mrityunjaymahanews
अन्य

क्राईम न्यूज

आजरा साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीच्या हरकती फेटाळल्या..

निवडणुकीचा मार्ग खुला

आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती.या मतदार यादीवर १०८१ हरकती प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. त्याची सुनावणी मंगळवार दिनांक १६ व बुधवार दिनांक १७ रोजी झाली. याबाबतचा निकाल आज लागला असून केवळ नावातील बदलाची एक हरकत स्वीकारण्यात आली आहे व तसा बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. इतर सर्व हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.

आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती. या मतदार यादीवर १०८० व्यक्तींनी सभासदत्व रद्द केल्याबाबत हरकत घेतली होती. त्याचबरोबर मीनाक्षी शिवाजी रायकर रा. कोरिवडे यांच्या नावाच्या बदलाबाबत हरकत होती. त्याबाबतचा निकाल आज प्रादेशिक सहसंचालकांनी दिला. रायकर यांच्या नावाची नोंद घालण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

उर्वरित कारखान्याच्या रेकॉर्डनुसार ६३ व्यक्ती या मतदार यादीत समाविष्ट आहेत, तर १०१७ या प्रादेशिक सहसंचालक यांच्या ११ मार्च २०२० च्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. याबाबतचे म्हणणे कारखाना प्रशासनाने दिले होते.

याबाबतच्या निकाल आज(शुक्रवार) जाहीर झाला. ल आहे. प्रादेशिक सहसंचालकांनी जुना निर्णय कायम केल्याने या हरकती फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. २० जून पूर्वी कारखान्याची निवडणूक होणे अपेक्षित आहे त्यामुळे पक्की मतदार यादी प्रसिद्ध होणार असून कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे तरी देखील पावसामुळे सदर कार्यक्रम लांबण्याची शक्यता आहे.

ऊस तोडणी यंत्रणा पुरवतो म्हणून सुमारे पावणेदोन कोटींचा गंडा

 

रात्री उशिरापर्यंत फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू

 

आजरा तालुक्यातील ३५ वाहतूकदारांची विविध ऊसतोड मुकादम, मजूर पुरविणारे यांनी १ कोटी ६७ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि. १९) रोजी दिवसभरात या तक्रारी आजरा पोलिसांत करण्यात आल्या आहेत.

आजरा पोलिस स्टेशनमध्ये दिवसभरात ३५ फसवणूक झालेल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली आहे. फसवणूक करणार्‍या व्यक्ती बीड, वासिम, उस्मानाबाद या जिल्ह्यातील आहेत. फसवणूक झालेले वाहनधारक व टोळीवाले हे तांबाळे, संताजी घोरपडे, आजरा, गडहिंग्लज या साखर कारखान्याशी संबंधित आहेत.

फसवणूक झालेल्यांमध्ये विजयकुमार पाटील, विलास नाईक आदींचा समावेश आहे

आठवडा बाजारात तीन मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला

आजरा येथे आठवडी बाजारात अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईलवर डल्ला मारला.यामध्ये मोटोरोला कंपनीचा ८ हजार किंमतीचा,६ हजार किंमतीचा आयटेल कंपनीचा व ८ हजारांचा रेडमी नोट कंपनी यांचा समावेश आहे.याबाबतची तक्रार आजरा पोलीसात दाखल झाली आहे.

मे महिन्यात सुट्टीला गावी आलेल्या चाकरमानी मंडळींचे मोबाईल उचलणे पाकिट मारणे असे प्रकार आठवडा बाजारात वाढले आहेत.

निधन वार्ता

 

शैफुल्ला पठाण

आजरा येथील नाईक गल्लीतील शैफुल्ला युसुफ पठाण (४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!