दि. २५ सप्टेबर २०२४


गोवा बनावटीच्या दारूसह पाच लाखांचा मुद्देमाल उत्पादन शुल्कच्या ताब्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-आंबोली मार्गावर, गवसे गावच्या हद्दीत, चाळोबा देवस्थान ,गवसे गावच्या हद्दीत सापळा रचून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारे वाहन मारुती सुझुकी कंपनीची अल्टो चारचाकी गाडी क्रं. एम.एच.-०७-४-०५८१ हे वाहन पकडण्यात आले. सदर कारमधील गोवा बनावटी दारुच्या विविध ब्रॅण्डचे दारु व वाहनासहित एकूण ५०६४००/-किंमतीचा जप्त करुन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी शैलेश विलास तारी याच्यावर बेकायदेशीररीत्या गोवा बनावटी दारुची वाहतूक केलेबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे पी. आर. खरात, निरीक्षक, गडहिंग्लज हे करत आहेत.

१६०० कोटी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार : आम.राजेश पाटील
वाटंगी येथे हनुमान विकास सेवा संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मतदारसंघांमध्ये सोळाशे कोटी रुपयांची विकास कामे केली असून उचंगी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासह या विविध विकास कामांच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असे प्रतिपादन चंदगड आजरा चे आमदार राजेश पाटील यांनी केले.
वाटंगी येथे श्री हनुमान वि.का.स.( विकास ) सेवा संस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम व अल्पसंख्यांक निधीतून ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई होते.
आम. राजेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकपर भाषणामध्ये सन्मित्र संस्था समूहाचे प्रमुख व हनुमान विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी संस्था समुहाच्या वाटचालीसह वाटंगी येथे झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी आम. पाटील म्हणाले, वाटंगी गावात दहा ते बारा कोटी रुपयांची विकास कामे करता आली. वाटंगी- मोरेवाडी धनगरवाडी रस्त्याकरीता ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर करून दिले. उचंगी सारखा पंचवीस वर्षे रेंगाळलेला प्रकल्प आपल्या प्रयत्नाने व मंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून पूर्णत्वास गेला याचे समाधान आहे. उचंगी धरण कृती समितीचे अध्यक्ष व भागातील सर्व कमिटी सदस्य यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
तहसीलदार समीर माने यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी व अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, संस्था स्थापनेच्या वेळी कै. राजारामबापू देसाई, बळीरामजी देसाई यांची मदत निश्चितच झाली. अल्बर्ट डिसोझा यांनी सन्मित्र संस्था समूहाच्या माध्यमातून हनुमान विकास संस्था व इतर संस्था उत्तम प्रकारे चालवल्या आहेत. संस्थांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी सभासदांना भेटवस्तू देण्याबरोबरच संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभय देसाई, आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मधुकर देसाई, संचालक सुभाष देसाई, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, संभाजी पाटील, राजेंद्र मुरकुटे, अनिल फडके, आजरा तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई,संचालक मधुकर येलगार,वाटंगीचे सरपंच बाळू पोवार, जिल्हा बँकेचे विजय सरदेसाई, रवी देसाई, विजय कांबळे, अर्जुन कबीर संभाजी घोरपडे शंकर घेवडे, यशवंत तेजम, सचिव अजित देसाई यांच्यासह मान्यवर, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवाजी नांदवडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.

आजरा महाविद्यालयात मध्यवर्ती युवा महोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा महाविद्यालयात चव्वेचाळीसाव्या तीन दिवसीय मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २९) उद्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील जवळपास दोनशे महाविद्यालयांमधील २५०० ते ३००० विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ. अशोक सादळे, युवा महोत्सव समन्वयक प्रा. डॉ. आनंद बल्लाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांनी दिली.
३५ वेगवेगळ्या कलाप्रकारांत स्पर्धा होणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त कला शिक्षक सागर बगाडे उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख पाहुणे, तर जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी आहेत. आजरा महाविद्यालयात पहिल्यांदाच मध्यवर्ती महोत्सव होत असून, यापूर्वी जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयाने केले होते.
पारितोषिक वितरण आणि सांगता समारंभ मंगळवार दि. १ऑक्टोबरला होत आहे. ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते शरद भुताडिया प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. टी. एम. चौगले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर. डी. ढमकले, ॲड. स्वागत परुळेकर, विद्यापीठ युवा महोत्सव समितीचे सर्व सदस्य, तसेच जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. सादळे यांनी दिली.

योगेश पाटील व शंकर पाटील यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्या, आजरा च्या चेअरमनपदी श्री. योगेश विठ्ठल पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी श्री. शंकर विष्णू पाटील यांची निवड करणेत आली.
निवड प्रसंगी संभाजी पाटील, रामचंद्र लिचम, आनंदा कोरगावकर, इब्राहिम दरवाजकर, श्री. प्रकाश माद्याळकर,प्रा.सुनील शिंत्रे, खताल आगा, म श्रीमती उषा देसाई व सौ.उषा मनोळकर, शिवाजी पाटील, श्री. नारायण कांबळे व संस्थेचे सेक्रेटरी श्री. जयसिंग पाटकर उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्याची आज वार्षिक सभा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची आज बुधवार दिनांक २५ रोजी दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच सभा असल्याने विरोधक या सभेमध्ये आक्रमक भूमिका घेतील असे दिसत आहे.
सभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कारभाराबाबत माजी संचालकांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून यावर सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते.

(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता : समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



