mrityunjaymahanews
अन्य

आजरा साखर कारखाना निवडणूक….

आजरा साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीच्या हरकतीवर सुनावणी पूर्ण

दोन दिवसात निकालाची शक्यता

आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती.या मतदार यादीवर १०८१ हरकती प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. त्याची सुनावणी मंगळवार दिनांक १६ व बुधवार दिनांक १७ रोजी झाली. याबाबत दोन दिवसात निकाल अपेक्षित आहे.

आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीवर १०८० व्यक्तींनी सभासदत्व रद्द केल्याबाबत हरकत घेतली होती. त्याचबरोबर मीनाक्षी शिवाजी रायकर ( रा. कोरिवडे )यांच्या नावाच्या बदलाबाबत हरकत होती. त्याबाबत ही सुनावणी झाली आहे.

प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे याबाबत दाद मागितली आहे. त्यापैकी कारखान्याच्या रेकॉर्डनुसार ६३ व्यक्ती या मतदार यादीत समाविष्ट आहेत उर्वरित १०१७ या प्रादेशिक सहसंचालक यांच्या ११ मार्च २०२० च्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. याबाबतचे म्हणणे कारखाना प्रशासनाने दिले आहे.

दोन दिवसात याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे २० जून पूर्वी कारखान्याची निवडणूक होणे अपेक्षित आहे त्यामुळे पक्की मतदार यादी लवकर प्रसिद्ध होणे आवश्यक असून ही यादी प्रसिद्ध होण्यास विलंब झाल्यास कारखान्याची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

मुनीर लतीफ यांचे निधन


आजरा येथील स्टॅम्प रायटर अब्दुल मजीद लतीफ यांचे चिरंजीव मुनीर अब्दुल मजीद लतीफ (वय ४२) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा,दोन भाऊ असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!