सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५


लाटगाव येथून म्हैस चोरीला

सातेवाडी ता. आजरा येथील जानबा पांडुरंग पोतनीस यांच्या मालकीची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद पोतनीस यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
पोतनीस यांच्या घराच्या बाजूला असणाऱ्या लाटगाव हद्दीतील जमिनीत सदर म्हैस बांधली होती. अज्ञात चोरट्याने ती सोडून चोरून नेली. म्हैशीची अंदाजे किंमत तीस हजार रुपये असून आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लक्ष्मीबाई कोंडुसकर यांचे निधन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश कोंडुसकर यांच्या आई व माजी सरपंच, माजी संचालक जनता बँक आजरा, सौ. वृषाली कोंडुसकर यांच्या सासुबाई श्रीमती लक्ष्मीबाई आनंदा कोंडुसकर ( वय ८८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यंच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सून,नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी आज सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता होतील.

विशाल नवारचे कौतुकास्पद यश..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शालेय शिक्षण घेत असताना सुरुवातीला रात आंधळेपणाचा होणारा त्रास… त्यातूनही सुरू असणारी धडपड… पुन्हा पुढे गेल्यानंतर आलेले अंधत्व या बाबींवर मात करत गवसे तालुका आजरा येथील विशाल शिवाजी नवार याने आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लार्क म्हणून नियुक्तीही मिळवली आहे.
अत्यंत बेताची परिस्थिती असणाऱ्या विशाल यांच्या घरच्यांची दोन-तीन गुंठे असणारी जमीन, हॉटेल काम करणारे वडील व मोलमजुरी करणारी आई अशा पार्श्वभूमीवर अंधशाळेत शिक्षण घेऊन राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी मिळवण्यापर्यंत घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहेत त्याच्या या यशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

आजरा तालुक्यात स्मार्ट मीटर धारकांना सवलत प्राप्त-अभियंता अष्टेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महावितरण आजरा तालुका अंतर्गत स्मार्ट मीटर धारक ग्राहकांना माहे ऑगस्ट-२५ मध्ये रु. ७०२७२/- रु. टी.वो. डी. सवलत प्राप्त झाली आहे. आणि याचा लाभ ग्राहक घेत असले बाबत आजरा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर यांनी दिली असून स्मार्ट लावून घेणेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महावितरण कंपनी मार्फत स्मार्ट मीटर बसवून घेणा-या ग्राहकांना टी. ओ. डी. नियमानुसार दिवसा सकाळी ९ ते साय.५ वाजेपर्यंत या वेळेत विज वापर केलेस प्रती युनिट .८०/- पैसे अशी सुट जाहीर करणेत आली होती. त्यानुसार आजरा तालुक्यामध्ये माहे ऑगस्ट-२५ मध्ये एकूण १५,७६५ स्मार्ट मिटर धारकापैकी तब्बल ११,१३९ ग्राहकांनी दिवसा सकाळी ९ ते साय.५ या वेळेत एकूण ८७,८४१ युनिटचा वापर करून रु. ७०,२७२/- इतक्या रकमेची भरमसाट टी. ओ डी. सूट मिळवली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटर बसविणे साठीचा विरोध ही ओसरताना दिसून येत आहे. सध्या आजरा तालुका अंतर्गत एकूण तब्बल ३५,४०० घरगुती व्यापारी ग्राहक असून त्यापैकी १७,५४८ (४९.५७) ग्राहकांना दिनांक ११.०९.२०२५ अखेर स्मार्ट मीटर बसविणेत आले आहेत . उर्वरीत ग्राहकांनीही लवकरात लवकर स्मार्ट मीटर बसवून टी. ओ. डी. सुटचा लाभ घ्यावा असे आव्हान महावितरण आजरा उपविभागचे उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर यांच्या कडून करणेत आले आहे.

व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी राजभाषा दिनानिमित्त मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर हिंदी विषय शिक्षक श्री.डी.आर. पाटील आणि श्रीम.आर. एन.पाटील यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व आणि मुंशी प्रेमचंद यांचे विषयी आपले विचार मांडले.
यावेळी हिंदी विभागातील सौ.एस. डी.इलगे, श्रीम.आर. एन.पाटील, सौ.देसाई एस.वाय., श्री.डी.आर. पाटील ,श्री.व्ही.टी. कांबळे, सौ.ढेकळे एस. पी., श्रीम. बिल्ले एम. व्ही.तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सौ.एस.टी. पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. आर. व्हीदेसाई सर्व व्यंकटराव परिवार व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.व्ही. पाटील यांनी केले व आभार श्री. व्ही.टी कांबळे यांनी मानले.

निधन वार्ता
आनंदा मेंगाणे
आरदाळ ता. आजरा येथील आनंदा विठोबा मेंगाणे ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी,व अविवाहित मुलगा,सुन व नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज सोमवारी १५ सप्टेंबर रोजी आहे.

छाया वृत्त

राघव सरदेसाई युवा मंच यांच्यातर्फे विद्या मंदिर सुलगाव येथे शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयुक्त वस्तू देण्यात आल्या. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते तसेच बजरंग दल आजरा तालुका अध्यक्ष हर्षद सावंत आणि युवा मंचचे अवधूत नाईक,समर्थ सुतार,प्रज्वल मोहिते, हर्षद कोलते इत्यादी उपस्थित होते.

फोटो क्लिक…
स्वच्छ रामतीर्थ… निसर्गरम्य रामतीर्थ…

आज आजऱ्यात…
आजरा – चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा भेटीगाठी व संवाद कार्यक्रम
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : आजरा महाविद्यालय,आजरा


