mrityunjaymahanews
अन्य

मडिलगे येथील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू

मडिलगे येथील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू

आजरा मडिलगे येथील दिनकर जानबा कडगावकर (वय ५८) यांचा व्हडगेवाडी नावाच्या शेतातील विहिरीमध्ये पाय घसरून पडून मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.अधिक तपास आजरा पोलीस करीत आहेत.

देशाच्या वाटचालीत युवाशक्तीची भूमिका महत्त्वाची

देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवीन भारत घडविण्यामध्ये युवाशक्तीवर महत्त्वाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. प्रचंड क्षमता असणारा भारत हा देश असून पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नातून देशाला सक्षम बनवण्याचे काम सुरू आहे. या विधायक कामांमध्ये तरुणानी  साथ द्यावी असे आवाहन वाहतूक व उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. आजरा येथे नवा मतदार युवक युवतींशी संवाद प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री सिंधिया म्हणाले, देशातील एकूण लोकसंख्येपैकी ९० कोटी लोकसंख्या तरुणाईची आहे. यामुळे युवा पिढीच्या हाती परिवर्तनाची सर्व सूत्रे राहणार आहेत व ते परिवर्तन आता दिसणे गरजेचे आहे. पंतप्रधानांकडे विविध संकल्पना आहेत. सर्वांचा साथ सर्वांचा विकास, सामूहिक प्रयत्न याच्या माध्यमातून देश बळकट करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले उचलली जात आहेत. पाच कोटी लोक हे जगभरात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहेत. यामध्येच देशाच्या तरुणाईची ताकद अधोरेखित होते असेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी नोकऱ्या मागणारे न बनता नोकऱ्या देणारे बनावे असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या ७० वर्षांमध्ये केवळ रस्ते, वीज, पाणी या सुविधावरच लक्ष केंद्रित करण्यात आले. याव्यतिरिक्तही अनेक प्रश्न दुर्लक्षित असल्याने मोदी सरकारने अनेक महत्त्वकांक्षी योजना राबविल्या.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले.

यावेळी शिवाजी पाटील, समरजितसिंह घाटगे, भरमूअण्णा पाटील,जनार्दन टोपले, आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,सुधीर कुंभार,अजित हरेर, डॉ. दीपक सातोसकर, भैया टोपले, किशोर भुसारी, सौ.सुरेखा भालेराव,सौ.अनिता नाईक, शकुंतला सलामवाडे, अनिकेत चराटी, विलास नाईक आनंदा कुंभार,राजू पोतनीस, दशरथ अमृते, अरुण देसाई, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, प्रशांत गंभीर, सचिन इंजल, राजू पोतनीस, विठ्ठल चव्हाण, शिवाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री सिंधिया यांनी तरुणांशी थेट संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली.

कोल्हापुरात २८० कोटींचे नवीन विमानतळ उभे करणार

कोल्हापूर जिल्ह्याची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञान व कोल्हापूरचा इतिहास याची सांगड घालून लवकरच कोल्हापूरच्या इतिहासाला शोभेल असे नूतन विमानतळ उभारणीच्या हालचाली सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल असेही यावेळी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

अंदाजपत्रकाबाबत नगरसेवक अंधारात

महत्त्वाची नगरपंचायतीची बैठक तहकूब करण्याची अधिकाऱ्यांवर नामुष्की

गरसेवकांना सन २०२३-२४ सालच्या अंदाजपत्रकाबाबत कोणतीही कल्पना न देता सभा सुरू झाल्यानंतर अंदाजपत्रक मंजूर करून घेण्याचा अधिकाऱ्यांचा डाव आक्रमक नगरसेवकांनी उधळून लावला अखेर नगरपंचायतीची ही महत्त्वाची बैठक तहकूब करण्याची नामुष्की अधिकाऱ्यांवर आली.

आजरा नगरपंचायतीच्या सण २०२३-२४ सालाकरीताच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्याकरिता आज सोमवारी विशेष बैठक बोलवण्यात आली होती. सुरुवातीला कार्यालयीन अधीक्षक संजय यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी अंदाजपत्रक मांडण्यास सुरुवात केली. मुळातच या अंदाजपत्रकाबाबत आपणाला काहीच कल्पना नाही. आपण वाचनही केले नाही. अशावेळी घाईगडबडीत अंदाजपत्रकाला मान्यता कशी द्यायची? असा सवाल नगरसेविका शुभदा जोशी यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी केला. वास्तविक सभेची नोटीस देताना नोटीसीसोबत अंदाजपत्रकाच्या प्रती नगरसेवकांना मिळणे आवश्यक होते. यामुळे अंदाजपत्रक वाचून, त्यावर अभ्यास करून काही सूचना मांडता आल्या असत्या असेही नगरसेवकांनी यावेळी सांगितले. केवळ २८ फेब्रुवारीपूर्वी बैठक घेऊन अंदाजपत्रक मंजुरीचे सोपस्कार पार पाडण्याचा अधिकाऱ्यांचा डाव असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. सर्व सदस्यांना अभ्यासाकरता अंदाजपत्रकाच्या प्रती पोहोच करा त्यानंतरच सभा घ्या अशा सूचना नगरसेवकांनी करत बैठक तहकूब करा अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनीही अखेर सदर बैठक तहकूब केल्याचे जाहीर केले.

यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, अशोकअण्णा चराटी,सौ. संजीवनी सावंत, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, सौ.शकुंतला सलामवाडे, सिकंदर दरवाजकर,बाळ केसरकर, रेश्मा सोनेखान, सुमैय्या खेडेकर,यासिराबी लमतूरे, किरण कांबळे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!