mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दिनांक १५ ऑक्टोबर २०२४

‘मृत्युंजय ‘ कारांच्या कार्याचा उचित सन्मान : ज्योतिप्रसाद सावंत

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामकरण समारंभ उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ज्या आजरा नगरीमध्ये ‘मृत्युंजय’कारांची जडणघडण झाली त्या आजरानगरीत निसर्गरम्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांचे नाव देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या साहित्यिक योगदानाचा उचित सन्मान केला आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती देणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ च्या मूर्तीदेवी पुरस्काराने गौरवलेल्या मृत्युंजय सारख्या कादंबरीचे वाचन विद्यार्थ्यांनी निश्चितच करावे असे प्रतिपादन पत्रकार व ‘मृत्युंजय’कारांचे वंशज ज्योतिप्रसाद सावंत यांनी केले.

     आजरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिवाजीराव सावंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे शासनाच्या वतीने पत्रकार सावंत यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पोवार होते.

     व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर नामकरण सोहळा पार पडला.

     यावेळी बोलताना महादेव पोवार म्हणाले, या संस्थेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी ‘मृत्युंजय’ कारांच्या गावातील व त्यांच्या नावाच्या संस्थेतून आपण प्रशिक्षित होऊन बाहेर पडलो असल्याचे अभिमानाने सांगू शकेल.मृत्युंजय,छावा,युगंधर सारख्या अजरामर कादंब-या लिहून मराठी साहित्यामध्ये शिवाजीराव सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांनी हे साहित्य निश्चितच वाचावे.

    यावेळी विजयकुमार पोवार, प्राचार्य एस.एस. देसाई, पत्रकार रणजीत कालेकर यांनीही मनोगत व्यक्त केले

      यावेळी प्रभारी प्राचार्य एस. एस. देसाई प्रभारी गटनिदेशक बी.आर. मंगल, ए. एम. शिकलगार, ए.टी. मस्करे, रणजीत पोवार, प्रदीप पटेकरी, माणिक सावंत, राजेंद्र सावंत, मानसिंग देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिल्प निदेशिका धनश्री मंगल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

    आभार प्राचार्य एस.एस.देसाई यांनी मांडले.

मृत्यूस कारणीभूत… एका विरोधात गुन्हा नोंद


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      निष्काळजीपणाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवल्याने दुचाकी वरील जखमी झालेल्या विष्णू महादेव जाधव या मलिक रे मलीग्रे येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्या प्रकरणी पोलिसात परशुराम दत्तू बुगडे रा. मलिग्रे,ता.आजरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मंगेश विष्णू जाधव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. २२ सप्टेंबर रोजी मलीग्रे फाट्यावर भैरू जाधव यांच्या शेताजवळ सदर अपघात होऊन यामध्ये विष्णू जाधव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा नुकताच मृत्यू झाला.

     पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

 

 

कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात ‘राजेश पर्व ‘

      आजरा तालुक्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून प्रचंड विकास कामे झाली असून या जि.प. मतदारसंघात नवीन ३ कोटी ६२ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याने तेथे ‘राजेश’ पर्व दिसत आहे. रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण गावांचे अंतर्गत सुशोभीकरण, ख्रिश्चन वस्त्या व स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, हायमॅक्स दिव्यांची व्यवस्था यासह विविध कामांचा समावेश आहे.

   पेद्रेवाडी येथे अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपये, कोवाडे, यमेकोंड येथील अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये तर हांदेवाडी येथील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये , उचंगी, पोश्रातवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये व बोलकेवाडी येथील जोतिबा देवालय परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये तर हुडे येतील अंतर्गत सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे.

    अल्पसंख्यांक निधी अंतर्गत सरोळी, वाटंगी येथील ख्रिश्चन समाजाच्या वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण व खानापूर येथील चर्चसमोर सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

    डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सरंबळ वाडी, श्रृंगारवाडी, किणे या गावांकरता खडीकरण व डांबरीकरणासाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे.याचबरोबर ३०/५४, ५०/५४ अंतर्गत हात्तिवडे- होनेवाडी व मेंढोली पासून यमेकोंडकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी अनुक्रमे २५ व ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत. गजरगाव येथील लखमेश्वर देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासह किणे- पोश्रातवाडी रस्त्या करता प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी तर सुळे शिरसंगी रस्त्या करता ३५ लाख शिरसिंगी – कागीनवाडी रस्त्या करता २७ लाख रुपये ,वाटंगी- शिरसिंगी रस्त्याकरता १५ लाख रुपये , कोटी लाकूडवाडी २० लाख रुपये व कीणे येथे विशेष वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

      मलीग्रे, कोवाडे, वाटंगी येथे हायमॅक्स दिवे बसवणे- प्रत्येकी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर झाल्याने या जिल्हा परिषद मतदार संघातून समाधान व्यक्त होत आहे.(जाहिरात)

गतिमा’ स्नॅक्स सेंटरचे आजऱ्यात थाटात उद्घाटन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथे ‘गतिमा’ अमृततुल्य अँड स्नॅक्स सेंटरचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.आजरा- आंबोली मार्गावर न्यायालय इमारती नजीक सुरू करण्यात आलेल्या या स्नॅक्स सेंटरमध्ये पंधरा प्रकारचा चहा, कॉफीसह एनर्जी ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, गुळाचा चहा, विविध प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध होणार असून महाविद्यालयीन युवक युतीसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आली असल्याचे सेंटरचे चालक हंबीरराव अडकुरकर यांनी स्पष्ट केले.

      यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, विजय थोरवत, संजय पाटील, दयानंद पाटील, संतोष भाटले आदींसह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

आजरा येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       श्री. मानसिंग देसाई व सौ.धनश्री देसाई यांच्या रवळनाथ इण्डेण गॅस एजन्सी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी व आरोग्याच्या समस्यांवर तात्काळ सेवा मिळावी हा या महाआरोग्य शिबिरा पाठीमागचा हेतू असल्याचे देसाई दांपत्याने स्पष्ट केले. या शिबिरामध्ये स्त्री रोग तपासणी, इसीजी,बीपी,शुगर तपासणी, त्वचारोग तपासणी, व इतर जनरल तपासणी यांसारख्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच सर्व रुग्णांना औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. सुमारे ७०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नाईक मॅडम यांनी केले. सौ. धनश्री मानसिंग देसाई यांनी प्रस्तावना केली.छ. शिवाजी नगर शारदीय नवरात्र उत्सव कमिटीचे या महाआरोग्य शिबिरास सहकार्य लाभले.

      या शिबिरामध्ये शिवसेना वैद्यकीय कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी सहभाग दर्शवला. या शिबिरास माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, शिवसेना कोल्हापूर शहर प्रमुख अमर पाटील,शिवसेना मीडिया प्रमुख विनायक जरांडे, शिवसेना कागल तालुका प्रमुख मकुभाई, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चंदगड तालुकाप्रमुख संदीप देवान, आरोग्य खात्याच्या प्रमुख डॉ.हातळगी, डॉ . रवींद्र गुरव उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडहिंग्लज तालुका प्रमुख निलेश पाटील यांचे प्रमुख सहकार्य लाभले. तसेच सी.आर.पी. च्या महिला कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

काँग्रेसच्या वाट्याला दहापैकी ‘इतक्या’ जागा ; ठाकरे, शरद पवार गटाला प्रत्येकी दोन जागा मिळणार !

        कोल्हापूर : ‘ज्या’ पक्षाचा विद्यमान आमदार, त्याच पक्षाला ती जागा,’ या सूत्रानुसार काँग्रेसला विद्यमान आमदार असलेल्या चार जागांसह ‘शिरोळ’ व ‘इचलकरंजी’ या दोन जागांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे. ‘कोल्हापूर उत्तर’साठी आग्रह धरललेल्या शिवसेना ठाकरे गटाला दोन, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दोन, असे महाविकास आघाडीतील संभाव्य जागा वाटप निश्‍चित झाले आहे.

     जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघांत काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, तर ‘महाविकास’मधील ठाकरे गट व शरद पवार गटाकडे सध्या एकही विद्यमान आमदार नाही. २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले ठाकरे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेना शिंदे गटासमवेत, तर कागलचे आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ व चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आहेत. याव्यतिरिक्त आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे व राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष असले, तरी सध्या ते महायुतीसमवेत आहेत.

     महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही ‘कोल्हापूर उत्तर’वरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘उत्तर’ची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे, त्याचप्रमाणे महायुतीतही या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक बनला आहे. शहरातील दोन्ही जागा भाजपला मिळणार नाहीत, अशी अटकळ असलेल्या भाजप नेतृत्वानेही ‘उत्तर’ शिंदे सेनेला सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

     ‘महाविकास’मध्ये विद्यमान आमदार असल्याच्या जोरावर ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असे काँग्रेस नेतृत्वाने ठरवले आहे. त्यामुळेच ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. ‘उत्तर’सह विद्यमान आमदार असलेल्या ‘करवीर’, ‘कोल्हापूर दक्षिण’ व ‘हातकणंगले’ या जागाही काँग्रेसला मिळतील. ‘इचलकरंजी’ व ‘शिरोळ’मध्ये राष्ट्रवादी शरद पवार असो किंवा शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ उमेदवारच नाही, त्यामुळे या दोन जागांचा बोनसही काँग्रेसला मिळणार आहे.

     ‘चंदगड’ व ‘कागल’ या दोन्ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला हे जवळपास निश्‍चित आहे. त्याचप्रमाणे ‘शाहूवाडी’ व ‘राधानगरी’ या दोन जागा शिवसेना ठाकरे गटाला जातील. ‘राधानगरी’ व ‘उत्तर’ सोडल्यास अन्य मतदारसंघांतील लढतीही निश्‍चित आहेत. ‘उत्तर’चा आघाडीचा उमेदवार कोण असेल, त्यावर महायुतीचा या मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहे.

..असे असेल आघाडीचे जागा वाटप….

काँग्रेस – कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी

शिवसेना ठाकरे गट – शाहूवाडी, राधानगरी

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष – कागल, चंदगड

‘उत्तर’मधून सरप्राईज चेहरा

     ‘कोल्हापूर उत्तर’मधून काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. मात्र ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या पातळीवर ऐनवेळी रिंगणात ‘सरप्राईज’ चेहरा उतरला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणेच या मतदार संघातील संभाव्य उमेदवाराचा निर्णय मंगळवारी (ता. १५) होण्याची शक्यता आहे.

बातमी सौजन्य : ऑनलाईन न्यूज

 


                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

महिलेच्या प्रसंगावधानामुळे तिघांना मिळाले जीवदान…. आजरा येथील शिवाजी नगर घाटावरील घटना…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!