mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

बेलेवाडीत विवाहितेचा विनयभंग व मारहाण

पाच जणांवर गुन्हा दाखल


                  आजरा : प्रतिनिधी

         बेलेवाडी हु|| ता. आजरा येथील विवाहितेचा विनयभंग करून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद २७ वर्षीय विवाहितेने पोलिसांत दिली आहे.

        या प्रकरणी संध्या सुनील जोशीलकर (रा.गडहिंग्लज), महादेव आनंदा रामाणे, स्नेहल महादेव रामाणे, लक्ष्मीबाई शामराव शिंत्रे, शामराव शांताराम शिंत्रे (चौघेही रा. बेलेवाडी हुll ता. आजरा) यांच्याविरुद्ध उत्तूर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

         पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे करीत आहेत.


पेरणोलीत बहुरंगी लढत
१०४ जणांची माघार
चांदेवाडी बिनविरोध

                   आजरा : प्रतिनिधी

       आजरा तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या दहा ग्रामपंचायतीसाठी आज माघार झाली . तब्बल १०४ जणांनी अर्ज माघारी घेतले . पेरणोली ग्रामपंचायतीसाठी बहुरंगी लढत होणार आहे . तर चांदेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूका माघारीनंतर बिनविरोध झाली आहे.

        सरपंचपदासाठी दाखल झालेल्या ४३ अजापैकी २३ जणांनी माघार घेतली आहे. सदस्यपदासाठी दाखल झालेल्या २२४ जागांपैकी ८१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुक रिंगणात सरपंचपदासाठी २२ तर सदस्यपदासाठी १४३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहीले आहेत. पेरणोली ग्रामपंचायतीसाठी बहुरंगी लढत होणार असून अन्य सहा ग्रामपंचायतीसाठी दूरंगी सामना होणार आहे.

        वेळवट्टी ग्रामपचायतीत दोन प्रभाग बिनविरोध झाले असून एका प्रभागासाठी निवडणूक होत आहे. तर देऊळवाडी ग्रामपंचायतीत एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

       मेंढोली, हरपवडे, मसोली,बुरूडे, इटे , सुलगाव येथे दुरंगी लढत होणार आहे.

ग्रामपचायत निहाय उमेदवार संख्या पुढीलप्रमाणे (कंसात सरपंचपद उमेदवार संख्या)

मेंढोली- (३) १९,  मसोली- (३) १९,  बुरुडे – (२) १४,  सुलगाव- (२) १५, पेरणोली- (५) २९, वेळवट्टी- (१) ९,  देऊळवाडी- (१) ७, हरपवडे- (२) १३,  इटे- (२) १४, 

बिनविरोध-चांदेवाडी-(१) ७


देवर्डेच्या उपसरपंचपदी मारुती बुरुड यांची निवड

                  आजरा : प्रतिनिधी

           देवर्डे (ता. आजरा) येथील देवर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मारुती (पिंटू) भिकाजी बुरुड यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. सरपंच जी. एम. पाटील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

         ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता चाळके यांनी उपसरपंचपदासाठी श्री. बुरुड यांचे नाव सुचविले.

        सरपंच श्री. पाटील म्हणाले, गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. बुरुड यांना उपसरपंचपदाची संधी दिली आहे. त्यांनी संधीचे सोने करावे. सर्वांना विश्वासात घेवून कारभार करावा. उपसरपंच बुरुड यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पना चाळके, शीला गुरव, यशोदा कांबळे, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, मारुती पाटील, विजय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यासह विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक डी. एल. वायदंडे यांनी आभार मानले.



पेन्शन धारक सुखावले…
शासनाच्या विविध योजनांची पेन्शन जमा

                       आजरा : प्रतिनिधी

         आजरा तालुक्यामधील शासनाच्या विविध पेन्शन घेणाऱ्या लाभधारकांची पेन्शन बँक खात्यावर जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी आज पेन्शनधारकांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये उडाली होती.

       जुलै, ऑगस्ट महिन्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनाची थकीत असणारी पेन्शन जमा झाली आहे. दसरा झाल्याबरोबर ही पेन्शन जमा झाल्याने पैशाची उचल करण्याकरता आजरा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत मोठी गर्दी केली होती. एकंदर पेन्शन जमा झाल्याने लाभार्थी मात्र सुखावले आहेत.


संक्षिप्त…

        व्यंकटराव प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. प्रशांत गुरव यांना ना. हसनसो मुश्रीफ फाउंडेशन, कागलचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला.

         यावेळी आमदार विक्रम काळे (शिक्षक मतदार संघ छत्रपती संभाजी नगर विभाग) कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक ( व मा. नामदार हसनसो मुश्रीफ( वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


मडीलगे येथे दुर्गामाता दौड उत्साहात

         शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मडिलगे आजरा विभाग महादुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. यावेळी शिवभक्त तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अभियंता अक्षयचा आकस्मिक मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

९ लाखांच्या दरोडा प्रकरणी १० अटकेत…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!