mrityunjaymahanews
अन्य

पिसाळलेल्या मांजराचा आज-यात धुमाकूळ…

पिसाळलेल्या मांजराचा रामदेव गल्लीत धुमाकूळ….
आठ जणांचा चावा घेत केले जखमी

आजऱ्यातील रामदेव गल्ली परिसरात दोन दिवस पिसाळलेल्या मांजराने चांगलाच धुमाकूळ घालत तब्बल आठ जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. अखेर त्रस्त नागरिकांनी संघटित रित्या फिल्डिंग लावून सदर मांजराला यमसदनी धाडले.

गेले दोन दिवस रामदेव गल्ली, उर्दू प्राथमिक शाळा व बाजार मैदान परिसरामध्ये या मांजराचा वावर होता. या भागामध्ये भाजी मंडई,राम मंदिर असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. दिसेल त्याच्यावर हल्ला करून चावा घेणे असे मांजराकडून सुरूच होते. यामध्ये संगीता गावडे( आजरा) सादिक दरवाजकर (आजरा) उमा कुरूणकर (आजरा) जय्यद मनेर (आजरा) विक्रम आगलावे (करंबळी) मीनिक्षा हळवणकर (आजरा) भूमी जंगम (आजरा) किरण शिवाजी बुरुड (आजरा)या जणांना जखमी केले. जखमींना उपचाराकरीता आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजराने गेले दोन दिवस या परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती. अखेर आज नागरिकांनी संघटित रित्या फिल्डींग लावून मांजराला यमसदनी धाडल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भटकी कुत्री, त्रासदायक मांजरे आणि उपद्रवी वानरे…

आजरा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एकीकडे भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या, दुसरीकडे कळपाने शहरवासीयांना त्रास देणारी वानरे आणि आता भरीस भर म्हणून मांजरांचा उपद्रवही सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान वन खात्यासमोर उभे ठाकले  आहे.

….,………………………………………..

 

संबंधित पोस्ट

सर्वसामान्यांच्या चुली पेटवण्याचे काम आम. आबिटकर यांनी केले

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

अर्बन बँक झाली… जनता बँकही झाली तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखान्याच्या बिनविरोधचे काय…???

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी ४२ कोटी ९० लाख रुपये मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

mrityunjay mahanews
error: Content is protected !!