

कार मोटरसायकल अपघातात रोहन देसाई जखमी…
कारचालकाचे रुग्णालयामधून पलायन…

आजरा- गडहिंग्लज मार्गावर खेडे येथील काजू फॅक्टरी नजीक सुसाट कारचालकाने येथील उद्योजक रोहन सदानंद देसाई यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रोहन देसाई हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान जखमी अवस्थेत असणाऱ्या कारचालकाला स्थानिक नागरिकांनी आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथून त्याने जखमी अवस्थेतच परस्पर रुग्णालय सोडल्याचे समजते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी …
आजरा येथील स्थानिक तरुण उद्योजक रोहन सदानंद देसाई ,(मूळगाव वाटंगी, सध्या रा. आजरा) हे करंबळी येथून आजऱ्याच्या दिशेने दुचाकीवरून येत होते. दरम्यान आजरा येथून गडहिंग्लजच्या दिशेने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दुचाकी चालक रोहन देसाई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जखमी कारचालक यालाही उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असतानाच तो रुग्णालय सोडून गेला असल्याचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे.
याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत आजरा पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली नव्हती. आजरा ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्तास दुजोरा दिला आहे.

💫💫निवृत्तीनंतर काय करत आहे ‘सचिन तेंडुलकर’,
किती आहे संपत्ती? जाणून घ्या

🏏भारतीय लोकांना जितकी क्रिकेटची आवड आहे, तितकी जगात कुठल्याच देशात दिसत नाही. जेव्हा भारतीय क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा त्या खेळाडूंचे नाव सर्वात आधी ध्यानात येते, ज्यांची लोक देवाप्रमाणे पूजा करतात. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो म्हणजे ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन रमेश तेंडुलकर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता, लोकांचे सचिनबद्दलचे प्रेम आणि आदर जसा त्याला क्रिकेटच्या मैदानात मिळत होता, तसाच आजही आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक सामने जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सचिनने त्याच्या बॅटने जितक्या धावा केल्या, त्याच्या दुप्पट त्याने प्रसिद्धी आणि पैसे कमावला. निवृत्तीनंतरही सचिन लक्झरी लाइफचा आनंद घेत आहे. तो १०० कोटींच्या आलिशान बंगल्यात राहत असून वर्षाला करोडो रुपये कमावत आहे. पण निवृत्तीनंतर त्याच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तर आज आपण सचिन तेंडुलकरची कमाई, घर, कार आणि एकूण संपत्ती याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत.
सचिन तेंडुलकरची कारकीर्द
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या दुनियेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये एकामागून एक अनेक विक्रम केले. २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनला मास्टर ब्लास्टर म्हटले जाऊ लागले. तो क्रिकेटचा दिग्गज बनला. सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
१०० कोटींच्या घरात राहतो सचिन तेंडुलकर
सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची कीर्ती अजूनही कायम आहे. सचिन मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो. हा बंगला सचिनने २००७ मध्ये खरेदी केला होता. तेव्हा या बंगल्याची किंमत ३९ कोटी रुपये होती, मात्र आज सचिनच्या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटींवर पोहोचली आहे. सचिनच्या आलिशान घरात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. याशिवाय सचिनचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळमध्ये सचिन तेंडुलकरचे वॉटर फेसिंग घर आहे. या घराची किंमत सुमारे ७८ कोटी रुपये आहे.
सचिन तेंडुलकरच्या कमाईचा स्रोत
सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो स्वतःमध्ये एक ब्रँड आहे. भारतासोबतच सचिनने अनेक परदेशी कंपन्यांच्या ब्रँडशी करार केला आहे. सचिन ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूक आणि हॉटेल व्यवसायातून मोठी कमाई करतो. सचिनचे मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत. याशिवाय सचिनला पेन्शनही मिळते. अशा प्रकारे सचिन एका महिन्यात ४ कोटींहून अधिक आणि वार्षिक ५० कोटींहून अधिक कमावतो.
सचिन तेंडुलकरची पेन्शन
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय सचिन तेंडुलकरला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन म्हणून देते. याशिवाय सचिनला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही मिळाला आहे. त्यातूनही त्याला दरमहा पेन्शनची रक्कम मिळते. तसे पाहता सचिनला पद्मविभूषण, पद्मश्री, अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती १५० मिलियन डॉलर्स इतकी आहे. सचिनकडे भारतीय चलनात एकूण १११० कोटी रुपयांची संपत्ती आहे. सचिन तेंडुलकर हा कोची ISL नावाच्या फुटबॉल संघाचा मालक आहे, जो इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील संघ आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील बेंगळुरू ब्लास्टर्स संघाचाही तो मालक आहे.
Source.. https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq

ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी कार्यक्रम…
मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून ….
फेरी क्रमांक १ ते ३
सरबळवाडी, लाकुडवाडी, भादवणवाडी,खानापूर,उत्तूर ( प्रभाग १ व २), चितळे, वझरे, कोरीवडे, धामणे, आर्दाळ
फेरी क्रमांक ४ ते ६
कानोली, मडिलगे,सुळेरान, दाभिल उत्तूर(प्रभाग क्र ३ व ४), हाजगोळी खुर्द श्रुंगारवाडी,बहिरेवाडी,वडकशिवाले झुलपेवाडी, पेंढारवाडी
फेरी क्रमांक ७ ते ९
गजरगाव,शेळप, किटवडे, खेडे, उत्तूर (प्रभाग क्र. ५ व ६) हाजगोळी बु, कोळिंद्रे, मासेवाडी, भादवण, साळगांव, होन्याळी, सोहाळे
स्थळ : प्रशासकीय इमारत,आजरा
(प्रवेश फक्त पासधारक मतमोजणी प्रतिनिधी,उमेदवार व पत्रकार यांना…)



