दि. २५ सप्टेबर २०२४


कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करा : वसंतराव धुरे
आजरा साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गाळप कमी व खर्च जास्त अशा परिस्थितीमुळे आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला आहे.१७३.८९ कोटींच्या कर्जात कारखाना अडकला आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याशिवाय सद्यस्थितीत पर्याय नाही . यासाठी कारखान्यामध्ये असणा-या मशिनरीत आवश्यक ते बदल करून घेण्यात आले आहेत. येत्या गळीत हंगामामध्ये चार लाख मे.टन गाळप व सरासरी उतारा १३ पर्यंत नेण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. राजकारण हा विषय बाजूला ठेवून कारखाना सक्षमपणे चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे . सभासदांच्या मागणीनुसार कारखान्याचा येता गळीत हंगाम संपताच सभासदांना सवलतीच्या दरातील साखर दिली जाईल अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली.ते वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना गवसेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सुरुवातीला दीप प्रज्वलनानंतर संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष एम.के.देसाई यांनी केले. नोटीस वाचन व अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी केले.
जास्तीत जास्त ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सभेत गौरवण्यात आले.सभासदांच्या वतीने माजी संचालक प्रा.सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर,तानाजी देसाई, सुनील शिंदे,संजय देसाई ,इंद्रजीत देसाई ,तुळसाप्पा पोवार, रियाज तकिलदार यांनी मागील देणे ऊस बिले,वाढीव कर्ज,बाहेरच्या कारखान्यांना जाणारा ऊस, ताळेबंदातील वाढीव अनामत रकमा, मशिनरींची काढलेली कामे, टोळ्यांमध्ये अडकलेले पैसे,प्रलंबित न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले सभासदत्व यासह विविध प्रश्न उपस्थित केले. अध्यक्ष धुरे व संचालक सुधीर देसाई यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिले
सभेस ज्येष्ठ संचालक विष्णूपंत केसरकर, उदयसिंह पवार, सुधीर देसाई,मुकुंदराव देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई,अनिल फडके, दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, राजेंद्र मुरकुटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील,सौ. रचना होलम,सौ. मनीषा देसाई, काशिनाथ तेली, संभाजी पाटील (शिवसेना), अशोक तर्डेकर,हरिबा कांबळे, नामदेवराव नार्वेकर, रशीद पठाण,दिगंबर देसाई,प्रा.सुनिल शिंत्रे, अंजनाताई रेडेकर,आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई, राजेंद्र सावंत, मुकुंदराव तावडे, युवराज पोवार,राजू होलम, आनंदराव जोशीलकर, सुनील शिंदे,अरीफ खेडेकर
यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
एकनाथ गिलबिले यांनी सभेचे सूत्रसंचालन केले तर संचालक काशिनाथ तेली यांनी आभार मानले.
टोळ्यांमध्ये राजकारण करू नका…
पेद्रेवाडी भागामध्ये टोळ्या देत असताना मोठ्या प्रमाणावर राजकारण केले गेले. मागणी करूनही स्थानिक टोळ्या तयार करण्यात आल्या नाहीत. यामुळे सभासद शेतकऱ्यांचा ऊस उचलताना मोठ्या अडचणी आल्या. टोळ्यांमध्ये राजकारण करू नका असे आवाहन माजी संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले. यावेळी युवराज पोवार, सुनील शिंदे, दिनेश कांबळे यांच्यासह सभासदांनी शेती अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

शेतकरी शिवाजी देसाई यांच्या वारसांना अपघाती मृत्यू विमा रक्कम अदा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
के.डी.सी.सी. बँक कोल्हापूर यांचे मार्फत शेतकऱ्यांच्या अपघाती विमा योजनेअंतर्गत सुलगाव ता. आजरा येथील मयत शेतकरी शिवाजी लक्ष्मण देसाई यांच्या वारसांना दोन लाख रुपयांचा धनादेश जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई व आजरा साखर कारखाना संचालक, भावेश्वरी विकास संस्थेचे अध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी प्रल्हाद देसाई,वसंत देसाई, भाऊ कदम, सचिव बसवराज उत्तुरे, बँक निरीक्षक विजय कुंभार, मिलिंद देसाई उपस्थित होते.


हालेवाडी येथील सर्वोदय पतसंस्थेला १२ लाख ५१ हजारांचा निव्वळ नफा- चेअरमन सुनील पाटील यांची माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हालेवाडी येथील सर्वोदय नागरी पतरसंस्थेला आर्थिक वर्षात १२ लाख ५१ हजार ६९१ इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन सुनील पाटील यांनी दिली. तसेच सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
स्वागत संचालक विलास पाटील यांनी केले. श्रद्धाजंली ठराव संचालक महादेव आपगे यांनी मांडला. व्यवस्थापक सुनील पन्हाळकर यांनी मागील सभेचा वृत्तांत, नोटीस वाचन व अहवाल वाचन केले. यावेळी बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, संस्थेकडे अहवाल सालात ८० लाख ६५ हजार तर १० कोटी १७ लाख ६१ हजार ठेवी असून ६ कोटी ३४ लाख ७७ हजार कर्ज वाटप केले आहे. तरतलेपोटी ४ कोटी ८४ लाख ८२ हजारांची गुंतवणूक केली आहे.
यानंतर इयत्ता पाचवी मधील शिष्यवृत्ती पात्र जान्हवी गुरव, दहावी परिक्षेमध्ये यश संपादन केलेल्या समिक्षा येजरे, शर्वरी पाटील, राजनंदीनी पाटील, बारावीमधील किर्ती गेंगे, शिवानी घुरे, तन्वी येसादे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल प्रतिक्षा येसादे, दिव्या जांभळे, अतुल पाथरवट, केतन आजगेकर, स्वप्नील सासुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हा. चेअरमन दिपक येसादे, संचालक सदाशिव पाटील, रविंद्र खोराटे, मारूती घोरपडे, अरूण पाथरवट, रमेश कांबळे, शोभा येजरे, रेखाताई कटाळे यांच्यासह सभासद उपस्थित होते.


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता : समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



