mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरूवार ४ जून २०२६

हिरण्यकेशी काठावरील मोटर पंपांच्या एक लाख ६३ हजारांच्या केबल चोरीस


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिरण्यकेशी नदी काठावरील चांदेवाडी व हाजगोळी खुर्द गावातील २० शेतकऱ्यांच्या मोटर पंपाच्या तांब्याच्या केबल्स अज्ञात चोट्याने लंपास केल्या आहेत. २७ मार्च रोजी पेद्रेवाडी नदीकाठावर असाच प्रकार घडला होता. तांब्याचे दर वाढल्याने चोरट्यांनी हा प्रकार अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

नाना विष्णू गुंजकर यांनी याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात आगरा पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत. सध्या केबलचे दर वाढल्याने याचा फटका शेतकरी वर्गास मोठ्या प्रमाणावर बसत आहे.

उत्तूरमध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ; लाखोंची तांब्याची भांडी लंपास

उत्तूर :  मंदार हाळवणकर

उत्तूर येथील इंदिरानगर, तळेगल्ली व कुंभार गल्ली परिसरात मंगळवारी मध्यरात्री भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालत अनेक घरांमध्ये चोरी केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी येथील संजय हातरगे, बाळू यमगेकर, मारुती आजगेकर, तुकाराम इंगळे व साताप्पा लवटे यांच्या घरांना लक्ष्य केले. घराबाहेर ठेवलेले तांब्याचे हांडे तसेच पाणी तापवण्यासाठी वापरण्यात येणारे तांब्याचे बंब चोरट्यांनी लंपास केले. चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती समजताच नागरिकांनी संताप व्यक्त केला असून परिसरात रात्री गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

चोऱ्या भुरट्या… पण मुद्देमाल लाखोंचा

तालुक्यात भुरट्या चोऱ्या होत असल्या तरी चोरी होणाऱ्या मुद्देमाल हा लाखोंच्या घरात आहे. सध्या तांब्या पितळेचे दर वाढल्याने चोरट्यांनु तांब्या व पितळेच्या भांड्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. अनेक जण पाच-पन्नास हजारासाठी कशाला पोलिसांत असा विचार करत असल्याने चोरट्यांचे फावत आहे.

सुट्टी अंतिम टप्प्यात…
वाहतुकीची कोंडी


शहरातून संकेश्वर- बांदा मार्ग जात असल्याने वहातूक कोंडीचा प्रश्न नेहमीचा बनला आहे. लग्नसराई, यात्रा जत्रांच्या काळात वहानांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळते. एखादे वहान रस्त्यात बंद पडले तर वहातूक विस्कळीत होते. त्यामुळे आजरा शहराच्या बाहेरून बाह्यवळण रस्ता तयार करण्याची गरज ठळक बनली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. पाठपुरावा करून रस्त्याचे काम मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.

संकेश्वर- बांदा महामार्ग हा आजरा शहरातून जातो. सध्या उन्हाळी सुट्ट्या अंतिम टप्प्यात असल्याने या मार्गावर कोकण व गोव्याकडे जाणारी वहानांची संख्या मोठी असते. हजारो पर्यटक दररोज या मार्गाने प्रवास करीत असतात. त्याचबरोबर ग्रामिण भागातून नोकरी, व्यावसाय, शिक्षण, शासकीय कामे, बाजार व अन्य कामासाठी शहरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बऱ्याचदा शहरातील रस्ते वहानाने भरलेले पहावयास मिळतात. या वेळी अनेकदा वहातूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळते. पण लग्नसराई, यात्रा- जत्राच्या हंगामात वहातुकीची परिस्थिती बिकट असल्याचे दिसते. या काळात यात्रेकरूंची वहाने मोठ्या प्रमाणात शहरात दाखल होत असतात. परिणामी रस्त्यावर वहानाची रांग लागल्याचे दिसते. वहातुकीची कोंडी होते. ही कोंडी हटवणे कठीण बनलेल्याचे अनेकदा दिसते. यात एखादे वहान बंद पडले तर बघायला नको. दुतर्फा वहाने थांबलेली असतात. तर काही वेळा कुर्मगतीने वहाने सरकत असल्याचे पहावयास मिळते. वहातूकीच्या कोंडीही शहरवाशीयांची डोकेदुखी झालेली आहे. अनेकजण विविध कार्यक्रमासाठी बाहेर पडलेले असतात. नेमके तेच कोंडीत सापडतात.अशी वहातूक कोंडी झाली तर वहानातील नागरीकांना उष्म्यामुळे जीव नकोसा होतो. शहरात वहातुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ताण दूर करण्यासाठी शहराच्या बाहेरुन बाह्यवळण रस्ता (बायपास) होणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधीनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. बाह्यवळण रस्त्यामुळे किमान वहातूक कोंडीचा प्रश्न सुटेल असे अनेकांचे मत आहे.

मध्यंतरी खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष घातले असून आजरा व गडहिंग्लज शहराना बाह्यवळण रस्त्याबाबत चर्चा घडवली आहे. तसा प्रस्तावही दिला आहे.

निधन वार्ता

विठाबाई गुंजकर

गडहिंग्लजच्या माजी नगरसेविका सौ श्रद्धा सुनील शिंत्रे यांच्या आई  श्रीमती विठाबाई लक्ष्मण गुंजकर ( वय ७५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

अंत्यविधी आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे आहे.

नर्मदा देसाई


वाटंगी ता. आजरा येथील नर्मदा नानासाहेब देसाई ( वय १०५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले,सूना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

येथील रवळनाथ संस्थेचे सचिव अजित देसाई व रवळनाथ उद्योग समूहाचे प्रमुख विजयराव देसाई यांच्या त्या आई होत.

शामराव कांबळे


आरदाळ तालुका आजरा येथील शामराव बाळू कांबळे (वय ७३ वर्षे )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.प्रा. जयप्रभू कांबळे यांचे ते वडील होत.

ओमकार येसणे

मडिलगे तालुका आजरा येथील ओमकार बापू येसणे ( वय ३९ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ४ जून २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी (रात्री ११.३० पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (५ जून पहाटे ०३.४१ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : शुक्ल योग (सकाळी ०९.०२ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : भाव करण (सकाळी १०.२७ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : धनु राशी (सकाळी ०७.४१ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.४६ ते दुपारी ०३.५५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.०१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

महत्त्वाच्या बातम्या 

♦ दक्षिण दिल्ली असणाऱ्या ‘ फ्लरिष स्प्रे बी एन बी’ हॉटेलमध्ये बुधवारी लागलेल्या आहेत २१ जणांचा मृत्यू झाला या आगीमध्ये ११ परदेशी नागरिक भक्षस्थानी पडले आहेत. ३५ जण जखमी झाले असून १९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

♦ कौटुंबिक वादातून डोक्यात सत्तुरने वार करून वडिलांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याप्रकरणी शिरे/कोल्हापूर येथील मुलगा रेहान मुजावर व त्याचा मित्र पीर पाशा सैदूलाल जहांगीरदार यांना पोलिसांनी अटक केली आहे.

♦ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या ८१ लाख लाभार्थ्यांनी गेल्या २२ महिन्यात राज्य सरकारचे जवळपास २६७३० कोटी रुपये उचलले आहेत. १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे.

कराडचा ३.४७ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल २० जून नंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे..

गोकुळ न्यूज

Ο कायद्या विरोधात जाऊन सभासदत्व दिलेल्या ४२७ दुध संस्थांना वगळण्यात आले आहे. तसे आदेश विभागीय उपनिबंधक /दुग्ध यांनी जारी केले आहेत. यामुळे या संस्थांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

Ο या आदेशावरोधात नऊ दूध संस्था याचिका दाखल करणार आहेत.

Ο दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभवाचा दणका दिलेल्या धनंजय महाडिक यांना स्वाभिमानी सभासद गोकुळमध्येही धडा शिकवतील असा उपरोधिक टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोळगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण…ओढ्याच्या पाण्यात पडून किटवडे येथील एकाचा मृत्यू…जनता बँकेने नवउद्योजक निर्माण केले : खासदार संजय मंडलिक…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!