mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रेकॉर्ड वरील चोरटा पोलिसांकडून जेरबंद

                    आजरा: प्रतिनिधी

       महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात अनेक चोरी प्रकरणात पोलीस रेकॉर्डवर असणारा असलम मेहबूब संनदी( वय २७ रा. गवसिद मड्डी, अथणी, कर्नाटक) या चोरट्यास जेरबंद करण्यात आजरा पोलिसांना यश आले आहे. सीमा भागातील घरफोड्यांचा उलघडा या चोरट्याकडून होण्याची शक्यता आहे.

      मंगळवारी दुपारी आरदाळ येथील सुहास पांडुरंग गुरव यांच्या घराचे कुलूप फोडताना संबंधित चोरटा संशयितरित्या आढळला. गुरव यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तो रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाला आहे.

    सीमा भागातील लहान-मोठ्या चो-यांचा उलघडा सनदी याच्या अटकेने होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


कारखान्याच्या स्विकृत संचालक पदासाठी चढाओढ


                     आजरा:प्रतिनिधी

       आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीचा धुरळा खाली बसत असतानाच आता या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला सहकार्य केलेल्या मंडळींना स्वीकृत संचालक पदाचे वेध लागले आहेत.

        राष्ट्रवादीने तालुका खरेदी विक्री संघापाठोपाठ आजरा साखर कारखान्यात घवघवीत यश मिळवल्याने बऱ्यापैकी कार्यकर्त्यांचे पुनर्वसन या दोन निवडणुकांच्या माध्यमातून झाले आहे.

         निवडणुकीची मोर्चे बांधणी करत असताना अनेक मंडळींचे सहकार्य घ्यावे लागले आहे.त्यामुळे अशा मंडळींना त्यांनी केलेल्या सहकार्याची पोहोच देण्याची गरज निर्माण झाली आहे. साहजिकच या सर्व मंडळींना स्वीकृत संचालक पदाचे वेध लागले आहेत.

        यामध्ये प्राधान्याने मोजक्या मतांनी निवडणुकीत पराभूत झालेले नामदेवराव नार्वेकर, रशीद पठाण, दिगंबर देसाई, अनिकेत कवळेकर अबूताहेर तकीलदार, सुरेश होडगे, सुरेश दोरुगडे आदींची नावे चर्चेत आहेत.


भाजपाच्या जिल्हा किसान मोर्चा सदस्यपदी जयवंत येरुडकर


                     आजरा:प्रतिनिधी

        भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा किसान मोर्चाच्या सदस्यपदी पेरणोली ता. आजरा येथील जयवंत सुरेश येरुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील व प्रदेश सचिव भगवान काटे यांनी त्यांना नियुक्ती पत्र नुकतेच दिले आहे.


गंधर्वराज पाटील याचा गौरव

                    आजरा:प्रतिनिधी

       येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी गंधर्वराज दत्तात्रय पाटील याने नॅशनल कॅडेट कोर्स (एनसीसी) अंतर्गत ‘ऑल इंडिया केरळ ट्रेकिंग कॅम्प’ यशस्वीरीत्या पूर्ण केला. कुलामाऊ, केरळ येथे झालेल्या या राष्ट्रीय कॅम्पमध्ये चार राज्यांतून ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याने ४५ किलोमीटर चालणे, छोटे-मोठे डोंगर चढणे, सांस्कृतिक या उपक्रमात यशस्वी सहभाग घेतला. त्याबद्दल त्याला प्रशस्तिपत्र व बॅच देऊन गौरवले. त्याला ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर पुनीत गोगिया, एनसीसी विभाग प्रमुख एम. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


छायावृत्त…

आजरा बस स्थानकामध्ये सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या रोपांच्या कुंड्यांची अवस्था पाहता या रोपांच्या कुंड्या की कचराकुंड्या असा प्रश्न सहजपणे पडू शकतो. त्यामुळे बस स्थानक सुशोभीकरणाला सहकार्य करायची की नाही ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


शहरामध्ये घंटागाडी फिरत असतानाही काही नागरिकांकडून घरातील निरुपयोगी साहित्य व कचरा रस्त्याच्या शेजारील गटर्सजवळ टाकला जात असल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मुलीची छेडछाड प्रकरण … तणाव निवळला.. शांतता समितीची बैठक शांतता, सुव्यवस्थेचे आवाहन…

mrityunjay mahanews

‘ तो ‘ मृतदेह हात्तीवडेतील महिलेचा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मसोलीत हत्ती… नुकसानसत्र सुरू

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!