

पुरस्कार उमेदीने काम करण्याची ऊर्जा देतात : संजय ढमाळ
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केल्यास समाज त्याची दखल घेतो. आजरा तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी गावच्या विकासात मोब भूमिका बजावण्याचे काम केले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार उमेदीने काम करण्याची ऊर्जा देणारी आहे. असे प्रतिपादन आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी केले.
येथील पंचायत समितीमध्ये यशवंत सरपंच व आदर्श ग्रामपंचायत यांचा सत्कार झाला. श्री. ढमाळ अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, ग्रामिण पाणीप्रवठा विभागाचे उपअभियंता महादेव तिवले, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप सूर्यकांत नाईक, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पी. डी. ढेकळे प्रमुख उपस्थित होते.
सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. शेटे यांनी स्वागत केले. गटविकास अधिकारी श्री. ढमाळ म्हणाले, सरपंच व ग्रामसेवक ही ग्रामविकासाच चाके आहे. त्यांनी समन्वयाने काम केल्यास गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबाबत वाटंगी सरपंच संजय प ग्रामसेवक रणजित पाटील, खानापुर सरपंच कल्पना डोंगरे, ग्रामसेवक विशाल दंडगेकर, पेरणोली सरपंच प्रियांका जाधव, ग्रामसेवक संदिप चौगले, मुरुडे सरपंच प्रतिक पाटील, ग्रामसेवक मुरुडे विठ्ठल कुंभार, आदर्श ग्रामसेवक अशोक सानप व संतोष कुंभार, जिल्हा परिषद आदर्श गोठा पुरस्कार प्राप्त दत्ता पाईम, जिल्हा परिषद आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त रणजित कालेकर यांचा सत्कार झाला. श्री. पोवार, श्री. चौगले, श्री. कालेकर यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी विविध गावचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी आभार मानले.

आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमर पाटील
त्रैमासिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनची त्रैमासिक सभा उत्साहात झाली. या सभेमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमर पाटील यांची निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतरची ही पहिली त्रैमासिक सभा झाली. एमएससीडीएचे संघठन सचिव व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी संचालक व कोल्हापूर जिल्हा आजरा तालुका प्रतिनिधी संजय हरेर या वेळी प्रमुख उपस्थित होते.
आजरा तालुका कार्यकारणी अशी… अध्यक्ष- अमर गणपती पाटील (उत्तूर), उपाध्यक्ष- महादेव बाबू घोरपडे (मलीग्रे), सचिव महंमद इरफान महमद सय्यद (मडिलगे), सहसचिव प्रवीण नारायण गोरूले (बहिरेवाडी), खजिनदार दयानंद गिलबिले (भादवण), अंतोन मोजेस नोरोना,( वाटंगी) जेमी इंत्रू डिसोजा (आजरा), विजय बाजीराव मोदर (उत्तूर), पंकजकुमार पांडूरंग पाटील (गवसे), महिला प्रतिनिधी सुचेता सूर्यकांत गड्डी (आजरा), वर्षा सचिन निंबाळकर (आजरा ) यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
रमेश कुरुणकर, सूर्यकांत गड्डी, नारायण खटावकर, विलास रावजीचे यांची सल्लागार पदी निवड झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्याऱ्यांचा सत्कार झाला. संघटनेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष श्री. पाटील, उपाध्यक्ष श्री. घोरपडे यांनी सांगीतले. जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पाटील, कोल्हापूर जिल्हा आजरा तालुका प्रतिनिधी श्री. हरेर यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

आरोग्य…
आजरा येथे आरोग्य विभागाकडून डेंग्यू प्रतिबंधक उपाय योजना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यू व इतर संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.
मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा यांच्या सहकार्याने ज्या ठिकाणी गटारी तुंबून आहेत त्या वाहत्या करणे नळ गळती व व्हाॅल्व गळती आहे ती गळती लेखी पत्राद्वारे नगरपंचायतीला अवगत करण्यात आले व जास्तीत जास्त नळगळत्या व व्हाॅल्व गळत्या काढण्यात आल्या .
तसेच नळ पाणी पुरवठा विभागातून नियमितपणे शुद्धीकरण केलेले पाणी सोडण्यात येत आहे ज्यामुळे विषमज्वर, हगवण, गॅस्ट्रो अशा जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही प्रत्येक घराच्या आसपास असणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये डेंग्यू अळीचा प्रादुर्भाव होतो एका आठवड्यापेक्षा जास्त जर स्पष्ट करत पाणी न झाकता ठेवले असेल तर एडीस इजिप्ती डासांची पैदास होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे लोकांना आरोग्य कर्मचाऱ्याद्वारे याबद्दल प्रबोधन करण्यात आले. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.जे पाण्याचे साठे काढता येत नाहीत किंवा रिकामे करता येत नाहीत अशा साठ्यावर टेमिफॉस टाकण्यात आले

कौतुकास्पद…
प्रणव पाटील याचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव भगवान पाटील पेरणोली याने वीज परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले
एन. एम. एम.एस. परीक्षेत १७८ पैकी १५८ गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. मंथन स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात सहावा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. एम. टी. एस. परीक्षेत राज्यस्तरीय पुरस्कारही त्याने पटकावला आहे. गणित प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात चौथा तर महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठवा व जिल्ह्यात दुसरा क्रमांक त्याने मिळवला आहे.
त्याला व्यंकटराव स्कूलचे शिक्षक पी. एस. गुरव अस्मिता पुंडपळ, आर, पी. पाटील, भोये, गवारी, सौ.गुरव,व्ही.ए. चौगुले व मुख्याध्यापक राजेंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

छायावृत्त….

ब्रह्माकुमारीज आजरा मार्फत कुमारी मानसी मुकुंद नाईक यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

पाऊस-पाणी…

दि.४ जुलै सकाळी ७-०० ते दि.५ जुलै सकाळी ७-०० वाजेपर्यंतच्या २४ तासात आजरा मंडल परिसरात १७ मी. मी. इतका पाऊस झाला आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर ओसरला आहे. साळगाव बंधारा वाहतुकीकरता खुला करण्यात आला आहे.


