mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


दि. १२ सप्टेबर २०२४


कुछ तो गडबड है… घंटागाडी न येताच क्यू आर कोड होत आहेत स्कॅन…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     शहरभर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना आजरा शहरामध्ये घंटागाडीचा पत्ताच नाही परंतु क्यूआर कोड स्कॅन करून घंटागाडी शहरभर येऊन गेली असा फार्स सध्या सुरू आहे. यामागे मोठी यंत्रणा कार्यरत असून शहरवासीयांना चुना लावणाऱ्या या यंत्रणेच्या पाठीशी नेमके कोण आहे? असा सवाल आता शहरवासीय उपस्थित करत आहेत.

      आजरा शहराच्या स्वच्छतेची अवस्था अत्यंत दयनिय बनली आहे. शहरभर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. शहरवासीयांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना सकाळी- सकाळी कचरा उचल करण्याच्या नावावर ठिकठिकाणीच्या घरावर लावलेले क्यूआर कोड काही मंडळी परस्पर स्कॅन करून जात आहेत. घंटागाडी येत नसताना क्यू आर कोड स्कॅन करण्यामागची गौडबंगाल कायम आहे.

      याबाबत नगरपंचायतीच्या या विभागाशी संबंधित मंडळींशी संपर्क साधला असता सर्वांनीच कानावर हात ठेवले आहेत. चौकशी करतो… सूचना करतो…बघतो अशा आशयाची पारंपारिक पद्धतीने उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. अनेक शहरवासीय या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत.

      घंटागाडी नियमित येत नसताना ज्या अर्थी क्यू आर कोड स्कॅन होत आहेत त्याअर्थी स्वच्छतेच्या नावावर कोणाची तरी कांहीतरी गडबड सुरू आहे हे निश्चित… ही गडबड किरकोळ नसून मोठ्ठा आर्थिक ढपला पाडणारी असल्याचे शहरवासीयांतून बोलले जात आहे.

हत्तीच्या हल्ल्यातील शहिद वन कर्मचारी पाटील यांच्या स्मारकाचे उद्घाटन

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        प्रकाश पाटील यांनी जीवाची पर्वा न करता हत्ती परतवण्याची जोखीम स्विकारून कर्तव्य बजावत असताना हत्तीच्या आल्यात ते शहीद झाले होते. त्यांचे वनविभागासाठी योगदान अमुल्य व प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन कोल्हापुरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी केले.

      आजरा येथील सुलगाव रोपवाटीकेमधील वनविभागाच्या कार्यालयात आज वनशहिद दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते वनशहिद (कै) प्रकाश पाटील यांच्या स्मारकाचे उ‌द्घाटन झाले. वर्षभरापूर्वी घाटकरवाडी (ता. आजरा) येथील जंगलात जंगली हत्तीने केलेल्या हल्यात पाटील शहीद झाले होते. त्यांचे स्मारक येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर उभारण्यात आले आहे.

      वनपाल टी. एच. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जी. गुरुप्रसाद म्हणाले, पाटील कुटुंबीयासाठी वनविभागाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत. महीनाभरात पाटील यांच्या वारसाला वनविभागात नोकरी दिली जाईल. त्यांच्या कुटुंबाला इथून पुढेही सर्वतोपरी सहकार्य राहील. त्यांच्या हौतात्म्याने सर्वांना कर्तव्याची जाणीव करून दिली असून त्यांची स्मृती चिरंतन राहील. (कै) पाटील यांच्या स्मारकाला अधिकारी, कर्मचारी व नातेवाईक यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी, सागर यादव, भरत निकम, संदिप शिंदे, दत्तात्रय पाटील, वनरक्षक टी. एस. लटके यांच्यासह वनरक्षक, कर्मचारी, वनमजूर व हत्ती हाकारा गटाचे सदस्य उपस्थित होते.

भादवण विकास सोसायटीला ३ लाख ८४ हजारांचा नफा


            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भादवण (ता.आजरा )येथील गा भादवण विकास सेवा सोसायटीला गत आर्थिक वर्षात ३ लाख ८४ हजाराचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना ५ % लाभांश देणार असल्याची माहिती संस्था चेअरमन मारुती देसाई यांनी वार्षिक सभेत दिली.

     संस्थेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्सहात संप्पन्न झाली. श्रद्धांजली ठराव संचालक अशोक गुरव यांनी मांडला.स्वागत व अहवाल वाचन सचिव सुभाष पाटील यांनी केले, संस्थेने अहवाल काढून जमाखर्च मांडल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले, यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन व सचिव यांनी समाधानकारक उत्तरे दिली, सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेकडून मिळणाऱ्या विविध कर्ज योजना व सुविधा यांची माहिती सभेत देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत सभासदांनी भाग घेतला.

      सभेस व्हा. चेअरमन दशरथ डोंगरे, पांडुरंग केसरकर संभाजी कांबळे,रत्नाप्पा कुंभार,दत्तात्रय पाटील पांडुरंग जोशीलकर, गजानन गाडे,एम. टी. मुळीक, दत्ता पाटील, सौ. रुक्मिणी पाटील, श्रीम.. रत्नाबाई केसरकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.

      आभार संचालक पांडुरंग केसरकर यांनी मानले.

गणेश दर्शन

नागनाथ तरुण मंडळ लाटगाव

अध्यक्ष – विजय मारुती चौगुले
उपाध्यक्ष – सुधिर रामदास सुपल
सचिव/खजिनदार – अनिल पाटील
मूर्ती देणगीदार – सागर कृष्णा मोहिते


समता ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोहाळे

अध्यक्ष : चंद्रकांत मारुती कोंडूसकर
उपाध्यक्ष : प्रकाश गणपती दोरुगडे
सचिव : सचिन धोंडीबा कळेकर
खजिनदार : उत्तम बंडू डेळेकर
मुर्तीकार : राजू कुंभार (दुंडगे, गडहिंग्लज )


 


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!