mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दिनांक ९ नोव्हेंबर २०२४

एक गेला शंभर आले : अशोकअण्णा चराटी
देवर्डे येथे महायुतीची जंगी सभा... अनेकांचा पाठिंबा जाहीर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       देवर्डे येथील विरोधकांकडे गेलेला नेता हा तुमचा होता आमचा नव्हता, एक नेता गेला परंतु शंभरजण जवळ आले असा माजी सरपंच जी. एम. पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार करत अशोकण्णा चराटी यांनी प्रकाश आबिटकर यांच्यासारखा आमदार पुन्हा होणे नाही नाही असे गौरवोदगार काढले. देवर्डे पंचक्रोशीतून विक्रमी मतदान करून आबिटकर यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.

      देवर्डे येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मेळाव्यास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

       अशोकअण्णा म्हणाले,आजरा शहरासाठी तब्बल १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे काम आमदार आबिटकर यांनी केले. इतका मोठा निधी प्रथमच शहराला मिळाला आहे. देवर्डे सारख्या छोट्या गावामध्ये दोन कोटी ४३ लाखांची विकास कामे केली आहेत. विरोधी उमेदवाराच्या तुलनेत सर्वच बाबतीत उजवा असणारा हा उमेदवार असून शासनाच्या लाडकी बहीणीसह अनेक सर्वसामान्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. सर्वांनीच यावेळी झालेली विकास कामे पाहून त्यांना मदत करावी असे आवाहन केले.

      जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, देवर्डे गावाला चांगल्या आणि खऱ्यांच्या बाजूने राहण्याचा इतिहास आहे.पलीकडे गोड बोलणारा म्हणून प्रसिद्ध असणारा उमेदवार विरोधात उभा ठाकला आहे. अनेकांवर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. दबाव तंत्राला बळी न पडता आमदार आबिटकर यांना निवडून आणावे. सर्वसामान्यांच्या कामामध्ये ते कधीच मागे पडणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी वसंत आढाव, नेताजी पाटील/ कोरी वडे, विजयकुमार पाटील आदींचीही भाषणे झाली.

     सभेत शामराव बोलके,सरपंच सौ. कल्पना चाळके, विशाल आढाव, शैला चाळके, गोपाळ चाळके, राजू दीक्षित, शामराव बोलके, केरबा तानवडे, सर्जेराव पाटील, बौद्ध समाजातील व मातंग समाजातील कार्यकर्ते, लहू पाटील, प्रकाश शिंदे/ वेळवट्टी यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दर्शवला.

      कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अनिरूद्ध केसरकर, सुधीर कुंभार, दशरथ अमृते, विलास नाईक, गोविंद गुरव, संजय पाटील, अनिकेत शिंत्रे,राजू पोतनीस,इंद्रजीत देसाई, तिर्थकुमार सामंत, मारुती चाळके,विनय जाधव, पांडुरंग लोंढे, अरुण देसाई संतोष पाटील, अश्विन डोंगरे, विजय थोरवत, सुनील दिवेकर, काका देसाई, संतोष पाटील, दयानंद पाटील, दयानंद नेऊंगरे, संतोष जाधव, अविनाश जोशीलकर यांच्यासह देवर्डे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      जोतिबा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सुनील पाटील यांनी आभार मानले.

राजेंद्रभाऊ सावंत शिंदे सेनेत…

        शिवसेना संघटक, आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्रभाऊ सावंत यांनी आपल्या पेरणोली व परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांसह उबाठाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

 कोणतेही संविधानिक  पद नसताना शिवाजीरावांनी शंभर कोटीची विकासकामे  केली.- माजी मंत्री भरमूअण्णा पाटील

           चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     गेल्या पाच वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत राहिलेल्या शिवाजी पाटील यांचेकडे कोणतेही संविधानिक पद नसताना शंभर कोटीची विकासकामे स्वतःच्या बळावर केली. त्यामुळे शिवाजी पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करू, असा निर्धार जनसंवाद दौऱ्यानिमित्त नागरिकांनी केला.

     माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, शिवाजी पाटील यांनी पाच वर्षांत चंदगड तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. जनता त्यांच्या कार्याची दखल घेईल यात शंका नाही.

      शिवाजी पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यात आजरा, गडहिंग्लज व चंदगड हा संपूर्ण भाग अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्वतः विविध विकासकामे राबवून गोरगरीब जनतेची कामे केली आहेत. भविष्यात हा भाग विकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल. चंदगड विधासभा मतदार संघातील सर्व सामन्य जनतेचे अपक्ष उमेदवार श्री. शिवाजी पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते संपूर्ण तालुका पिंजून काढीत आहेत. तसेच प्रत्येक गावातून शिवाजी पाटील यांच्या विजयाचा निर्धार केला जात आहे.
शिवाजी पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शेंद्री, हनिमनाळ, निलजी, औरनाळ, मुत्नाळ, माद्याळ, दुंडगे, हिटणी, जरळी, हेब्बाळ क. नूल, हसुरचंपू, नुल आदि भागात जनतेशी संपर्क करून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी आरती करून शिवाजी पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

        शिवाजी पाटील म्हणाले , चंदगड मतदार संघ विकासापासून वंचित आहे. या भागाचा विकास साधून रोजगार उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध राहीन. महिला व युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

निधन वार्ता

सुभाषराव देसाई

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       उचंगी येथील ज्येष्ठ नागरिक श्री. सुभाषराव रामराव देसाई वय ७२ वर्षे यांचे काल रात्री १० वाजता गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात मध्ये हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली आहेत .

       तालुका संघाचे चेअरमन श्री. विठ्ठल राव रामराव देसाई यांचे ते मोठे भाऊ होत. रक्षाविसर्जन उद्या रविवारी सकाळी १० वा. उचंगी येथे आहे.

ट्रक पलटी

धोकादायक वळण कधी काढणार ?

           आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      महागाव – आजरा रस्त्यावर हात्तीवडे गावाच्या पुढील  ओढ्यात वळणावर समोरून अचानक आलेल्या ट्रकला बाजू देणारा सोयाबीनने भरलेला ट्रक ओढ्यातील शिवारात आडवा झाला असून सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.

      गडहिंग्लज येथून सोयाबीनने भरलेला ट्रक आज-याकडे जात असताना हात्तिवडे गावाच्या पुढील वळणावर ओढ्यातील शिवारात आडवा झाला यामुळे आजरा महागाव रस्त्यावरची वेडीवाकडी वळणे काढून रस्ता रूंदीकरण करण्यासाठी बांधकाम खात्याने लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे. धोकादायक म्हणून काढणार तरी कधी ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४ ‘ लस घ्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश!


                         मुंबई 

        हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.*

        भारतात ऑगस्टपर्यंत १५ हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली असून, यातील २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे.

       इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणू वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

लस कधी घ्यावी?

      ज्ञज्ञइन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस १८०० ते २००० रुपये नागरिकांना मोजावे लागतात.(viral News)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक निकाल…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक धुमशान सुरू

mrityunjay mahanews

Big Breaking…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!