mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि.१६ मार्च २०२५

   

बालीकेसह विवाहिता बेपत्ता

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कुंभार गल्ली आजरा येथून पावणेदोन वर्षीय बालिकेसह २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची वर्दी आजरा पोलिसात संबंधित विवाहितेच्या भावाने दिली आहे.

      इचलकरंजी येथे रहाणारी संबंधित विवाहित महिला आजरा येथे माहेरी आली होती. १४ मार्चपासून ती बेपत्ता असल्याचे वर्दीत म्हटले आहे.

खानापूर येथून तरुणी बेपत्ता

        खानापूर ता. आजरा येथून गेल्या आठ दिवसापासून २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची वर्दी संबंधित तरुणीच्या भावाने आजरा पोलिसात दिली आहे.

       आठ दिवसापूर्वी घरातून निघून गेलेली संबंधित तरुणी अद्याप घरी परतली नसल्याचे वर्दीत म्हटले आहे.

उत्तूर परिसरात पहिला पाऊस…
आजऱ्यामध्ये वातावरणच…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उत्तूर-बहिरेवाडीसह परिसरात काल दुपारी पावसाची हजेरी लागली. आजरा शहर व परिसरात मात्र दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

      उत्तूर परिसरात झालेल्या या पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. गेले दोन दिवस उष्म्यमध्ये प्रचंड वाढ व ढगाळ वातावरण अशी परिस्थिती संपूर्ण तालुकाभर आहे. काल दुपारी उत्तूर परिसरात मात्र गडगडासह पावसाने हजेरी लावली.

      आजरा शहर व परिसरात दिवसभर पावसाचे वातावरण होते परंतु पाऊस झाला नाही. उत्तूर परिसरातील पावसाने मात्र आजऱ्यासह अनेक ठिकाणचा विज पुरवठा खंडित झाला होता.

केडीसीसीच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहाय्य करू : ना.मुश्रीफ


           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मायक्रो एटीएमच्या माध्यमांतून बचत गटांना सहाय्य करू तसेच लाडक्या बहिणांना २१००/- रु. देणार असल्याचे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केले . चिमणे ता आजरा येथे श्री विठ्ठल सह. दुध संस्था चिमणे आयोजित महिला बचत गट मेळावा व के. डी. सी. सी. बँक मायक्रो ए. टी. एम. सुविधा केंद्र शुभारंभ प्रसंगी केले .अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते.

     ना.मुश्रीफ म्हणाले, महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करावा निधी कमी पडू दिला जाणार नाही.‌ के. डी. सी. सी बँकेच्या माध्यमातून सर्वांना सेवा सुविधा देऊ. 
लाडक्या बहिणींना २१००/- रुपये देण्यात येणार आहेत. जरी लाडकी बहीण या योजनेमुळे ४६ कोटीच्या उलाढालीमुळे तिजोरीवर परिणाम होत असला तरी. विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये. आपल्याला दिलेला शब्द पाळला जाईल.

     यावेळी कागल सरपंच परिषदेच्या सरचिटणीस सौ. गीतांजली पाटील यांनी महिला बचत गट व महिला सबलीकरण याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. टी. एस गडकरी यांनी बांबू लागवड काळाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.

       यावेळी व्हा. चेअरमन संतोष आजगेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, काशिनाथ तेली, दीपक देसाई, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, प्रवीण बोडके, सुनील दिवटे, एच. बी पाटील, बाबासाहेब पाटील, सुनील कांबळे, प्रशांत कांबळे, अनिकेत कोळेकर, सुधीर सावंत, शिवाजी नादवडेकर सागर तारळेकर शिवाजी तवंदकर , सुधाकर शिवणे गोविंद खेडेकर पुंडलिक गुरव, जनार्दन तारळेकर, अलका तारळेकर, दिपाली तारळेकर, हौसाबाई पाटील, गुणवंता हुंचाळे, बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ, दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      स्वागत प्रमोद तारळेकर यांनी केले .युवा उद्योजक भूषण नांदवडेकर यांनी आभार मानले.

आजपासून पेरणोलीत तुकाराम बीज

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आज रविवार दिनांक १६ मार्च २०२५ पासून पेरणोली येथे तुकाराम बीज कार्यक्रमास सुरुवात होत आहे त्यानिमित्त आज रविवारी सकाळी दहा ते बारा या कालावधीमध्ये ह भ प कृष्णा महाराज डावरे यांचे भजन व त्यानंतर दुपारी बारा वाजता बीजाचा महाप्रसाद होणार आहे.

       शुक्रवार दिनांक २१ मार्च पर्यंत दररोज विविध भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

भाजपाची आजऱ्यात संघटनात्मक बैठक…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

  भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर स व जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या उपस्थितीत आजरा तालुका भाजपाची संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (बाळ) केसरकर,जिल्हा चिटणीस सी.आर. देसाई , ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, पंचायतराज तालुका अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, किट्टवडे सरपंच लहू वाकर, खेडगे उपसरपंच प्रकाश कविटकर, सुळेरान सरपंच शशिकांत कांबळे, शैलेश मुळीक, उत्तूर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, भास्कर भाइंगडे,संदीप पाटील व  कार्यकर्ते उपस्थित होते.

        नवीन सभासद नोंदणी सह आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

पेन्शनरांचा मंगळवारी कोल्हापूर भविष्य निर्वाह कार्यालयावर धडक मोर्चा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा, गडहिंग्लज चंदगड या तालुक्यातील सर्व पेन्शनर व गिरणी कामगारांच्या वतीने कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह कार्यालयावर धडक मोर्चा मंगळवार दिनांक १८ मार्चला, काढणार असलेचे सर्व श्रमिक संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे .

       एपीएस ९५ प्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, यासाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत, प्रत्येक वेळी केंद्र शासन व राज्य शासन पेन्शन वाढ केल्याचे खोटी आश्वासने देत आहे. हक्काची वाढीव पेन्शन दिलीच पाहीजे. सध्याच्या पेन्शनरांची लूट थांबलीच पाहीजे, यासाठी फसवणूक करणारे मंत्रालय व भविष्य निर्वाह निधी अधिकारी यांना कुलूप देवून सत्कार करण्यासाठी आजरा गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील पेन्शनदारांनी आपल्या मागणीसाठी धडक मोर्चाला येण्याचे आवाहन काॅ. शांताराम पाटील, काॅ. गोपाळ गावडे व अमृत कोकितकर यांनी केले आहे.

अमृता जाधव हिची कबड्डी स्पर्धेसाठी कर्णधार व मधुरा दळवी यांची संघात निवड

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा महाविद्यालयातील खेळाडू अमृता रवींद्र जाधव व मधुरा दळवी यांची ठाणे येथे राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २२ मार्च होत आहे. इचलकरंजी येथे झालेल्या खुल्या गट महिला कब्बड्डी स्पर्धा मधून कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी महिला संघातून अमृताची जाधव व मधुरा दळवी निवड झाली आहे.

      अमृता जाधवची यापूर्वी शिवाजी विद्यापीठ महिला संघात निवड झाली होती. गोंडवाना गडचिरोली येथे झालेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव महिला कबड्डी स्पर्धेमध्ये कास्पदक मिळवले होते. गेल्या तीन वर्षापासून ती शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यातर्फे कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होत कोल्हापूर चा कबड्डी परंपरा टिकवून ठेवणे मोठा हातभार लावला आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन अमृताला राज्यस्तरीय खुलागट कबड्डी महिला संघासाठी जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचे कर्णधार पद भूषवण्याची संधी मिळाली आहे.

निधन वार्ता
अमोल येसणे

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मडीलगे ता. आजरा येथील अमोल शिवाजी येसणे ( वय ४० वर्षे ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. येसणे यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

विसर्जनाचा पहिला मान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला…

mrityunjay mahanews

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले; ‘शिवसेना’ नाव सुद्धा वापरता येणार नाही

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेद्रेवाडीत हत्ती…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!