mrityunjaymahanews
अन्य

जवाहर पतसंस्थेत सत्‍ताधारी पै. सुलेमानशेठ दिडबाग आघाडीची बाजी…. विरोधकांना धोबीपछाड

जवाहर’ पतसंस्थेत सत्ताधाऱ्यांची बाजी : एकतर्फी विजय मिळवत विरोधी आघाडीला धोबीपछाड

आजरा येथील मुस्लिम बांधवांची अर्थवाहिनी अशी ओळख असणाऱ्या जवाहर नागरी पतसंस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांनी बाजी मारत विरोधी जवाहर सहकारी पॅनलचा दारुण पराभव केला. या एकतर्फी विजयाने सत्ताधाऱ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आज शनिवारी ईर्षेने मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांची ने-आण करण्यासाठी चारचाकी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये जवाहर सहकार पॅनल व पै. सुलेमानसेठ दीडबाग सत्ताधारी पॅनल अशा दोन आघाड्या समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. सत्ताधारी पै.दीडबाग आघाडीतून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून समीर चांद यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. आज एकूण १३८२ पैकी ११६३ मतदार मतदानाला सामोरे गेले. सत्ताधारी सुलेमानसेठ दीडबाग आघाडीच्या पाठीशी पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अबुताहेर तकिलदार, रियाज तकीलदार, इसाक शेख, इब्राहिम शेख, मुनाफ सोनेखान, मकसूद लमतुरे सिलेमान नसरदी, जमीर लाडजी जब्बार लमतुरे, रजाक सोनेखान आदी मंडळी होती. अत्यंत चुरशीची असा गाजावाजा झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी पै. सुलेमानशेठ दिडबाग पॅनेलने मोठ्या फरकाने ९ पैकी ९ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला.

सत्ताधारी पै. सुलेमानसेठ दिडबाग आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे …कंसात पडलेली मते- तौफीक दादापीर आगा(५९८), इलियास गुलाब तकिलदार(५९७), आसिफ मुस्ताक दरवाजकर(६३८), असलम खादिर लमतूरे(६०३), इकबाल इब्राहीम शेख(६६८), आसिफ मुनाफ सोनेखान(६५३). महिला राखीव- रुकसाना सूलेमान नसरदी(६७७), शबनमबानो अकबर मुल्ला(६१४). इतर मागास प्रवर्ग- इस्माईल युसुफ बेपारी(७१४). विरोधी आघाडीच्या दिलावर चांद, अष्कर लष्करे, हसन शेख यांचा पराभव धक्कादायक समजला जातो. इतर मागास प्रवर्गातील सत्ताधारी आघाडीचे इस्माईल बेपारी यांनी सर्वात जास्त मते घेतली.

निवडणूक निकाल जाहीर होताच सत्ताधारी पॅनेलच्या समर्थकांनी जोरदार आतषबाजी करत जल्लोष केला.

……..

 

साळगाव मध्ये एकाची आत्महत्या

साळगाव (ता. आजरा) येथे तुकाराम थोरवत या ४८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .सदर प्रकार शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

थोरवत व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये  वाद सुरू होते असे साळगाव येथील नागरिकांकडून  सांगण्यात आले. या वादातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. तूर व त्यांचे मूळ गाव ठाणेवाडी (ता.भुदरगड ) असून साळगाव ही थोरवत यांची सासुरवाडी असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास आजरा पोलिस करीत आहेत.

आजऱ्यात वळीव पावसाची जोरदार सलामी…

आजरा शहरासह तालुक्यात शुक्रवारी वळीव पावसाने दणक्यात हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभरहून अधिक वेळ पडलेल्या या पावसामुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.नऊ डिसेंबर नंतर तब्बल तीन महिन्याने पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गतवर्षी पाऊस लांबल्याने मुळातच उशिरा सुरू झालेला वीटभट्टीचा व्यवसाय पावसामुळे अडचणीत आला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. पावसामुळे होन्याळी येथे वीज कोसळून नारळाचे उभे झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या झाडांची पडझड झालेली आहे. काही कालावधी करता वीजपुरवठाही खंडित झाला होता.

 

………कोवाडे  येथे आगीत  दोन लाखाचे नुकसान

मौजे कोवाडे(ता.आजरा) येथे काल सायंकाळी आकस्मीत आग लागून जोतिबा लक्ष्मण पोवार वगैरे चौघांची व लक्ष्मण आप्पा देसाई वगैरे ६ शतक-यांची काजूची झा ७० ते ७५ झाडे व तोडून ठेवलेली लाकडे जळून अंदाजे  दोन लख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. हाजगोळीत मधमाश्यांच्या हल्ल्यात दहाजण जखमी

 

मधमाशांच्या हल्ल्यात दहा जखमी

हिरण्यकेशी नदीवरील हाजगोळी बंधाऱ्याजवळ अचानकपणे मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे दहाजण जखमी झाले आहेत. आजरा ग्रामीण रुग्णालयात जखमीच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवार (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण निकम व त्यांची पत्नी विद्या (हाजगोळी बुद्धक) या दुचाकीवरून ‘आजऱ्याकडे निघाले होते. यावेळी बंधाऱ्यानजीक असलेल्या दगडी कठडयामध्ये असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यातील माश्या अचानकपणे
उठल्या. त्यांनी निकम व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्यामध्ये हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी तेथेच टाकून गावाकडे पळ काढला. याच ठिकाणी शेताकडे जाणारे व वाहनधारकांवर माश्यांनी हल्ला केला. यात गोविंद होडगे, बाळू सुतार, तुकाराम पोटे (हाजगोळी बुदुक) व गोपाळ गिलबिले (हाजगोळी खुर्द) याचबरोबर पेद्रेवाडी येथील दोन वाहनधारकही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उन्हाच्या वाढत्याा तडाख्यामुळे ठिकठिकाणी असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनीी खबरदारी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कै. केदारी रेडेकर यांचा स्मृतिदिन उत्साहात

आजरा- गडहिंग्लज तालुक्यामध्ये  कै. केदारी रेडेकर यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला रेडकर यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कै. रेडेकर संस्था समूहाच्या विविध संस्थांमध्ये कै. रेडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्था समूहाच्या प्रमुख श्रीमती अंजनाताई रेडेकर,अनिरुद्ध रेडेकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

 ‘व्यंकटराव ‘ मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन संपन्न


आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर उपाध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी यांचे  हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.. याप्रसंगी चर्चात्मक संवादात शिंपी यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या एकंदरीत शैक्षणिक कारकीर्दीवर व दूरदृष्टीवर आपले विचार मांडले.. सावित्रीबाई फुले मराठी शिक्षण प्रसारक ,समाज सुधारक महिला होत्या, महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत असे सांगितले.
त्यानंतर प्र. प्राचार्य श्री. एस. जी. खोराटे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल आपले विचार मांडले.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पी व्ही पाटील,सौ.एस.डी .इलगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.आण्‍णासो पाटील, सचिव श्री .एस. पी .कांबळे, प्रभारी प्राचार्य श्री सुरेशराव खोराटे, पर्यवेक्षक श्री राजेंद्र कुंभार, सर्व महिला शिक्षिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेकायदेशीर गाळे प्रकरणी सत्ताधारी नगरसेवकाचे उपोषण सुरू…. रामतीर्थ परिसरात लिंबुटाचन्यांचा खच…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!