक्ष पांडूरंग धडाम, हायकोर्ट वकील अॅड.विजय धडाम, तुकाराम गुरव, संजय गावडे, जानबा धडाम आदींसह ग्रामस्थ व तरूण वर्गाने खूप मेहनत घेतली आहे. डाव्या तिरावरील शेतकऱ्यांनी विनामोबदला आपली शेत जमिन देऊन खूप मोठा त्याग केला आहे.

प्रकल्पात येत्या जूनमध्ये पाणीसाठा झाल्यानंतर चाफवडे गावचा डाव्या तिरापासून पुर्णपणे संपर्क तुटणार असून डाव्या तिराचा नैसर्गिक चर्तुसिमांसहीत स्वतंत्र भु – भाग निर्माण होणार आहे.
थोड्याच दिवसांत आमदार राजेश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांच्याकडे प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या स्वतंत्र भु – भागास नविन महसूल गाव घोषीत करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे नियोजन आहे.

क्रीडा महोत्सवात आजरा हायस्कूल चे घवघवीत यश

कै. केदारी रेडेकर फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये 14 वर्षाखालील गटात रामचंद्र महादेव वासकरने 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक व लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. 12 वर्षाखालील गटात साक्षी बाबू लाडने 100 मीटर धावणे व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर मुलांच्या मध्ये मेहुल दयानंद नेवरेकरने 100 मीटर धावणे, लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक आणि गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकवला. दोन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धे मध्ये मुलीमध्ये तृतीय क्रमांक विजयालक्ष्मी पाटील हिने मिळवला. वैयक्तिक चॅम्पियनशिप पुढील प्रमाणे बारा वर्षे गटात मुलीं मध्ये साक्षी बाबू लाड तर मुलांमध्ये मेहुल दयानंद नेवरेकर तसेच 14 वर्षे गटातील मुलांमध्ये रामचंद्र महादेव वास्कर यांनी पटकावली या खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी व सर्व संचालक मंडळाचे, मुख्याध्यापक शिवाजी येसणे, उपमुख्याध्यापक बी. एम.दरी, पर्यवेक्षक तोडकर यांची प्रेरणा लाभली. तसेच क्रीडा विभाग प्रमुख एम. एस. गोरे, एस. एच. मर्दानी व एम. पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष आजरा परिवर्तन विकास आघाडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!