रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५


खंडपीठ मंजूर झाल्या प्रकरणी आजऱ्यात आनंदोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यामधे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मंजूर झाल्याबद्दल आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य वकील यांचे अभिनंदन मराठा महासंघ व आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांच्याकडून करण्यात आले. यावेळी मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष मारुती मोरे व आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शैलेश देशपांडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ॲड. शैलेश देशपांडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ आल्यामुळे त्याचे भविष्यात किती फायदे आहेत याची माहिती दिली.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुतीराव मोरे आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, ॲड. देवदास आजगेकर,ॲड. धनंजय देसाई, ॲड. जी.जे.पाटील,ॲड. सचिन इंजल, ॲड. आर. आर.चव्हाण, ॲड. आश्लेष आजगेकर,ॲड. एल पी पाटील, ॲड परीट, बंडोपंत चव्हाण, सी. आर.देसाई, संभाजी इंजल, वाय. बी. चव्हाण, शिवाजीराव पाटील, जोतिबा आजगेकर, शंकरराव शिंदे, सूर्यकांत आजगेकर, दत्तात्रय मोहिते , शिवाजीराव गुडूळकर, सी. डी. सरदेसाई, निलेश चव्हाण, गणपतराव डोंगरे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
ॲड. धनंजय देसाई यांनी आभार मानले.

पवित्र पोर्टलची शिक्षक भरती चुकीची : सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांचा आरोप
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यता धारक शिक्षकांच्यावर अन्याय झाला असून खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाल्याने अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की पवित्र प्रणाली असे गोंडस नाव दिले मात्र ते फसवे निघाले.ना संस्थाचालकांच्या मनासारखे ना अभियोग्यता धारकांच्या मनासारखे झाले आहे. अभियोग्यता धारकांच्याकडून त्यांना पात्र असणाऱ्या शाळांची यादी दिली त्यामध्ये त्यांनी पसंती क्रम दिले, पसंती क्रम देताना साहजिकच स्वतःचा तालुका त्यानंतर स्वतःचा जिल्हा व त्यानंतर जवळचा जिल्हा अशी पसंती दिली,
मात्र या दिलेल्या जिल्ह्यांपैकी उलटी गिनती करून या जिल्ह्यातील उमेदवार लांबच्या जिल्ह्यात लांबच्या जिल्ह्यातील त्याहीपेक्षा लांबच्या जिल्ह्यात उदाहरणार्थ लातूरचा उमेदवार सातारा जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्याचा उमेदवार सोलापूर जिल्ह्यात असे जाणीवपूर्वक केल्याची बोलले जात आहे.
तसे झाल्याने संस्थाचालकांनी अध्यापनाचे काम थांबू नये म्हणून बऱ्याच पात्र शिक्षकांची नेमणूक पाच वर्षे ते सात वर्षे काहींनी दहा वर्ष आधीच केलेली असते त्यांनी पसंती क्रम दिलेला असतो मात्र एकूण रिक्त जागेपैकी एकही उमेदवार मुलाखतीच्या यादीत आलेला नाही असा बऱ्याच संस्थांना अनुभव आला आहे. त्यामुळे बऱ्याच संस्थांनी मुलाखतीसाठी उमेदवार आपल्याकडे आलेच नाहीत असे रेकॉर्ड करून पवित्र प्रणाली मार्फतच शासकिय यंत्रणेला कळवले आहे. त्यामुळे लांबच्या जिल्ह्यात मुलाखतीसाठी जाऊन सुद्धा अभियोग्यताधारक तेथे गेलेच नाहीत असे समजले जाते. याबाबत पवित्र प्रणाली यंत्रणेने कोणतीही नोंद ठेवलेली नाही त्यामुळे सहाजिकच त्या अभियोग्यता धारकांवर फार मोठा अन्याय झाला आहे.
या भरती प्रक्रियेत मुलाखती घेताना नियमाप्रमाणे पाठ निरीक्षण व मुलाखतीच्या वेळी निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता व्हिडिओ रेकॉर्ड करून जतन करणेबाबत सूचना आहेत असे असताना मात्र बऱ्याच ठिकाणी ऑन कॅमेरा मुलाखती झाल्याच नाहीत याबाबत निवड समितीने कोणतीच पर्यायी व्यवस्था दिली नाही.वास्तविक १:१० उमेदवार मुलाखतीसाठी देऊन ०९ अभियोग्यता धारक उमेदवारांची फरपट केली आहे. जि.प भरती मध्ये ज्याप्रमाणे थेट नियुक्ती केली जाते त्याप्रमाणे खाजगी संस्थांमध्येही थेट नियुक्ती करावी अशी मागणी अभियोग्यताधारकांची आहे.
प्रकल्पग्रस्तांची आधीच फरपट झालेली असते त्यांच्या जीवनातील उपजीविकेचे साधन प्रकल्पासाठी गेलेली जमीन त्यांच्या पुनर्वसनाचा झालेला विलंब हे देखील शासनाने विचारात घेणे गरजेचे आहे, त्यांच्या योग्यतेनुसार थेट नियुक्ती देण्याची गरज आहे. राहिलेली पुढील भरतीची प्रक्रिया जलद गतीने राबवून अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.

वझरे मार्गे जाणाऱ्या गाड्या पूर्ववत सुरू करा…
आगार प्रमुखांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोरोना महामारी काळापासून बंद झालेल्या वझरे- पेरणोली- आजरा आजरा- वझरे- गडहिंग्लज, आजरा- महागोंड- वझरे तसेच घागरवाडी परिसरातील बसलेल्या बंद झाल्या आहेत त्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मार्गावरील बहुतांशी बसफेऱ्या बंद असल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत या भागामध्ये रात्रीच्या वेळी चालत अथवा दुचाकीने जाणे गव्यांच्या उपद्रवामुळे अशक्य आहे. शालेय विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही खबरदारीचा उपाय म्हणून ये-जा करावी लागते. यामुळे या मार्गावरील बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जितेंद्र भोसले, विजय थोरवत, संतोष भाटले, काका देसाई, उपसरपंच मंगल भालेकर,मनीषा आवळेकर, वैशाली जाधव,धोंडीबा परीट, वैभव जाधव, शामराव जाधव, उमेश पाटील, संतोष गुंडप उपस्थित होते.

व्यंकटराव येथे इंग्रजी व संस्कृतचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत इयत्ता नववी व दहावी या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व संस्कृत विषयाचे मार्गदर्शन शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजी येथील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका भाग्यश्री प्रवीण चिकोर्डे यांनी केले.
संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांच्या या संस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमालेत सांगितले. त्याचबरोबर दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत कशा सोडवायच्या याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा सचिव श्री.अभिषेक शिंपी, संचालक श्री. सचिन शिंपी, श्री. सुधीर जाधव ,प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे शेलार व प्रशालेतील इंग्रजी व संस्कृतचे सर्व अध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन श्री. पी.व्ही. पाटील यांनी केले, आभार सौ. एस. डी. इलगे यांनी मानले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात पालक मेळावा संपन्न.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर अंतर्गत पालक मेळावा व व्यसनमुक्ती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम पाहुण्यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकेत व्यसनाधीनतेपासून विद्यार्थ्यांना वाचवायचं असेल तर त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत .पुस्तक वाचनावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे .पालक, विद्यार्थी ,शिक्षक यांच्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे, मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम थांबविण्यासाठी शासन, शाळा, शिक्षक, पालक आणि संस्था यांनी सजग राहिले पाहिजे असे सांगितले .
व्याख्याते श्री. विनायक राजयोग यांनी पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा ही एक विद्यार्थ्यांना संस्कार देणारी शाळा आहे असे शाळेबद्दलचे मत व्यक्त केले.व्यसनमुक्ती या विषयावर बोलत असताना त्यांनी असे सांगितले ,की शरीर हे कचऱ्याचा डबा आहे .यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य बिघडते. यासाठी आपण चांगल्या प्रकारे शरीराला जपले पाहिजे .कारण शरीर हे आपले मंदिर आहे .आत्मा देवता आहे .आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे .आज मुले व्यसनाधीन झालेली दिसतात . त्यामुळे आपला देश कमजोर बनण्याची शक्यता आहे.त्यासाठी प्रथम आपण आपले आरोग्य चांगले ठेवली पाहिजे .व्यसन म्हणजे काय ? व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम हे त्यांनी मनोरंजनातून काही विद्यार्थ्यांमार्फत छोट्याशा नाट्यमय पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. संस्थेचे संचालक श्री. सुधीर परळकर यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले . यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बिरजे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश प्रभू यांनी केले. आभार श्री. विजय राजोपाध्ये यांनी मानले.
पालक मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीही उपस्थित होते.

युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संजय येजरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार) अध्यक्षपदी हालेवाडी येथील संजय येजरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई ,वसंतराव धुरे ,मारुती घोरपडे, दीपक देसाई, शिरीष देसाई, संभाजी तांबेकर अल्बर्ट डिसोझा, एम.के. देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.

छायावृत्त

सोहाळे येथील लोकनियुक्त सरपंच सौ भारती कृष्णा डेळेकर यांना आदर्श सरपंच पुरस्काराने महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
फोटो क्लिक



