गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५

कोरीवडे सरपंचावरील अविश्वास ठराव संमत, उपसरपंचावरील ठराव बारगळला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोरीवडे ता आजरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी गणपती पाटील यांच्यावरचा अविश्वास ठराव सहा विरूद्ध दोन मतांनी संमत झाला तर उपसरपंच धनाजी मसु पाटील यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव तीन विरुद्ध पाच मतांनी बारगळला.ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची विशेष बैठक पार पडली .
ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कारभार करत आहेत. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार सुरू आहे.त्यांचे ग्रामपंचायत सदस्यांशी उध्दट वर्तन आहे. अशी कारणे दिली आहेत. सुरेश तानाजी बोरवडकर, अरुणा सुनिल पाटील, ललिता मारुती पाटील, अस्मिता दत्तात्रय कांबळे, रेश्मा महादेव पाटील, परसु कृष्णा चौगुले या सहा सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता.
एका सदस्याने ऐनवेळी उपसरपंचांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने उपसरपंच अविश्वास ठराव करून बचावले तर सरपंचांच्या अविश्वास ठरावाचा अंतिम निर्णयाचा चेंडू जनतेच्या दरबारात दाखल झाला आहे.

लकमेश्वर मंदिराचे पुजारी कुलकर्णी यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील लकमेश्वर मंदिराचे पुजारी जनार्दन नारायण कुलकर्णी (मूळ गाव – अक्कोळ, निपाणी ) यांचे वृद्धाप काळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.
लकमेश्वर मंदीरात त्यांनी १८ वर्षे अविरत सेवा भटजी म्हणून काम पाहिले आहे.
अतिशय प्रामाणिक पुजारी अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.


आजऱ्यातील भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या भाजी मंडईवर ऊन, वारा, पाऊस यापासून विक्रेत्यांचे संरक्षण होण्यासाठी लाखो रुपये खर्चून पत्र्यांचे आच्छादन घालण्यात आले आहे. परंतु शहरभर ठीकठिकाणी रस्त्याशेजारी भाजी विक्रीस विक्रेते प्राधान्य देत असल्याने हळूहळू हे ठिकाण पार्किंग झोन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरपंचायतीच्या पुढाकाराने भाजी मंडईमध्ये पेविंग ब्लॉक घालणे, पत्र्याचे आच्छादन करणे अशा मूलभूत सुविधा करण्यात आल्या आहेत. परंतु आजूबाजूच्या गावातून येणारे भाजी विक्रेते शहरातच ठीक ठिकाणी भाजी विकताना दिसतात. दुकान गाळे घेऊन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते वगळता अन्य रस्त्याशेजारी बसून व प्रसंगी वाहतुकीला अडथळा करणा-या भाजी विक्रेत्यांना या भाजी मंडईत बसणे सक्तीचे करणे गरजेचे झाले आहे.
जर भाजी विक्रेते गावभर बसून भाजी विक्री करणार असतील तर मुख्य भाजी मंडई मध्ये सोयी सुविधांसाठी केला जाणारा खर्च कशासाठी ? हा सवालही आता उपस्थित होत आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

सिरसंगी येथे साई ग्रामविकास सहकारी दूध संस्थेचे उद्घाटन

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिरसंगी येथे श्री साई ग्रामविकास सहकारी दूध संस्थेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. सरपंच संदीप चौगुले यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यांत आले.
यावेळी सरपंच चौगले यांनी सदर दूध संस्था उत्पादकांच्या सहकायनि गोकुळ संघाकडून रजिस्टर करून आणण्यात यश मिळाल्याचे सांगितले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सी. आर. देसाई, बाबुराव बुडके, शिवाजी होडगे, पांडुरंग टकेकर, सागर कुंभार, संतोष चौगुले, श्रावण होडगे, सर्जेराव कांबळे, नंदकुमार दळवी, वसंत सुतार, थळोबा कांबळे, मारुती बुडके, तुकाराम कांबळे, बाबुराव कांबळे, चाळू चौगुले, सुरेश चौगुले, दत्तात्रय होडगे, संतराम पाटील, विद्याधर मातवणकर, बाजीराव पाटील, विजय मुळीक, भैय्यासाहेब देसाई यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भास्कराचार्य टॅलेंट सर्च मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये आठवीतील अक्षरा पाटील जिल्ह्यात प्रथम तर सोहम महाजन द्वितीय, प्रशांत पारपोलकर, चिन्मय नार्वेकर याने तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच वेदिका पोतदार, रागिणी कुंभार, रूद्र पवार, संचित पाटील, नवेली गौरी बुडके, तन्मय सरदेसाई, हरिष पोतदार, मयुरेश कांबळे यांनी यश संपादन केले. इयत्ता ९ वी मधील गतिमा अडकुरकर, अनुष्का निर्मळे, चैत्राली पाटील, गिताजंली पाटील, ज्ञानेश्वरी येसणे, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना ए. एल. तोडकर, आर. आर. पाटील, एस. जी. नाईक, एम. एस. शेलार यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक एस. पी. होलम, पर्यवेक्षक एच. एस. कामत, एम. एस. गोरे यांचे प्रोत्साहन लाभले.

भादवण येथे खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त स्वराज्य सेनेच्या वतीने रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे ७००१/-, ५००१/-, ३००१/-,१००१/- रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी साईराज जोशिलकर( ७०५७०६९३९४), आशुतोष गाडे (८८८८९१००७५), प्रदिप केसरकर (९१४६९४३३४१), शुभम आजगेकर (९९२२५५०९७५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


