
मेढेवाडी येथील तरुणाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेढेवाडी, तालुका आजरा येथील आकाश चंद्रकांत वास्कर या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
शेतकरी कुटुंबातील आकाश याचे आई- वडील घराबाहेर गेले असताना गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह राहत्या घरी दुपारी साडेचारच्या दरम्यान आढळून आला . आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
आकाश याच्या पश्चात विवाहित बहीण, आई-वडील असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबातील आकाश याच्या मृत्यूने मेढेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.




