mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


 

मुसळधार…


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालुक्यामध्ये गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने हिरण्यकेशी व चित्रा नदी दुथडी भरून वाहू लागली असून साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे. तर ठीक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

     गेले तीन दिवस तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे यावर्षी प्रथमच पाणी अडवले जात असलेल्या सर्फनाला प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चित्री, आंबेओहोळ, उचंगी प्रकल्पातील समाधानकारक पाणीसाठा होऊ लागला आहे. पावसाने जोर लावल्यामुळे भात  रोप लावण्याची कामे वेगावली आहेत.

     जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळू लागली असून वनविभागासह सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या मर्यादा स्पष्ट झाले आहेत.

आम्हाला कोणी वाली आहे की  नाही…?

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जोरदार पावसामुळे संकेश्वर – बांदा महामार्गावरील पाणी धनगरमोळा परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले असून गेले चार दिवस ही घरे पाण्यातच असून महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आम्हाला कोणी वाली आहे की नाही ? असा संतप्त सवाल धनगरमोळा परिसरातील नागरिक करू लागले आहेत.

     पाण्याच्या निच-याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरून येणारे पाणी थेट बाजूच्या घरामध्ये घुसू लागले आहे. महामार्गामुळे रस्त्याची उंची वाढली आहे तर घरे सात ते आठ फूट रस्त्याच्या तुलनेमध्ये खाली गेली आहेत. यामुळे महामार्गाच्या बाजूच्या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.

     महामार्ग प्राधिकरणाने दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे ऐन पावसात पाण्यातच राहण्याची वेळ नागरिकांना आली आहे.

महामार्ग कामाचा दर्जाविरोधात भाजपचे आंदोलन


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     संकेश्वर-बांदा महामार्गाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित करत अचानकपणे काल सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी रामतीर्थ फाटा ते व्हीक्टोरिया पुलादरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.

     या आंदोलनामुळे महामार्गाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे गेल्या चार दिवसात झालेल्या पावसाने स्पष्ट झाले आहे असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर यांनी सांगितले. याबाबत तातडीने महामार्गाच्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्याची मागणीही त्यांनी केली.

     तहसीलदार यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्यासोबत मिटिंग घेण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. काही कालावधीसाठी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, अभिजीत रांगणेकर, रुपेश पाटील, शुभम पाटील, राहुल पेंडसे, गौतम भोसले यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

कु.राहत नाईकवाडे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथील कु. राहत अनिस नाईकवाडे हिने महाराष्ट्र राज्यात पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत उर्दु माध्यमातून तिसरा क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांची ती नात आहे.


 

संबंधित पोस्ट

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews

कार मोटरसायकल अपघातात रोहन देसाई जखमी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रशीद पठाण म्हणजे स्वच्छ कारभाराचा ब्रँड

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!