

प्रस्थापितांना धक्क्याचे संकेत
आजरा कारखान्याकरीता सुमारे ६० टक्के मतदान

ज्योतिप्रसाद सावंत
आज साखर कारखान्याकरिता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदारांचा कौल पाहिला असता धक्कादायक निकालाचे संकेत मिळत असून प्रस्थापित व विद्यमान संचालकांमधील अनेकांना निकालानंतर कट्ट्यावर बसण्याची वेळ येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आज झालेल्या मतदानात सभासदांमध्ये फारसे उत्साहाचे वातावरण दिसत नव्हते. सुमारे ६० टक्के इतके एकूण मतदान झाले आहे.(अधिकृत आकडेवारीत थोडाफार बदल असू शकतो)
तर अनुत्पादक ‘ ब ‘वर्ग गटातील मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचलेच नसल्याने या गटांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. याचा परिणाम ब वर्गातील मतदान घटण्याबरोबरच राखीव प्रवर्गातील पाच उमेदवारांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये ब वर्गातील झालेले मतदान पाहता बघता प्रथमच इतके कमी मतदान झाले आहे. दोन्ही आघाड्यांकडून आपल्याच आघाडीला ‘ ब ‘ वर्ग मतदान जादा झाले असल्याचा दावा केला जात आहे. झालेले एकूण मतदान व मतदारांचा कौल पाहता विद्यमान संचालकांपैकी पाच ते सहा संचालकांना सभासदांनी घरची वाट दाखवण्याच्या दिशेने मतदान केले असल्याचे सांगितले जात आहे.
(अंतिम व अचूक मतदानाची आकडेवारी लवकरच देत आहोत…)



