

मोटरसायकल अपघातात एक ठार एक जखमी
चव्हाणवाडी नजीक झाला अपघात

आजरा तालुक्यातील उत्तुर- होन्याळी मार्गावर चव्हाणवाडी नजीक असणाऱ्या रेणुका मंदिराजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात पांडुरंग यशवंत पाटील (वय ६५ रा. होन्याळी,ता. आजरा) यांचा मृत्यू झाला तर मनोहर अंतू खाडे ( वय ४८ रा.होण्याळी हे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी , मनोहर खाडे व पांडुरंग पाटील हे दोघेजण सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उत्तुर येथून दुचाकीवरून होण्याळीच्या दिशेने चालले होते. चव्हाणवाडी रेणुका मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये पाटील व खाडे जखमी झाले.पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम गडहिंग्लज व तेथून पुढे कोल्हापूर येथे हलवण्यात आले उपचारादरम्यान आज (मंगळवारी) त्यांचा मृत्यू झाला, तर खाडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. खाडे हे गडहिंग्लज येथे शिक्षक असून पाटील यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

क्रशर काम उत्खनन प्रकरणी जाधेवाडी ग्रामस्थ आक्रमक…
काम बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा
ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

आजरा तालुक्यातील जाधेवाडी येथे क्रशरच्या माध्यमातून जोरदारपणे उत्खनन सुरू आहे. या क्रशरला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असतानाही क्रशरमधून उत्खनन सुरू असल्याने जाधेवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून सदर काम तातडीने बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा आजरा तहसीलदारांना दिला आहेच पण त्याचबरोबर आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे..
जाधेवाडी ता. आजरा.जि. कोल्हापूर या गावाच्या हद्दीमधील गट नं. ८० या ठिकाणी ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायतीचा विरोध डावलून गेल्या २० ते २५ दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात उत्खननाचे काम चालू आहे. सदर उत्खननामुळे आजूबाजूच्या शेत जमिनीचे, पिकांचे व जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून उत्खनन ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवून देखील संबधीत कंपनी गावकऱ्यांना कोणताही प्रकारची दाद देत नाही. क्रशर काम थांबवण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी तहसीलदार तसेच प्रांत अधिकाऱ्यांना व गट विकास अधिकारी यांना विनंती केली. तरी पण हे उत्खनन आज पर्यंत थांबले नाही अशा आशयाच्या
पत्राद्वारे सर्व जाधेवाडी ग्रामस्थानी तहसीलदारांना विनंती वजा करून त्वरित उत्खनन बंद पाडून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे नाही तर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
दरम्यान आज सर्व जाधेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

छाया वृत्त :-



