शुक्रवार दि.३० मे २०२५







चिमणे येथील उच्चशिक्षित विवाहित तरुणाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चिमणे तालुका आजरा येथील विठ्ठल गंगाराम शिंदे या ४२ वर्षीय तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
गुरुवारी त्याने सदर कीटकनाशक प्राशन केले होते. उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
औषध विक्रेता प्रतिनिधी ( एम. आर. ) म्हणून काम केलेला विठ्ठल हा विज्ञान विभागातून पदव्युत्तर पदवीधर ( एम.एस्सी. ) होता.
त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.



