मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५


जे.पी. नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २४० कोटींची : अध्यक्ष डॉ. उपासे यांची माहिती

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जे.पी. नाईक पतसंस्थेकडे रु.६३ कोटी ठेवी आहेत तर कर्जे ५३ कोटी इतकी येणे आहेत. संस्थेने रु. १५ कोटींची गुंतवणुक केली असून दोन कोटींचा राखीव व इतर निधी आहे. भागभांडवल रु. एक कोटी सत्त्यात्तर लाख वर आहे. गतसालच्या आर्थिक व्यवहारातून सभासदांना १२ टक्के डिव्हीडंड देण्यात आला आहे. संस्थेच्या गडहिंग्लज व कोल्हापूर येथे दोन शाखा आहेत.
आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात २३० कोटींची वार्षिक उलाढाल करणारी संस्था ही जनतेचा विश्वास व पारदर्शक कारभार यांचे द्योतक आहे असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ.शिवशंकर उपासे यांनी केले. येथील जे. पी. नाईक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत व उत्साहात पार पडली. प्रारंभी फोटो पुजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक करुन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी अहवाल वाचन केले. एकसष्टी व पंच्याहत्तरी पूर्ण झालेल्या सभासदांचा आणि दहावी बारावी उत्तीर्ण विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष विभुते यांनी ताळेबंदपत्रक मंजूर करुन घेतले. श्रावण जाधव यांनी नफा तोटा पत्रक मांडले. शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणीचा ठराव मांडला. पुढील वर्षासाठी जमाखर्चाचे अंदाजपत्रक मांडून अहवाल सालात झालेल्या जादा खर्चास शिवाजी कांबळे यांनी मंजुरी घेतली. शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे दोष दुरुस्तीसह वाचन जनरल मॅनेजर संतोष जाधव यांनी केले.
सभेमध्ये अंशदान, पगारदार सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर ११% व्याजदर आकारणे, सुधारित आदर्श उपविधी हया विषयांवर सभासदांना माहिती देण्यात आली. सभेसाठी संचालक, सभासद उपस्थित होते. सभेच्या कामकाजात प्रा. डॉ. राम मधाळे, कृष्णा येसणे, संतोष जाधव, देविदास पाचवडेकर, मधुकर पंडित, एकनाथ गिलबिले, राजाराम नेवरेकर यांनी सहभाग घेतला.
संजय तेजम, निकीता स्वामी, तुषार येरुडकर, सुभाष पाटील, उत्तम कुंभार, एकनाथ कांबळे, प्रताप होलम, सतिश सुतार, कुणाल गुरव यांनी सभेचे संयोजन केले. सभेत पुष्पलता घोळसे, डॉ. अंजनी देशपांडे, अजित तोडकर, सुनिल सुतार, बळवंत शिंत्रे, सुनिल पाटील, चंद्रशेखर बटकडली, प्रकाश ओतारी, पांडुरंग शिपुरकर, रुपाली सातार्डेकर, जाई साळुंखे, संजय कडगावे, मनोज गुंजाटी, मॅनेजर कुरळे, मॅनेजर कोंडुसकर हे उपस्थित होते. सुरेश दास यांनी समयोजित सूत्रसंचालन केले.

जुने कामगार कायदे टिकविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा : कॉ. चंद्रकांत यादव

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)
केंद्र सरकार जुने कामगार कायदे रद्द करून नवी कामगार संहिता लागू करण्याचा प्रयत्न करीत असून त्याला विरोध करण्यासाठी बांधकाम कामगारांनी संघर्षाची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन सिटूचे कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत यादव यांनी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या चौथ्या जिल्हा अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी केले.या अधिवेशनात जिल्हाध्यक्षपदी कॉ. भरमा कांबळे, सचिवपदी कॉ. शिवाजी मगदूम, तर कोषाध्यक्षपदी कॉ. प्रकाश कुंभार यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून कॉ. भगवान घोरपडे, संदीप सुतार, आनंदा कराडे, शिवाजी मोरे, मोहन गिरी व नूर महम्मद बेळकुडे, तर सहसचिवपदी कॉ. विक्रम खतकर, कुमार कागले, रमेश निर्मळे, रामचंद्र नाईक, विजय विरळीकर आणि भरत सुतार यांची निवड झाली.
जिल्हा कमिटी सदस्य म्हणून कॉ. दगडू कांबळे, राजाराम आरडे, शिवाजी कांबळे, अजित मुल्लाणी, अजित मगदूम, नामदेव पाटील, संतोष राठोड, रमेश कांबळे, उदय निकम, मधुकर माने, दिलीप माने, आरंजय पाटील, विजय कांबळे, रामदास सुतार, रामचंद्र सौन्दत्ते, रुपाली मडीवाळ, सुजाता वास्कर व ज्योती कांबळे यांची निवड झाली. तसेच निमंत्रित सदस्यपदी बापु कांबळे, दत्ता गायकवाड, पांडुरंग मोरबाळे, दशरथ कांबळे, हिंदुराव सुतार, अनंत सुतार व महादेव मगदूम यांची निवड झाली.
अधिवेशनात कॉ. शिवाजी मगदूम यांनी अहवाल, तर कॉ. प्रकाश कुंभार यांनी जमाखर्च सादर केला. यावेळी बोलताना प्रकाश कुंभार म्हणाले, आमचा आजरा तालुक्यात हे जिल्हा अधिवेशन १६ वर्षांनंतर घेण्याचे भाग्य लाभले. आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात लाल बावटा संघटना पोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत. या अधिवेशनात झालेल्या कामगार हिताचे निर्णय घेऊन संघर्षासाठी आम्ही कायम तयार राहू.
अधिवेशनाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढण्यात आली. झेंडावंदनानंतर झालेल्या अधिवेशनात सर्व ठराव महिला प्रतिनिधींनी मांडले व अनुमोदित केले. अखेरीस सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. कुमार कागले यांनी आभार प्रदर्शन केले.

आजऱ्यात भगवान श्री वराह स्वामी जयंती उत्साहात साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री वराह स्वामी यांची आजऱ्यात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या सृष्टीच्या निर्मिती मध्ये जीवस्वरूपातून धर्माचे रक्षण करणाऱ्या हिंदू धर्माचे आराध्य असणाऱ्या भगवान विष्णूंचा वराह अवतारास विशेष महत्व आहे.
आजरा येथील श्री राम मंदिर आजरा येथे सायंकाळी आरतीच्या वेळेस भगवान श्री वराह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भगवान श्री वराह स्वामी यांच्या अवतार कार्याची माहिती व त्यांचे हिंदू धर्मातील प्रमुख स्थान यावर वेदमूर्ती श्री सोमनाथ भातखंडे गुरुजी यांनी माहिती दिली. आरती व मंत्रपुष्पने कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी श्री राम मंदिर,आजरा येथील विश्वस्थ श्री जयवंत केळकर,पुजारी अभय जोशी,वामन सामंत, महादेव गवंडळकर , सतीश शिंदे व भक्तगण उपस्थित होते.
उत्तूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता. आजरा) येथे ग्रामपंचायत उत्तूर व ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी यंदा ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत नागरिकांना एक उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या स्पर्धेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, आकर्षक सजावट (प्लास्टिक, थर्माकोल व फटाके वर्ज्य), सामाजिक योगदान, परिसर स्वच्छता व मूर्ती विसर्जन या घटकांवर गुणांकन केले जाणार आहे. विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक ₹२०००/-, द्वितीय क्रमांक ₹१५००/-, तृतीय क्रमांक ₹१०००/- व चतुर्थ क्रमांक ₹५००/- अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक जबाबदारी जपावी, असे आवाहन केले आहे.

वाटंगी ख्रिस्ती समाजाच्या वतीने रेजिना फर्नांडिसिन यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता. आजरा येथील रेजिना डॉमनिक फर्नांडिस यांची आजरा तालुका राष्ट्रवादी पक्ष ( अजित पवार गट ) च्या महिला तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाटंगी येथील ख्रिस्ती समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आजरा येथील पॅरिस प्रिस्ट फादर मेलविन पायस यांच्या उपस्थितीत अर्कंज डीक्रूज, मिलागिन कुरीस, एलिझाबेथ रॉड्रिग्ज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष व सन्मित्र संस्था समूहाचे प्रमुख अल्बर्ट डिसोजा यांच्यासह वाटंगी येथील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू डायस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आजरा येथील आनंदराव नादवडेकर शिक्षक पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. सदाशिव दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात संस्थेचे संस्थापक आनंदराव नादवडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली .सुरुवातीला सेवानिवृत्त सभासद शिक्षक गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक सभासद शिक्षक यांचा सत्कार संस्थापक चेअरमन शिवाजी पंडित, माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशीलकर गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव ,शिक्षण विस्तार अधिकारी ,विलास पाटील यादव साहेब, शिवाजी नांदवडेकर, पुणे विभाग संपर्कप्रमुख सुनील शिंदे, शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके,श्रीमती -मंगला नादवडेकर , बळवंत शिंत्रे, सुभाष विभुते, एकनाथ आजगेकर, विनायक आमणगी ,अनुष्का गोवेकर, शिक्षक समिती अध्यक्ष एकनाथ गिलबिले, सरचिटणीस बळीराम तानवडे, महिला अध्यक्षा सारिका पाटील, सरचिटणीस सुरेखा कांबळे ,यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले, त्यानंतर, मॅनेजर श्री. तुकाराम प्रभू यांनी मागील वर्षाचा वार्षिक अहवाल आणि ताळेबंद सभासदांपुढे सादर केला. त्यांनी संस्थेने वर्षभरात केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेला अहवाल वर्षात ५५ लाख १२ हजार ४२५ इतका विक्रमी नफा झाला असून, संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना चेअरमन श्री. सदाशिव दिवेकर यांनी सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले.
या सभेत श्री सुनील शिंदे, शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके ,संजय भोसले, राजाराम नेवरेकर यांनी चर्चेत भाग घेऊन संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आणि काही विधायक सूचनाही मांडल्या.
याप्रसंगी, संस्थेचे उपाध्यक्षा श्रीमती. शुभांगी पेडणेकर , संचालक श्री.आनंद भादवणकर, ,तुकाराम तरडेकर ,मनोहर कांबळे,एकनाथ गिलबिले, आनंदा पेंडसे , सुभाष आजगेकर ,अनिल गोवेकर, धनाजी चौगुले, सुरेखा नाईक, भारती चव्हाण , कर्मचारी , आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन सौ. भारती चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक श्री. आनंद भादवणकर यांनी केले.

जिल्हा समन्वयक आदरणीय आम्रपाली देवेकर यांची भादवण प्रशालेस भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कोल्हापूर येथे जिल्हा समन्वयकपदी कार्यरत असणाऱ्या आम्रपाली देवेकर यांनी आज भादवण हायस्कूल, भादवण या प्रशालेस भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांकडून घेतली.
शाळेमध्ये राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.सीसीटीव्ही कॅमेरे,सूचनापेटी,तक्रारपेटी, विद्यार्थ्यांवर होणारे विविध अत्याचार, सखी-सावित्री समिती,विद्यार्थी सुरक्षा समिती,वाहतूक सुरक्षा समिती या सर्व दहा मुद्द्यांच्या विवरण पत्राविषयी तसेच विविध शासन आदेशाविषयी शिक्षकांशी चर्चा व मार्गदर्शन केले.
सर्व विषय समित्यांचे शिक्षकांनी लिहिलेले प्रोसिडिंग पाहून समाधान व्यक्त केले.भविष्यातील विद्यार्थ्यांच्या वाटचालीविषयी विविध प्रश्नांच्या आधारे माहिती घेतली.
चर्चेमध्ये मुख्याध्यापक आर.जी.कुंभार, आर.पी. होरटे, पी.एम.वडर, व्ही.एस.कोळी, पी.एस.गुरव, एस.एस.नाईक, बी.पी.कांबळे, एम.व्ही.चव्हाण या शिक्षकांनी भाग घेतला.
प्रशालेचे मुख्याध्यापक आर.जी.कुंभार यांनी स्वागत केले. पी.एस.गुरव यांनी आभार मानले.

यरंडोळ येथे पावसाळी हाफ पिच बॉक्स क्रिकेट स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संयुक्त हिंदु मंडळ, यरंडोळ तर्फे पावसाळी हाफ पिच बॉक्स स्थानिक क्रिकेट स्पर्धा
गुरूवार दि. २८ रोजी सकाळी आयोजित केल्या आहेत.
स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५००१ /-, ३००१ /- व २००१/ – रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
यासह मालीकावीर, सामनावीर यांच्यासाठी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.


