mrityunjaymahanews
अन्य

आजरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींचा सविस्तर निकाल

१. कोरीवडे

कोरीवडे येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या एकशक्ती महादेव विकास आघाडीने सत्ता कायम राखली. या आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले. त्यांनी विरोधी गटाचे संतोष पाटील यांचा पराभव केला. विरोधी श्री. महादेव ग्रामविकास आघाडीला चार जागा मिळाल्या.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
शिवाजी पाटील सरपंच (३७९), धनाजी पाटील (११०), परसू चौगुले (१२५), रेश्मा पाटील (१३०), अस्मिता कांबळे (१५०), ललिता पाटील (१३६), अरुण पाटील (१०६), सुरेश बोरवाडकर (१०७).

२ दाभिल

दाभिल येथे (कै) आनंदराव पाटील प्रणित शंभू महादेव समविचारी विकास आघाडीने ८ पैकी ८ जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवत सदगुरु पर्बता स्वामी आघाडीचा धूव्वा उडवला. शंभू महादेव आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार युवराज पाटील यांनी विरोधी गटाचे उमेदवार व त्यांचे मामा अनिल नार्वेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
यूवराज पाटील सरपंच (६३४), सुधाताई कांबळे (२५१), माधुरी सुतार ( २५०), श्रावण वाझे (२७१), पूनम गायकवाड (९४५), विठोबा पाटील (१२४), सुगंधा राणे ( १९९), रविंद्र मृगुर्डेकर ( २११).

३.खेडे

येथे केदारलिंग ग्रामविकास आघाडीने सत्ता कायम राखत १० पैकी १० जागावर विजय मिळवला. विरोधी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही.
केदारलिंग ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार डॉ. संदिप देशपांडे यांनी मोठ्या फरकाने विरोधी आघाडीचे उमेदवार सुनिल पाटील यांचा पराभव केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कसाता
संदिप देशपाडे सरपंच- (७४८), माधुरी चौगुले (२४८), रेखा सावंत ( २२६), विकास जाधव (२३०), गिरीष देशपाडे (२२१), मालूताई चौगुले (२१६), सुनिता चव्हाण (२१५) रोहन कातकर (३३३), संतोष सावरतकर (२२५), प्रियंका डाफळे (२६०).

४.सुळेरान धनगरमोळा- घाटकरवाडी

सूळेरान येथे महेंद्र माऊली ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह दोन सदस्यपदाच्या जागा जिंकल्या. महेंद्र माऊली समृध्द ग्रामविकास आघाडीला पाच जागावर समाधान मानावे लागले. महेंद्र माऊली समृद्ध ग्राम विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार शशिकांत कांबळे यांनी विरोधी आघाडीचे देविदास सूर्यवंशी यांचा पराभव केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे
शशिकांत कांबळे सरपंच(३८४) अन्विता चौकुलकर(१४४) मायकल बारदेसकर(१२१) श्रावण कांबळे(१५५) जयश्री पाटील(१९०) स्वाती शेटगे(१४३),कृष्णा खरुडे(१३७),शुभांगी शेटगे(११६)

५. झुलपेवाडी

येथे राष्ट्रवादी व कोग्रेस यांच्यात दुरंगी सामना रंगला. यामध्ये काँगेसच्या सरपंचपदाच्या उमेदवार अर्चना सुतार विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे प्रताप अस्वले यांचा पराभव झाला. काँग्रेसने ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राखली.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
अर्चना सुतार सरपंच (५४९), नितीन पाडेकर (२२२), आरती पावले (२२९), नामदेव जाधव (२९५), अस्मिता कोंडेकर (२९५), गीताताई भंडारी (२८०), संभाजी अस्वले (२०९), सारीका सुतार (२०२).

६.होन्याळी

येथे विरोधी आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार स्मिता ज्ञानदेव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्मिता तेली यांचा पराभव केला. याठिकाणी सत्तांतर झाले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात अशी- स्मिता पाटील सरपंच (६९७), संगीता देऊसकर (२५५), अश्विनी खाडे (२५४), तानाजी गुरव (२००), जयश्री जाधव (२५४), सचिन उंचावळे (२५०), युवराज बिरंबोळे (२४६), शोभा जाधव (२४७), विजय मांडेकर (२२३), अश्विनी खाडे (२२४).

७ बहिरेवाडी

येथे राष्ट्रवादी व राजश्री शाहू भैरवनाथ ग्रामविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सरपंचपदाच्या उमेदवार रत्नजा सावंत विजयी झाल्या. त्यांनी आघाडीच्या अर्चना गडकरी यांचा पराभव केला.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात रत्नजा सावंत सरपंच (१३१९), भाग्यश्री आयवाळे (४१०), सरीता जोंधळे (४५८), दत्ता मिसाळ (३७५), उल्का गोरुले (३६६), विकास चोथे (३७६), सुहास चौगुले (३५४) उषा सुतार (३४४), सुरेश खोत (२६४), मालन मोरे (३६५), यूवराज कांबळे (३००).

८.आरदाळ

येथे राष्ट्रवादी व भाजप यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गीता वांगणेकर यांचा पराभव केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
रुपाली पाटील सरपंच (६६२), मंगल पुंडपळ (२८०), विठ्ठल पोवार (२५२), सुमन सोनार (२१३), विद्याधर गुरव (२३६) स्वप्नाली बांबरे (२५६), संगीता सुतार (१७०), धनाजी ससाणे (१६७).

९.वझरे

येथे भाजप, राष्ट्रवादी व स्थानिक आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार शांताबाई गुरव विजयी झाल्या. त्यांनी वैशाली इंगळे,लता गुरव यांचा पराभव केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
शांताबाई गुरव सरपंच (३८८). तुकाराम कुंभार (११८), मंगल भालेकर (१३४). मधुकर खोत (२१३), भारती जाधव (२३३), शितल कांबळे (२१६), शशिकांत जाधव (१६०), विद्या जाधव (१५०).

१०. भादवणवाडी

 

येथे परिवर्तन विकास आघाडीला सरपंचपदासह सहा जागावर विजय मिळाला. या आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार महादेव दिवेकर यांनी विरोधी आघाडीचे राजू पाटील यांचा पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी
महादेव दिवेकर सरपंच (४१२), आनंदा गवळी (७२), सरीता कांबळे ( १४९), वैजयंता शिमणे (५७), कृष्णा परीट ( १२०), कोमल भाटले (१३५), सुरेश शिमणे (१५४), सरीता अनावरे (१५५) .

११. शेळप

येथे भैरवनाथ परिवर्तन आघाडीचे अर्जुन बागडी यांनी विरोधी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार शंकर गुरव यांचा पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
अर्जुन बागडी सरपंच (२१५) सुधाकर पाटील (१२२), उर्मीला गुंजाळ (१२३), शितल नवार (१०२) दत्तात्रय पाटील (२०) वैशाली कांबळे, श्रीकांत नार्वेकर, वैजंता नार्वेकर हे बिनविरोध झाले.

१२.सोहाळे- बाची

येथे भावेश्वरी समविचारी ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह सहा जागावर विजय मिळवला. विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. भावेश्वरी
समविचारी ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार भारती डेळेकर यांनी विरोधी गटाच्या उमेदवार कल्पना गुरव यांचा पराभव केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
भारती डेळेकर सरपंच (५८१), वसंत कोडूसकर (२०९), निर्मला दोरूगडे (१८४), शिवाजी कोडूसकर (१००) तानाजी पोवार (१६९), उषा कांबळे (१५६), लिला देसाई (२४३) बाळकृष्ण दोरुगडे हे बिनविरोध निवडले गेले आहेत.

१३.किटवडे

किटवडे येथे रामलिंग महेंद्रनाथ ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार लहू वाकर हे विजयी झाले. विरोधी आघाडीचे श्रीधर सावंत पराभूत झाले.
लहू वाकर सरपंच (३५२) उज्वला पाटील (१२०), रखमाजी पाटील (१२०), शितल पाटील (१२५), सागर पाटील (२४६) चार जागांसाठी निवडणूक झाली.

१४.श्रृंगारवाडी

येथे महादेव रवळनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार समीर देसाई सरपंच (३८०), पांडुरंग सावंत (१९५), विमल पाटील (१९८), अंकुश तारळेकर (१३९) सीमा देसाई (१४३)

१५ गजरगाव

सरपंच आनंदा कांबळे( ६३९) सविता पाटील (२५४) प्रकाश देसाई(२२६), विठ्ठल पाटील (२८७),कुसुम कुळकर्णी (२४२),ज्योती गुरव (२३६),भूषण भिऊंगडे(२१७ )अनुसया कांबळे(४०३), महादेव पाटील (३४८),अक्कताई पाटील(३९९)

१६. चितळे

खेतोबा रवळनाथ भावेश्वरी बामणादेवी समविचारी आघाडीने सरपंचपदा सह जागा पटकावत विजय मिळवला विरोधी आघाडी बागेश्वरी ग्राम विकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही. सरपंचपदाचे रवळनाथ भावेश्वरी बामणादेवी आघाडीचे उमेदवार रत्नप्रभा भुतुरले यांनी विरोधी आघाडीच्या उमेदवार विजया नेवरेकर यांच्यावर विजय मिळवला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
रत्नप्रभा भूतूले( ६१४), अजित राणे (१६०) संगीता येडगे (१८१) उदयसिंग देसाई, उज्वला धुरे, मारूती गुरव, माया गुडूळकर, सुश्मीता पोवार हे बिनविरोध निवडले गेले आहेत.

१७.वडकशिवाले

येथे कलेश्वर ग्रामविकास आघाडीनी सरपंचपदासह सहा जागा जिंकत विजय मिळवला विरोधी परिवर्तन युवा आघाडीला केवळ एक जागा मिळाली. सरपंचपदाचे माधुरी कांबळे यांनी विरोधी आघाडीच्या पूजा कांबळे यांच्यावर विजय मिळवला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी..
. माधुरी कांबळे सरपंच (४०), जयवंत शिंदे (१६८). नितीन सावंत (१४१), शोभा काळे (४९), शाल कांबळे (६५) वत्सना कसलकर (११५), अमर पाटील (१९५). शिला बेलवाडे (१९०)

१८.उत्तुर

येथे महाविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार किरण आमणगी यांनी स्थानिक विकास आघाडीचे विठ्ठल उत्तूरकर यांच्यावर निसटता विजय मिळवला.
येथे महाविकास आघाडीला सरपंचपदासह १४ जागावर विजय मिळवता आला. स्थानिक उत्तूर विकास आघाडीला व भाजपला दोन जागावर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते…
किरण आमनगी (सरपंच), संजय उत्तूरकर (३६९. सुर्वणा नाईक (. ६४६ ) समिक्षा देसाई ( ७४६) भैरु कुंभार(३६९) अनिता घोडके (३५०), राजाराम खोराटे (५५२), आशाताई पाटील (६१९), सुनिता केसरकर (५६४), मिलिंद कोळेकर (४९६) सुनिता हत्तर्गी (६१९) संभाजी कुराडे (४७८). सविता सावत (३४३), सुशांत अमंनगी (३७४) संदेश रायकर (२९५) लता गुरव (२८१), सरीता कुरुंकर (३३९) महेश करंबळी हे बिनविरोध निवडले गेले आहेत.

१९. पेंढारवाडी

येथे राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत झाली. यामध्ये आजरा कारखाना माजी संचालक बाळासाहेब आजगेकर गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार सिंधुताई आजगेकर यानी विरोधी आघाडीच्या कविता आजगेकर यांचा पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते कंसात
सिंधुताई आजगेकर (सरपंच) (२६३) संजय आजगेकर (११७), उषा आजगेकर (१३०), विमल चव्हाण (११२), भास्कर लोहार ( ८०), अंजना आजगेकर (८२), सचिन आजगेकर (८५), इंदुबाई आजगेकर (८९).

२०.मासेवाडी

येथे राष्ट्रवादी व भाजप प्रणित आघाडीत लढत झाली. राष्ट्रवादीच्या तीन व भाजपची तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र सरपंचपद व सदस्यपदाच्या एका | जागेसाठी निवडणूक लागली. यामध्ये राष्ट्रवादीचे पांडुरंग तोरगले यांनी प्रतिस्पर्धी संजीवनी सावर्डे यांच्यावर विजय मिळवला. त्यांना ५२५ मते मिळाली. निवडून आलेले सदस्य महादेव पाटील (१२७). अनिता पाटील, वनिता पाटील, सोना परीट, चंद्रकांत खोत, आनंदा परीट, प्रिया पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.

२१.धामणे

येथे भाजप, राष्ट्रवादी व काग्रेस यांची महाआघाडी तयार झाली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादीच्या एका गटाने निवडणूक लढवली. महाआघाडीच्या पूजा कांबळे यांनी प्रतिस्पर्धी प्रियांका घोडके यांच्यावर विजय मिळवला. महाआघाडीने सर्वच जागा जिंकून ग्रामपंचायतीमध्ये सता कायम राखली. विजयी उमेदवार व कंसात मते
पूजा कांबळे सरपंच (८९६), सुनिल सावंत (२७८), तनुजा पोवार (३२५), सुनिता वंजारे (२९१), सुनिल आठावकर (३०४), रेखा तेजम (३४५), शोभा तावरे (३०१), शिवाजी लोकरे (३११), शिवाजी गिलबिले (२७८), नम्रता गुरव (३४० ).

२२.हाजगोळी खुर्द

श्री भावेश्वरी समविचारी आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार धनंजय जाधव यांनी कामेरी परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे कुंडलिक पाटील यांच्यावर निसटता विजय मिळवला. कामेरी परिवर्तन आघाडीला तीन तर भावेश्वरी समविचार आघाडीला चार जागा मिळाल्या. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात धनंजय जाधव सरपंच (१९८), शुभांगी होरबळे (१८), मनिषा कांबळे (२८), गीता सुतार (९२), लता जाधव (७२), अदित्य कातकर (७९), प्रशांत कोटकर (७९).

२३ खानापुर

खानापूर येथे सोमेश्वर समविचारी विकास आघाडीने सरपंचपदासह चार जागा जिंकत विजय मिळवला. सोमेश्वर परिवर्तन आघाडीला एक जागा जिंकता आली. सोमेश्वर समविचारी आघाडीच्या कल्पना डोंगरे यांनी विरोधी आघाडीच्या प्रभावती गुरव यांचा पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात कल्पना डोंगरे (सरपंच) (२९८), माधुरी गुरव (१४२), सुशीला जाधव (१४१). अलका चव्हाण (१२० ) विश्वास जाधव (१२१ ), युवराज जाधव (१३६). आनंदा राणे, लिला दोरूगडे या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

२४.हाजगोळी बु.

भावेश्वरी ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह सर्वच जागा जिंकत सत्ता मिळवली. परिवर्तन ग्रामविकास पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. भावेश्वरी आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार सविता जाधव यांनी मोठ्या फरकाने विरोधी आघाडीच्या सुप्रिया होडगे यांच्यावर विजय मिळवला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते..
सविता जाधव सरपंच(२८९) राजश्री जाधव(११४) अस्मिता पंडित(१४२) अभिजीत चौगुले(१३४) सुगंधा जाधव(८०) आनंदा गुरव(४६) उज्वला येसादे(९२) वासंता कांबळे(बिनविरोध)

२५.लाकूडवाडी

येथे श्री. चाळोबा शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार जयश्री गिलबिले यांनी चाळोबा युवा संघर्ष परिवर्तन पॅनेलच्या रुपाली मोरे यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. श्री. चाळोबा शेतकरी ग्रामविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. परिवर्तन आघाडीला चार जागा मिळाल्या. सदस्यपदाची जागा रिक्त आहे. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
जयश्री गिलबिले सरपंच (२४९), चंद्रकांत खंदाळे (६४) वनिता मांगले (८३), शिवानंद पाटील (८७), मोहन देवलकर (१३५), अंकिता मोरे (८१) रेणूका गिलबिले (१३१ )

२६.सरंबळवाडी

येथे दुर्गामाता समविचारी परिवर्तन पॅनेलने सरपंसरपंपदासह  पाच जागा मिळवत सत्तांतर केले. या पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सुनिता कांबळे यांनी प्रतिस्पधी दुर्गामाता ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार मंगल कांबळे यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी- सुनिता कांबळे सरपंच (४२१), संगीता किल्लेदार (१२५), बाजीराव देवलकर (१३१), उज्वला कांबळे (१४७), प्रभावती उत्तूरे (१११), संतोष रावण (१५२), सिमल होडगे (१०३), मारुती गिलबिले बिनविरोध निवडले गेले आहेत.

२७.कोळींद्रे

येथे भाजप पुरस्कृत रवळनाथ ग्रामविकास युवा आघाडीला सरपंचपदासह सहा जागा मिळाल्या. विरोधी रवळनाथ परिवर्तन आघाडीला चार जागा मिळाल्या. रवळनाथ ग्रामविकास युवा आघाडीच्या वंदना सावंत यांनी विरोधी आघाडीच्या रेखा जाधव व शिला पाटील यांच्यावर विजय मिळवला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते…
वंदना सावंत (सरपंच) (८३९), मनिषा अमृस्कर (३६४), दिपाली पाटील (३५७), मनोहर पाटील (३७५), सदाशिव हेब्बाळकर (३२७), नंदा जाधव (३११), मेघा (३२२), विजय कांबळे (३१२), भिकाजी गोंधळी (२९८), संगिता बुगडे (२९०)

२८.मडिलगे

येथे भावेश्वरी ग्रामविकास आघाडीने सरंपचपदासह पाच जागावर विजय मिळवला. विरोधी लोकमान्य परिवर्तन आघाडी व हनुमान ग्रामविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागावर समाधान मानावे लागले. भावेश्वरी आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार बापू निऊंगरे यांनी विरोधी आघाडीचे कृष्णा येसणे, मारुती येसणे यांच्यावर विजय मिळवला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
बापू निऊंगरे सरपंच (७८८), पांडुरंग जाधव (२६७), शांताबाई सुतार (२८६), मनिषा काणेकर (३०१). शामल कातकर (२३६), सूशंlत गुरव (२६३), आनंदा कांबळे ( २६९), ज्ञानेश्वरी मुरूकटे (२१८), शिवराज मोहीते (३०३), कविता मांग (२२३).

२९.कानोली

गणेश भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल परिवर्तन आघाडीने सरपंचपदासह दोन जागा जिंकल्या. विरोधी भैरवनाथ गणेश ग्रामविकास आघाडीला चार जागा मिळाल्या. गणेश भैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या सुषमा पाटील यांनी विरोधी आघाडीच्या सुप्रिया पाटील यांचा पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात- सुषमा पाटील सरपंच (४४६), सुधीरकुमार पाटील (२११), दत्तात्रय भोगण (१३८), आरती देसाई (१९०), शुभांगी पाटील (२१०), चंद्रकांत पाटील (१४५), संगीता देसाई ( १७४).

३०.भादवण

येथे युवा शेतकरी विकास आघाडीने सरपंचपदासह ९ जागा पटकावल्या. विरोधी समविचारी परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या. युवा शेतकरी विकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार माधुरी गाडे यांनी विरोधी आघाडीच्या जयश्री गाडे यांच्यावर मात केली. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी- माधूरी गाडे सरपंच- (१२४७), बाळकृष्ण सुतार (३५४), संगीता देसाई (३४५), प्रमोद घाटगे (३८७), अश्विनी पाटील (२३७), अर्जुन कुंभार (१८६), तानुबाई देवरकर (३५४), सुनंदा पाटील (३२७), संजय पाटील (३६८), निलम देवेकर (३७०), शितल केसरकर (३६४), संजय केसरकर (३६८).

३१.साळगाव

येथे केदारलिंग विकास आघाडीने सरपंचपदासह सहा जागावर विजय मिळवला. ज्योतीलिंग विकास आघाडीला दोन जागावर विजय मिळवला. केदारलिंग विकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार धनंजय पाटील यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार विलास दोरुगडे व संदेश लोहार यांच्यावर मात केली.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात
धनंजय पाटील सरपंच (५३०), अर्जुन कुंभार (१५०), उषा नावलकर (१६४), बबन भंडारी (२४६), स्वप्नाली केसरकर (२३५), पूजा पाटील(२६८)विजय कांबळे (१८७),कमल केसरकर(१८३)

 सत्तांतर

दाभिल, लाकूडवाडी, सरबळवाडी, कोळदे, वडकशिवाले, पेंढारवाडी, आरदाळ, वझरे, सुळेरान, मडिलगे, साळगाव, कानोली, भादवणवाडी, शेळप,

सत्ता कायम-

कोरीवडे, खेडे, खानापुर, हाजगोळी बुद्रक, लाकूड़वाडी, भादवण, उतूर, मासेवाडी, धामणे, झुलपेवाडी,

पक्ष व गटनिहाय सरपंच व सत्तेवरील दावा…

 

.सरंबळवाडी…

राष्ट्रवादी

सुनिता कांबळे

 

२.कानोली- हारूर….

शिंपी गट

सुषमा  सुभाष पाटील

 

३.लाकूडवाडी..

राष्ट्रवादी

जयश्री धोंडीबा गिलबिले

 

४. गजरगाव…

भाजपा ..स्वाभिमानी

आनंदा रानकू कांबळे

 

५.सुळेरान…

राष्ट्रवादी

शशिकांत बाळकृष्ण कांबळे

 

६.किटवडे…

भाजपा

लहू रामचंद्र वाक्कर

 

७.भादवणवाडी…

राष्ट्रवादी

महादेव दिवेकर

 

८.मडीलगे…

राष्ट्रवादी

बापु निऊंगरे

 

९.शेळप…

राष्ट्रवादी

अर्जुन बागडी

 

१०.सोहाळे…

राष्ट्रवादी व शिंपी गट

भारती कृष्णा डेळेकर

 

११.हाजगोळी खु.

जाधव -शिंपी गट

धनंजय जाधव

 

१२.उत्तुर…

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

किरण आमनगी

 

१३.खानापूर…

शिंपी चराटी गट

कल्पना डोंगरे

 

१४.श्रृंगारवाडी…

राष्ट्रवादी

समीर पांडूरंग देसाई

 

१५.कोळीद्रे…

भाजपा

वंदना संभाजी सावंत

 

१६.चितळे…

भाजपा…अंजनताई गट

रत्नप्रभा आनंदा भुतुर्ले

 

१७.बहिरेवाडी…

राष्ट्रवादी

रत्नजा प्रल्हाद सावंत

 

१८.पेंढारवाडी…

राष्ट्रवादी

सिंधुताई आजगेकर

 

१९.मासेवाडी….

राष्ट्रवादी
पांडूरंग चौगुले

 

२०.वझरे…

शांताबाई गुरव

भाजपा

 

२१.वडकशीवाले…

राष्ट्रवादी

मयूरी कांबळे

 

२२. भादवण…

शिवसेना

माधुरी गाडे

 

२३.कोरीवडे…

शिंदे शिवसेना गट

शिवाजी गणपती पाटील

 

२४.दाभिल…

स्थानिक आघाडी

युवराज दत्तू पाटील

 

२५.आर्दाळ…

भाजपा

रूपाली सूर्यकांत पाटील

 

२६.होन्याळी…

स्थानिक आघाडी

स्मिता पाटील

 

२७.धामणे…

राष्ट्रवादी

पुजा अमोल कांबळे

 

२८. झुलपेवाडी…

भाजपा -काँग्रेस

अर्चना सुतार

 

२९.साळगाव…

शिंपी गट

धनंजय पाटील

 

३०.हाजगोळी बू…

स्थानिक आघाडी

सुनीता सुनिल जाधव

 

३१.खेडे- मुंगूसवाडी…भाजपा ,भाटले गट

 

डॉ.संदीप बाबुराव देशपांडे

 

****(हा पक्ष व गट याचा  सरपंच पदांवरील दावा संबंधित पक्षाच्या प्रमुख मंडळींनी केलेला आहे.)

…..

संबंधित पोस्ट

आजरा साखर कारखान्याकडून चालू हंगामातील संपूर्ण ऊस बिले अदा

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यात एमआयएमचा प्रवेश…

mrityunjay mahanews

अशोकअण्णा चराटी यांच्या रहात्या घरास आग.. प्रापंचिक साहित्याचे नुकसान

mrityunjay mahanews

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!