



आजऱ्यात दुर्गामातेचे जंगी स्वागत…
विविध कार्यक्रमांची मिरवणुकांत रेलचेल

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये नवरात्र उत्सवाला दणक्यात सुरुवात झाली. दुर्गामाता प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आगमन मिरवणुकांमध्ये भगवा रक्षक, शिवाजीनगर, क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ चाफे गल्ली या मंडळांनी लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे अवघे शहर रस्त्यावर उतरले होते.

भगवा रक्षक तरुण मंडळाचे चेंदा मेलम ड्रम्स यावर्षीच्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. शहरवासीयांनी या चेंदा मेलम ड्रम्सला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात प्रथमच हा कार्यक्रम सादर करण्यात आल्याने कार्यक्रमाबाबत कमालीचे औत्सुक्य दिसत होते. याव्यतिरिक्त महिलांचे लेझीम पथके विशेष आकर्षण ठरले.

शिवाजीनगरच्या दुर्गेश्वरी मिरवणूक तब्बल चार ते पाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीतासह, देखावे, सोंगे, आतषबाजी यांचे आयोजन केल्याने या मंडळाची मिरवणुक जंगी झाली. मिरवणुकीमध्ये तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.

क्रांतिकारी नवरात्रोत्सव मंडळाने वाद्यवृंदाचे आयोजन केले होते. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमालाही उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वाद्यवृंदाने उपस्थितांची चांगलीच करमणूक केली.याव्यतिरिक्त श्री. रवळनाथ नवरात्र उत्सव मंडळ, लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळाच्या मूर्तींचीही प्रतिष्ठांना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर व भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळाच्या मिरवणुका सुरू होत्या.
मिरवणूक कालावधी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहराव्यतिरिक्त तालुक्यातील ५६ मंडळांनी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना उत्साहात केली.पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


भाजप कार्यकर्त्याला नेहमीच संघर्ष करावा लागतो :ॲड. स्वागत परुळेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्र प्रथम या विचाराने काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला नेहमीच संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय भाजपा कार्यकर्त्याला काहीही मिळत नाही असे मत ॲड. स्वागत परुळेकर यांनी मांडले, ते उत्तुर येथे आयोजित उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेल्या नाथाजी पाटील यांचा तर संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी निवड झालेल्या श्रीपती यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नाथाजी पाटील यांनी आंबे ओहोळचे संपूर्ण श्रेय भाजपचे असल्याचे सांगितले त्याच बरोबर युती धर्म पाळणे हीच आपली निष्ठा असली पाहिजे. सर्व सामान्य कार्यकर्त्याला कदापीही वाऱ्यावर सोडणार नाही असेही पाटील यांनी सांगितले.जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार,संतोष बेलवाडे, संदिप नाथबुवा यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अरुण देसाई, विठ्ठल पाटील, प्रा. सुधीर मुंज, शिवाजी अडावकर, जितेंद्र रावळ, दिगंबर मिसाळ यांच्यासह उत्तुर, धामणे, बेलेवाडी, आर्दाळ, महागोंड, वडकशीवाले, झुलपेवाडी, भादवन, मडीलगे, बहिरेवाडी, पेंढारवाडी येथिल भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रा. अभिनंदन परुळेकर यांनी मानले.

वारकरी संप्रदायातील समतेची प्रेरणा, संतानी समाजात रुजवली. डाॅ. प्रा. नवनाथ शिंदे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वारकरी संप्रदायातील मानवतेची, समतेची प्रेरणा आदर्श असून, भक्ती मार्गाने समाजातील जाती धर्माचा आणि उच्च- निच, गरिब- श्रीमंताच्या पलिकडे स्त्री, पुरूष व लहान, थोरांना समानतेची शिकवण देणारी परंपरा संतांनी समाजात रुजवली, ही परंपरा जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे मत डाॅ. नवनाथ शिंदे यांनी मेंढोली ता. आजरा येथील अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखा उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मांडले. अध्यक्षस्थानी ह.भ.प. लक्ष्मण लाड होते. स्वागत व सुत्रसंचालन शशिकांत सुतार यांनी केले.
प्रास्ताविक करताना ह.भ.प. लक्ष्मण शिंत्रे यांनी पोलिस सेवेत असताना ही वारकरी संप्रदायाची वाटचाल जोपासली असून, कानडा विठ्ठलाच्यासेवेमधे लीन होण्यात समाधान असल्याचे सांगितले.

डाॅ. शिंदे म्हणाले, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुलेचा वारसा हा समतेचा असून वारकरी परंपरेत जाती धर्माला व लहान थोरांच्यात भेदाभेदला स्थान नाही. अशी परंपरा असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाची शाखा उद्घाटन निमित्ताने एकमेकांना आपुलकीने भेटल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी तालूका कार्यकारणीचा सत्कार व शाखा पदाधिकारी याना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.
अध्यक्ष लक्ष्मण लाड यांनी देशात आध्यात्मिक व वारकरी परंपरा पुढे असल्याचे सांगितले. यावेळी बाळासाहेब सुतार याचे प्रवचन व विश्राम निऊंगरे यांचे किर्तन संपन्न झाले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी राजाराम जाधव तालूका अध्यक्ष गौरव सुतार, उपाध्यक्ष संतू कांबळे, काॅ.संजय घाटगे, पांडूरंग जोशिलकर, गंगाराम येडगे, दिपाली गुरव, कल्पना जाधव, सरपंच विलास जोशिलकर, पोलिस पाटील मारूती नाईक, शाखा अध्यक्ष प्रकाश घेवडे, भिकाजी नांदवडेकर, म्हकांळी चौगले, जितेंद्र नांदवडेकर, विमल चौगले, आशाताई लाड, मुंबई मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह अखिल भारतीय वारकरी मंडळ आजरा व केदारलिंग माऊली भजनी मंडळाचे कार्यकर्ते व वारकरी उपस्थित होते.
आभार आनंदा कातकर यांनी मानले.

पेरणोलीत भावेश्वरी, कुरकुंदे सेवा संस्थांची सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता आजरा येथील भावेश्वरी व कुरकुंदे विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली. भावेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी अध्यक्ष नारायण सावंत तर कुरकुंदे संस्थेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अमर पवार होते.
यावेळी दोन्ही संस्थेत पूर्वीप्रमाणे शासनाने सम्मती कर्ज, खावटी कर्ज व पिक कर्ज सुरू करण्याचा ठराव मांडला. भावेश्वरीचा ठराव पांडुरंग जोशीलकर यांनी मांडला तर कुरकुंदे संस्थेचा ठराव शिवाजी मस्कर यांनी मांडला. कुरकुंदे संस्थेत ६ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर भावेश्वरी संस्थेत ५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. नोटीस वाचन सचिव अमित सावंत व मच्छिंद्र केळकर यांनी केले.
यावेळी दोन्ही संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. कुरकुंदे संस्थेत संचालक कृष्णा सावंत यांनी तर भावेश्वरी संस्थेत शंकर नावलकर यांनी प्रास्ताविक केले.कारखाना संचालक उदयराज पवार ,पांडूरंग जोशीलकर यांनी आभार मानले.

निधन वार्ता
तुकाराम मांडेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजीनगर,आजरा येथील ज्येष्ठ भाजी व्यापारी तुकाराम हुआप्पा मांडेकर यांचे गुरुवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे. भाजी व्यापारी रामचंद्र,राहुल व लक्ष्मण मांडेकर यांचे ते वडील होत.
अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक ४ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता शिवाजीनगर येथील स्मशानभूमी करण्यात येणार आहेत.

फोटो क्लिक…


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



