

झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू …

झुलपेवाडी ता. आजरा येथील विश्वास दत्तू पावले (वय ५४) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जानबा सुभाना धुमाळ(रा.झुलपेवाडी) यांनी आपल्या शेताच्या भोवतीने तारेचे कुंपण करून त्यास विजेचा पुरवठा केला होता. विश्वास यांच्या हाताचा सदर तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद शिवाजी दत्तू पावले यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलिसांनी जानबा सुभाना धुमाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

निधन वार्ता :–
कृष्णकांत गोविंद कातकर

किणे ता. आजरा येथील कृष्णकांत गोविंद कातकर उर्फ के.जी.कातकर (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.कातकर यांनी नेसरी येथील एस. एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले , मुलगी, सुना, नातवंडे, पत्नी असा मोठा परिवार आहे.

कॅप्टन विठोबा चौगुले

कोवाडे (ता. आजरा) येथील विठोबा बाबुराव चौगुले (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय सैन्यदलामध्ये त्यांनी ३२ वर्षे विविध पदावर काम केले होते. ते आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष व श्री. ब्रह्म विकास सेवा संस्थेचे माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.




