mrityunjaymahanews
अन्य

धक्कादायक… रोहन देसाई यांचा अखेर मृत्यू

धक्कादायक…

 

रोहन देसाई यांचा मृत्यू

आजरा येथील रोहन सदानंद देसाई(वय ३२) यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतिशय धक्कादायकरीत्या झालेल्या रोहन याच्या मृत्यूने आजरा शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी दुपारच्या दरम्यान एका गडहिंग्लजच्या दिशेने जाणाऱ्या कारने दुचाकीवरून येणाऱ्या रोहन यांच्या गाडीला जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. यानंतर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते रोहन यांची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. अखेर त्यांचे आज सकाळी रुग्णालयातच निधन झाले.

रोहन हा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.वृषाली देसाई व सदानंद देसाई यांचा मुलगा होता. अतिशय मनमिळाऊ व लाघवी स्वभावाच्या रोहनचा मित्रपरिवार ही मोठा आहे. त्याच्या निधनाने आजरा शहरवासीय व मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

रोहनचा मृतदेह आज बुधवारी आजरा येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर शवविच्छेदनानंतर दीड वाजण्याच्या सुमारास वाटंगी येथे नेण्यात येणार असून दुपारी तीन वाजता मुळगाव वाटंगी येथे  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात पत्नी,आई,वडील व विवाहित भाऊ असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Ground Report

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!