mrityunjaymahanews
अन्य

उत्तूर – मुमेवाडी जवळ विचित्र  अपघात एक जण जागीच ठार !२५जखमी…

 

 

उत्तूर – मुमेवाडी मार्गावर विचित्र  अपघात

एक जण जागीच ठार !२५ जखमी

महिद्रा पिक – अप  बस धडकेल म्हणून एस टी चालकाने बस  झाडावर धडकली ! मोठी दुर्घटना टळली

 

उत्तूर – मुमेवाडी ता आजरा .मार्गावर दुपारी चारच्या सुमारास उत्तूर येथून मुमेवाडी कडे जाणारा महिंद्रा पिक अप चालकाचा ताबा सुटल्याने महिंद्रा पिक अप रस्त्यावर उलटली समोरुन गारगोटी आगाराची बस उत्तूरकडे जात होती महिंद्रा पिक अप ही एस. टी . बसला धडकेल म्हणून बस चालकाने बस झाडाला धडकली . दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेला धडकल्या यामध्ये महिंद्रा पिक अप उलटल्याने महिद्रा पिक मधील एक जण बाहेर फेकल्याने जागीच मृत्यू झाला तर महिंद्रा पिक अप  बसला धडकेल म्हणून बसचालकाने प्रसंगावधान राखून बस झाडावर धडकली . बस मधील २५ प्रवाशी किरकोळ जखमी  याबाबत आजरा पोलिसांत गारगोटी आगार चालक माणिक दतात्रय राजिगरे  यांनी वर्दी  दिली .घटना स्थळावरील मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा पिक अप् गाडी (क्र.एम. एच . ११ . २४६ १ ) ही भरधाव वेगाने उत्तूर येथून मुमेवाडीकडे जात असताना बामणे यांच्या वसाहती जवळ आली असता रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या मैलाच्या दगडाला धडकल्याने रस्त्यावर वेडी वाकडी वळणे घेऊ लागली दरम्यान त्याच वेळेला गडहिंग्लज येथून गारगोटी आगाराची जनता गाडी उत्तूर कडे जात असताना (एम. एच. १४ बी . टी . ०३२३) ही बस येत होती . महिंद्रा गाडी  बसवर आदळेल असे वाटल्याने  बस चालकाने गाडी डाव्या बाजूच्या  झाडावर धडकली तर महिंद्रा पिक अप रस्त्याच्या  डाव्या बाजूस उलटली.यावेळी चालक   बाहेर फेकला गेला त्याला गंभीर मार लागला . त्याला तातडीने  गडहिंग्लजला नेण्यात आले .तर बसमध्ये ७० प्रवासी होते . जखमी प्रवाशांना उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची  मोठी गर्दी झाली होती . जखमींना उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती . उमेश आपटे यांनी बसमधील जखमींना तातडीने गडहिंग्लज येथे उपचारासाठी पाठवले .

मृत तरुणाचा शोध सुरु 

 

उपचारासाठी नेत असलेल्या महिंद्रा पिक अपमधील तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला .  महिंद्रा पिक अप  गाडी ही सातारा जिल्ह्यातील  वरची बेलमाची पो.पिकाली ता.वाई येथीलअसून मृत व्यक्तीचा  नाव व पत्ता याचा शोध पोलिस  घेत आहेत . गाडी नितीन अशोक सुर्यवंशी यांचे नावावर आहे . गाडीत उपलब्ध असणारे सर्व नंबर बंद होते .

 

वारकरी एकात्मिकतेचा विचार दुषित करणाऱ्यापासून सावध रहा
श्यामसुंदर सोन्नर

 

आज-यात पहिले वारकरी किर्तनकार संमेलन

 

किर्तन परंपरा वेगळ्या वळणावर जात आहे.सर्व पक्षांच्या आध्यात्मिक आघाड्या होत आहेत.त्यामुळे वारकऱ्यांनी आत्मसंशोधन करण्याची गरज असून वारकरी परंपरेचा एकात्मिकतेचा विचार दुषित करणाऱ्या पासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार व पत्रकार शामसुंदर सोन्नर यांनी केले.
येथील बाजार मैदानात सारथी फौंडेशनच्या वतीने आयोजित पहिल्या किर्तनकार संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


महाराष्ट्रात आधुनिक सुधारणा झाली कारण वारकरी संतांनी विचाराची बीज पेरणी केली.निंदा करायची असेल तर संतांची निंदा करणाऱ्यांची करावी.वारकरी परंपरा कोणत्याही एका धर्माचा नाही.कोणत्याही धर्माचा द्वेष वारकरी संप्रदाय करत नाही.नामदेव महाराजांच्या अगोदर कुणालाही किर्तन, मत व्यक्त करण्याचे अधिकारी नव्हते. ते अधिकार ज्ञानेश्वर महाराज, नामदेवरावांनी मिळवून दिले.नामदेवांनी वाळवंटात किर्तन सुरू केल्यामुळे सर्वांना किर्तन करण्याचा हक्क मिळाला.काम करत भगवंताची पुजा करा.स्त्रियांकडे निकोप दृष्टीने पहायला शिकवणारा वारकरी संप्रदाय आहे.
ह भ प राजाभाऊ चोपदार म्हणाले, संतांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता सांगितले तीच मूल्ये राज्यघटनेत आली आहेत. संत परंपरेचा प्रभाव महात्मा जोतिबा फुले यांच्यावर आला. तेच विचार शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली.संताचा विचार भारतासह नेपाळने स्विकारला.संत विचार जगभर पसरत आसताना काही जण संकुचित वागत आहेत.रंगाच्या आधारावर धार्मिक रंग देणे चूकिचे आहे. वारकरी परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे.आनंदी जीवन वारकरी संप्रदायाच्या विचारात आहे. वारकऱ्यांच्या नेत्यांची प्रबोधनाची गरज असून वारकऱ्यांची नाही.


देवदत्त परळेकर म्हणाले,श्रेष्ठ साहित्य केवळ वेदनेतून निर्माण होते.ज्ञानेश्वरांनी रेडा समजणा-या दुबळ्या, अस्पृश्य, बहुजन समाजाला वेद बंदी उठवली.किर्तन म्हणजे नाम आणि नाम म्हणजे परमेश्वर.प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणजे किर्तनकारच आहे.
स्वागताध्यक्ष सुनिल शिंत्रे म्हणाले, वारकरी परंपरेच्या विचाराचा प्रसार व्हावा,संतांचा आदर्श तरूणांनी घ्यावा. वारकरी संमेलनातून चांगले बी पेरावे यासाठी किर्तनकार संमेलनाचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव,गोकूळच्या संचालिका व निमंत्रक अंजना रेडेकर, जेष्ठ साहित्यीक राजाभाऊ शिरगुप्पे, काँ.संपत देसाई,संजय घाटगे उपस्थित होते.मुकुदराव देसाई यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!