mrityunjaymahanews
अन्य

विसर्जनाचा पहिला मान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला…

 

विसर्जनाचा पहिला मान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला


सार्वजनिक गणेश मुर्त्या विसर्जनामध्ये यावर्षीही आपली परंपरा जोपासत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ(श्री रवळनाथ मंदिर परिसर), आजरा या मंडळाने आजरा शहरामध्ये प्रथम मूर्ती विसर्जनाचा मान पटकावला.

पारंपारिक वाद्य व आतषबाजी करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात सायंकाळी सहा वाजता गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढून मूर्तीचे शिवाजीनगर घाट येथील हिरण्यकेशी नदीपात्रात विसर्जन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष किशोर म्हापसेकर, उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 त्या ‘ बिगर शेती प्रकरणांची चौकशी सुरू


आजरा तालुक्यात गेले काही दिवस चर्चेत असलेल्या बिगरशेती प्रकरणांची चौकशी अखेर महसूल विभागाकडून सुरू झाली असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे समजते.

आजरा तालुक्यामध्ये महसूल विभागातील काही मंडळींना हाताशी धरून बिगर शेती प्रकरणे करण्यात आली असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान अजयकुमार देशमुख यांनी याबाबत आपली लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी व आजरा तहसील कार्यालयास देऊन याप्रकरणी सखोल चौकशी संदर्भात दाद मागितली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेत तत्कालीन अधिकाऱ्यांसह या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने तक्रारदार देशमुख यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

प्रत्येक कागदाची शहानिशा करणार…

बेकायदेशीररित्या झालेली बिगर शेती प्रकरणे व त्यांना जोडलेली कागदपत्रे याची शहानिशा करण्याचे काम प्रशासकीय विभागाचे होते. प्रशासकीय पातळीवर अशी प्रकरणे गांभीर्याने घेतली जात नसल्याने पुढे मोठ्या अडचणी निर्माण होताना दिसतात. त्यामुळे अशा प्रकरणातील जोडलेला प्रत्येक कागद आपणाला मिळावा अशी मागणीही तक्रारदार देशमुख यांनी केली आहे.


भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळाचे आरोग्य शिबिर उत्साहात

भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळ आजरा यांच्या सहकार्याने आरोगशिबिर भरविणेत आले त्यामध्ये रोहित चंद्रकांत देसाई यांनी उच्च रक्तदाब व ब्लड शुगर इ सी जी तपासणी करून मोफत औषधे वाटप केले .
तसेच नेत्र तपासणी श्री सुदाम हरेर यांनी करून चष्मे अल्पदरात दिले त्यातील १५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शिबीर मध्ये जवळपास १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंदा वासुदेव फडके, उपाध्यक्ष उमेश पारपोलकर
व मंडळाच्या सर्व कायकर्ते च्या मदतीने हा कार्यक्रम पार पडला.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेंढारवाडीत दोन जनावरांना ‘लंपी’ ची लागण ? गडहिंग्लज उपविभाग हादरला….

mrityunjay mahanews

यरंडोळ येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

रिक्षा चालकाचा रिक्षातच हृदयविकाराने मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!