mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दिनांक ९ नोव्हेंबर २०२४

सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा : नाम.हसन मुश्रीफ

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     एका ऐतिहासिक वळणावर अशोक चराटी यांनी पाठिंबा दिला आहे.हे ऋण मी कधीही विसरणार नाही.मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत.पुनर्वसनाचे प्रश्न सोडवत धरणे पूर्ण केली. शेतकरी समाधानी आहे.युती शासनाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराला पुन्हा एक वेळ संधी द्या असे आवाहन मंत्री यांनी केले. आजरा येथे अण्णाभाऊ संस्था समूहाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

     नामदार मुश्रीफ म्हणाले,आज एकही घटक नाराज नाही. त्यामुळे युतीचे सरकार पुन्हा येणार. मतदारांनी पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले.

मंत्री मुश्रीफ व राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी आजरा मतदारसंघात न भुतो न भविष्यतो असा निधी आणला असुन आजरा तालुक्याचा चेहरामोहरा बदलणारे ते एकमेव आमदार असुन आजरा मतदार संघातून आमदार प्रकाश आबीटकर व उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात यांना उच्चांकी मताधिक्य देणार असल्याची ग्वाही अशोकआण्णा चराटी यांनी दिली.

      आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले,या मतदारसंघाचे प्रश्न कसे सुटतील याचे स्वप्न पाहिले होतं. महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघात सर्वांधीक निधी लावुन प्रकल्प कार्यान्वित केले. सगळ्या कामांचे चांगल्या पध्दतीने मुल्यमापन करणारी आजरेकर मंडळी आहेत त्यांना कल्पना आहे कामाचे कोण आहेत व बिनकामाचे कोण आहेत. त्यामुळे त्यांचे मुल्यमापन करून आज-याची जनता आपल्याला भर-भरून आशिर्वाद देतील. अत्यंत चांगल्या पद्धतीने एका पेक्षा एक निर्णय महायुती शासनाने घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये, ७५ वर्षाच्या जेष्टांना एसटी मोफत, मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाची सोय अशा प्रकारचे क्रांतिकारक निर्णय महायुतीच्या सरकारने राबविल्ये असुन ते कायमस्वरूपी रहाणार आहेत.

      प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले.यावेळी त्यांनी शहरासह तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला.

      त्यावेळी रमेश कुरुणकर, अनिकेत चराटी,विजयकुमार पाटील, दशरथ अमृते,बाळ केसरकर, डॉ.अनिल देशपांडे,डॉ.दिपक सातोसकर, सुरेश डांग, निवृत्ती शेंडे, अनिकेत कवळेकर, आतिशकुमार देसाई अमित खेडेकर, दिलावर चांद, विकास बागडी, के.व्ही.येसणे, लहू पाटील, निवृत्ती शेंडे,नेताजी काटकर, मारुती मोरे, संभाजी इंजल, आनंदा फडके, सुरेश रेडेकर, सिद्धेश नाईक ,योगेश पाटील, विजय थोरवत, अश्विन डोंगरे, संतोष भाटले, सुनील डोंगरे, समीर पारदे, इम्रान सोनेखान, सचिन पावले, दत्ता मोहिते, गोविंद गुरव, गणपतराव डोंगरे,अमानुल्ला आगलावे, शिवाजीराव गुडूळकर, शरीफ खेडेकर, महेश कुरुणकर, जुबेर माणगावकर, आय.के. पाटील, शिवाजीराव इंजल, सुरेश गड्डी, संदीप पाटील/ मडिलगे, गौतम भोसले, सिद्धेश नाईक यांच्यासह आजरा व उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवाजीराव पाटील यांना गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांचा जाहीर पाठिंबा

        नेसरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         चंदगड विधानसभा मतदारसंघातील
अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे.

         घराणेशाही थांबावी आणि एका कार्यकर्त्यांला संधी मिळावी यासाठी ही निवडणूक आहे. आज मिळणारा विविध मान्यवरांचा पाठिंबा पाठिंबा त्याची ग्वाही देताना दिसतो. हा पाठिंबा विजयाचा गुलाल लावणारा पाठिंबा असेल असा विश्वास अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. या पाठिंब्यामुळे नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात मोठं पाठबळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. काम करायला ताकद, धमक लागते, कामाची उंची वाढवायची. बाकी विचार करायचा नाही. माझ्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात सध्या अफवा पसरवल्या जात आहेत, मागच्यावेळी देखील अशाच अफवा पसरवल्या गेल्या. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. विकासाच्या मुद्द्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. विकासाची सुरुवात नेसरी पंचक्रोशीत पन्नास कोटींचा निधी देऊन करू, त्यातून विकास काय असतो हे आपण दाखवून देऊ अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. तसेच सध्या १३ धनगरवाडे दत्तक घेतले आहेत. फक्त राजकारण म्हणून नाही कर्तव्य म्हणून काम करतो. त्याच जोरावर माझ्या लाडक्या बहीणी, माझे सैनिक, युवाशक्ती माझ्या पाठीशी आहेत, त्या मला नक्की विधानसभेत पाठवतील असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.

      शिवाजीराव पाटील यांच्याकडे मतदारसंघासाठी व्हिजन आहे, ते आमच्या समविचारी असल्याने आम्ही एकमताने त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आजतागायत खूप मदत केली आहे. आम्ही नेसरी ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर कुणीही निधी द्यायला तयार नव्हते. पण, शिवाजीभाऊ यांनी मात्र, कोणतीही आडकाठी न करता मदत केली. त्यांची काम करण्याची तळमळ पाहता ते नक्कीच विजयी होतील यात शंका नाही अशी अशा गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांनी व्यक्त केली.

      यावेळी स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संग्रामसिंह नेसरीकर, विलास नाईक, विनायक कोळी, आयुब वाटंगी, कुमार पाटील, वसंतराव दवेकर, अजित नांदवडेकर, सिकंदर मुल्ला, विलास पाटील, अजित तुरटे, राजेंद्र नाईक, एम. आर. पाटील, अशोक कांबळे, रवींद्र देसाई, लक्ष्मण खराडे, दत्तात्रय पाटील, मजीद वाटंगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कशाला हवा आमदार नवा ,
आम्हाला आमचा राजेश पाटील साहेबचं हवा वाटंगीतील महिलांचा निर्धार.

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       होऊ घातलेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार) अधिकृत उमेदवार .श्री .राजेश पाटील यांच्या प्रचार मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या महिला भगिनींनी आम्हाला राजेश पाटीलच आमदार हवा अशी भावना व्यक्त केली.

     यावेळी या महिला मेळाव्यासाठी सन्मित्र समूहाचे नेते अल्बर्ट डिसोझा यांनी राजेश पाटील यांनी केलेला सर्वांगीण विकास आणि अंमलांत आणलेल्या विविध योजना विषयी माहिती दिली. आजरा कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि येणाऱ्या २० तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून राजेश पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन केले.

     यावेळी बाबुराव गिलबिले, भीमराव सुतार ,संजय पवार रोमन करवालो, वसंतराव देसाई व गावातील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मलिग्रे- सुळे परिसरात पोलीसांचे संचलन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मलिग्रे- कोळींद्रे परिसरात पोलीसांनी आज संचलन केले. आजरा पोलीसांचे जवान व इंडो तिबेट बार्डर पोलीस फोर्स सहभागी झाले होते. आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले. नेसरी – मलिग्रे रस्त्यावरील स्वागत कमानीपासून संचलनाला सुरुवात झाली. लक्ष्मी मंदीर पासुन पाणोता गल्ली, बुगडे गल्ली, सुतार गल्ली ते ग्रामपंचायत कार्यालय मार्गे स्वागत कमान नं २ सुळे रोड येथे संचलनाची सांगता झाली. यावेळी आजरा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, विठ्ठल कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील रणजित परीट (कोळींद्रे) युवराज देसाई (पोश्रातवाडी ) सहभागी झाले होते.

आजरा आगारात प्रवासी राजा दिन उत्साहात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     येथील आजरा आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन उत्साहात साजरा झाला. विभाग नियंत्रक शिवराज जाधव प्रमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कामगार अधिकारी संदिप भोसले, आगार प्रमुख प्रविण पाटील प्रमुख उपस्थित होते.

     आगार प्रमुख प्रविण पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात आजरा एस.टी. आगाराच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. एस.टी. थांब्याबाबतही चर्चा झाली. आगारात एसटी गाड्या वाढवण्याची सुचना या वेळी करण्यात आली. भादवण, वडकशिवाले, हालेवाडी, उत्तूर येथील प्रवाशांनी गाड्या वेळेत सोडण्याविषयी सांगीतले. यानंतर दुपारच्या सत्रात कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. विभाग नियंत्रक श्री. जाधव यांनी याबाबत पाठपुरावा करणार असून कार्यवाही केली जाईल असे सांगीतले व मार्गदर्शन केले. वहातुक निरीक्षक राजेश मातले यांच्यासह प्रवाशी, कर्मचारी उपस्थित होते.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मुंगूसवाडी येथे मारामारी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews
error: Content is protected !!