mrityunjaymahanews
अन्य

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून…

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून

बहिरेवाडी (ता. आजरा ) येथे मनोरुग्ण मुलाकडून आई वडिलांसोबत झालेल्या वादाचे पर्यवसान आई वडिलांवर  सत्तुरने वार करण्यात होऊन यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे.आईला गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल केले आहे.आईचीही प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
कृष्णा बाबू गोरुले(वय ६०) व मुलगा सचिन (वय ३२) यांच्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात सचिन याने कृष्णा यांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. सत्तूर् च्या वाराने कृष्णा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात सचिन याने स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले होते. आई  पारुबाई या  घटनास्थळी जखमी अवस्थेत तळमळत होती तिच्यावरही सत्तूरने   वार केल्याचे समजते.

ऐन गावच्या लक्ष्मी यात्रेदरम्यान घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

सचिन हा गेली चार वर्षे मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे बहिरेवाडी ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.

……………

आजरा शहराच्या २५ कोटी ४१ लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता…

 

आजरा येथे जल्लोष

 

अशोकअण्णा चराटी यांच्या प्रयत्नांना यश


आजरा शहराच्या २५ कोटी ४१ लाख रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत सदर मान्यता मिळाली आहे.या मान्यतेनंतर आजरा शहरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला तर याकामी विशेष सहकार्य केलेल्या आमदार प्रकाश आबीटकर यांचा सत्कार नगरपंचायत व आजरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले की आजरा शहरवासीयांना अनेक दिवस नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची प्रतीक्षा होती अशोक अण्णा चराटी यांच्या माध्यमातून या योजनेचा पाठपुरावा सुरू होता आज या योजनेला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप आले आहे,. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम होऊन शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे.

आजरा शहरवासीयांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यास आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. एका सर्वसामान्य व्यक्तीला आमदार करण्यामध्ये आजरेकरांचे योगदान कदापिही विसरता येणार नाही. या कामाबरोबरच आजऱ्यामधील क्रीडा संकुल, नाट्यगृह उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण करणे ही कामेही करण्यात येत आहेत. लवकरच या कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजरा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ज्येष्ठ नगरसेवक व अण्णा-भाऊ संस्थाप्रमुख अशोक अण्णा चराटी म्हणाले ४० वर्षांपूर्वी सुरू झालेली नळ पाणीपुरवठा योजना सध्या शहराचा विस्तार वाढल्याने अपुरी ठरत असल्याने आमदार प्रकाश आबीटकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योगदानातून नवीन नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार आबीटकर हे आपल्या सोबत आहेत त्यामुळे आपणही त्यांच्या सोबत राहणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी चराटी यांच्या हस्ते आमदार आबीटकर यांचा सत्कार करण्यात आला .उपस्थितांचे स्वागत नगरसेवक विलास नाईक यांनी केले तर आभार नगरसेवक आनंदा कुंभार यांनी मानले.

कार्यक्रम प्रसंगी नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, नगरसेवक किरण कांबळे, अनिरुद्ध केसरकर, सौ. शुभदा जोशी यांच्यासह नगरसेविका, दशरथ अमृते ,विजयकुमार पाटील,विजय थोरवत, दत्तात्रय पाटील, रमेश वांगणेकर, अमानुल्ला आगलावे, इंद्रजीत देसाई यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

भाजपा बाजूला गेली तरी आपण आबीटकरांसोबतच…

आपण भाजपाचे आहोत.स्थानिक भाजपा आ.आबीटकर यांच्या पासून बाजूला गेली तरीही आपण मात्र आमदार आबीटकरांसोबत यापुढे राहणार आहोत असेही चराटी यांनी स्पष्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

                          ………

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गजरगाव येथे जुगार खेळताना आठ जण ताब्यात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!