mrityunjaymahanews
अन्य

 


आजरा कारखान्याचे ऊस बिल व तोडणी वाहतुक बिल जमा-अध्यक्ष शिंत्रे यांची  माहिती

 

आजरा

विशेष प्रतिनिधी 

आजरा साखर कारखान्याकडे सन २०२१-२२ या चालू गळीत हंगामात १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत गळीतास आलेल्या पहिल्या दहा दिवसात गाळप झालेल्या २२६१६ मे, टन ऊसाचे बिल ग्रा मविकास मंत्री हसन मुश्रीफ, व गृहराज्यमंत्री सतेज पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कारखाना गळीत हंगाम शुभारंभावेळी जाहीर केले प्रमाणे ऊस दर प्र.मे.टन रू.२९०० प्रमाणे रु.६.५६ कोटीची ऊस बिले संबंधीत ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावरती वर्ग केल्याची तसेच या कालावधी मधील ऊस तोडणी व वाहतुकीची रू.१.१९ कोटीची बिलेही संबंधीत वाहतुकदारांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांनी दिली. आजरा तालुक्यातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आजरा कारखान्यास पाठवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आजरा साखर कारखाना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक सहकार्याने सुरळीतपणे सद्या सुरू असुन कारखान्याचे दररोज गाळप ३३०० मे.टन प्रमाणे होत आहे. कारखान्याचे १६ नोव्हेंबर २०२१ अखेर ४०४७० मे.टन ऊसाचे गाळप होवून दैनंदिन साखर उतारा १०.६० टक्के असुन सरासरी साखर ऊतारा १०.०७ टक्के प्रमाणे ३७४५० क्विटल साखर उत्पादन झाली आहे. कारखान्याने यापुढे दर दहा दिवसांचे ऊस बिल व ऊस तोडणी वाहतुक विलेही शेतक-यांना व वाहनधारकांना वेळेत आदा करण्याचे नियोजन केले आहे. तसेच ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कारखान्याकडे सद्या स्थानिक व बिड कडील अशी एकत्रित २७० टोळ्या व वाहने कार्यरत आहेत. कारखान्याने ठरविलेले 4 लाख ऊस गाळपाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी कारखान्याकडे नोंद झालेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप कारखान्यामार्फत वेळेत केले जाईल. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद व शेतक-यांनी आपला पिकविलेला ऊस इतर कारखान्यांना न पाठविता आपल्या आजरा साखर कारखान्यास द्यावा तसेच ऊस वाहतुकदारांनी आपली वाहने नियमित ठेवून सहकार्य करावे असे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, आनंदा कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, अशोकअण्णा चराटी, मुकुंदराव देसाई, दिगंबर देसाई, मधुकर देसाई, सुधीर देसाई, दशरथ अमृते, मलिककुमार बुरूड, जनार्दन टोपले, राजेंद्र सावंत, अनिल फडके, आनंदा कांबळे, सौ. विजया लक्ष्मी देसाई तानाजी देसाई तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. टी.ए.भोसले, जनरल मॅनेजर (टेक्नी) व्ही.एच. गुजर, प्रोडक्शन मॅनेजर एस.के.सावंत, सेक्रेटरी व्ही. के. ज्योती, मुख्य शेती अधिकारी एस. आर. चौगुले उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अल्पवयीन मुलीला दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…एकाचवेळी दोन हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर…सुलगाव व वेळवट्टी येथील प्रकार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!