mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५       

नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा भुदरगड राधानगरी तालुक्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने .१५ एस टी बसेस नवीन तिन्ही आगारामध्ये दाखल झाल्या त्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री आबीटकर यांचे हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा नियंत्रक जाधव, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील, सुधीर कुंभार, शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, शिवसेना आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, सरपंच धनंजय पाटील, संतोष भाटले, रणजीत सरदेसाई, दयानंद निऊंगरे, उपतालुका प्रमुख काका देसाई, नाथा देसाई . अनिल डोंगरे, भादवण शाखा प्रमुख श्रीकांत देवरकर व शिवसेनेचे प्रमुख मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित होते.

राहत खिदमत फाउंडेशन तर्फे मान्यवर व गुणवंतांचा सत्कार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील राहत खिदमत फाउंडेशन तर्फे मान्यवर तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रेसिडेंट आलम नाईकवाडे, सेवा निवृत्त सैनिक गजबर वंटमुरे आणि शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या इक्रा माणगावकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

      आजऱ्यातील राहत खिदमत फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक कार्य केले जातात. मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप अशी विविध सामाजिक कार्यें करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य राहत खिदमत फाउंडेशन करीत आहे. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी गजबर वंटमूरे यांचा सत्कार मौजुद माणगावकर यांच्या हस्ते तर इक्रा रिजवान माणगावकर या विद्यार्थिनीने रेहमानी ट्रस्ट संभाजीनगर यांचे मार्फत नेट सेटच्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेबद्दल करीमभाई कांडगावकर यांच्या हस्ते व अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजरा च्या प्रेसिडेंट पदी आलम नाईकवाडे यांची निवड झालेबद्दल जमीलभाई निशानदार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्र संचलन यासिन सय्यद यांनी केले. यावेळी शफिकभाई तकीलदार, युनूस जंगी, मोहसीन हेरेकर, मजीद मुल्ला, सलीम शेख, रिजवान माणगावकर, मुफ्ती खालिद खलिफ, हाफिज अब्दुलरहिमान कांडगवकर , हाफिज तौफिक काकतिकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बबलू शेख यांनी आभार मानले.

आजरा तालुका सहकार भारती कार्यकारणीच्या पदांच्या नियुक्त्या जाहीर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका कार्यकारिणीची बैठक आजरा येथे नुकतीच पार पडली. यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

      या कार्यकारणीवर श्रीपाद कुलकर्णी, श्री रमेश कारेकर, श्री महादेव खाडे (उत्तुर), मिलिंद पुजारी, सुनील मारुती पाटील (हालेवाडी), सुभाष विष्णू चौगुले ( शिरसंगी), सुरेश राजाराम आसबे (होनेवाडी), श्रीधन सुधीर कुलकर्णी आजरा, जोतिबा मुरकुटे, जयवंत सुरेश येडूरकर) (पेरणोली), सौ.दिपाली दशरथ अमृते (हाळोली), सौ. काजल संदीप कुलकर्णी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

      त्यांना कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ .अनिल देशपांडे यांचे हस्ते नियुक्तीची पत्रे देण्यात आली. अध्यक्ष डॉ . देशपांडे यांनी सर्व सदस्यांना सहकार भारतीचे कार्य व कामकाजाची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील विविध अडचणी विषयी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत कार्यकारणीचे सचिव मिलिंद पुजारी यांनी केले व आभार कार्यकारिणीचे महामंत्री श्रीपाद कुलकर्णी यांनी मानले.

निधन वार्ता
मारूती सावंत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      पेरणोली ता आजरा येथील मारूती जोती सावंत ( वय ७२ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. पेरणोली येथील पहिले नौदलातील कर्मचारी म्हणून ओळखले जात होते.

        त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, सून, नातू, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आजारा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

       यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले,महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहून भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पहिल्यांदा मांडणी केली. ते केवळ नकारात्मक मांडणी करीत राहिले नाहीत तर त्यांनी शेती, शेतकरी यांच्या विकासाची भूमिका मांडत पर्यायी विकासाचा पाया घातला. माथा ते पायथा असे नियोजन करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, गरज पडेल तिथे बाहेरून पाणी आणून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बंद पाईपने मोजून देण्याची मागणी त्यांनी पहिल्यांदा केली. जमीन पाणी नियोजनाची शास्त्रीय मांडणी पहिल्यांदा फुलेनी केली. जीवनाचे अंनी एकही क्षेत्र नसेल ज्या क्षेत्रात त्यानी काम केले नाही. साहित्य संस्कृती, शिक्षण, जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासह धर्मसुधारणा या सर्वच क्षेत्रात त्यानी अभूतपूर्व असे काम केले आहे. म्हणूनच ते आजही सर्वच चळवळीचे मार्गदर्शक आहेत.

     सुरवातीला दशरथ घुरे यांनी प्रास्ताविक केले, विष्णू पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश मोरुस्कर, सुरेश पाटील, महादेव मालव, यशवंत राणे, राखमाजी पाटील, आनंद मालव, लक्ष्मी जाधव, गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्याची नूतन अध्यक्ष निवड मंगळवार दिनांक २२ रोजी…?

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

   वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष पदाची निवड मंगळवार दिनांक २२ रोजी असल्याचे समजते.

     वसंतराव धुरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर अध्यक्षपद रिक्त आहे. अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साखर उपसंचालकांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर निवड होणार आहे. लांबलेली अध्यक्ष निवड २२ एप्रिल रोजी होणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. अध्यक्षपदासाठी जनता बँकेचे विद्यमान अध्यक्ष मुकुंदराव देसाई व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,माजी पं.स.सभापती विष्णुपंत केसरकर यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. 

      नूतन अध्यक्ष निवडीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हालेवाडीच्या सर्वोदय पतसंस्थेला ३३ लाख ७ हजाराचा ढोबळ नफा

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हालेवाडी ता.आजरा येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ३३ लाख ७ हजारांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.

     संस्थेकडे ११ कोटी ४९ लाख ९० हजाराच्या ठेवी आहेत. ७ कोटी ६ लाख २० हजारांचे कर्ज वाटप केले असल्याचे पाटील यांनी सांगितले .

       संस्थेस कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र वाढीला व गडहिंग्लज येथे शाखा सुरू करण्यास मंजूर मिळाली असून ३० एप्रिल रोजी गडहिंग्लज येथे पाचवी शाखा सुरू करण्यात येत असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

      संस्थेकडे आरटीजीएस, एनईएफटी सुविधा सुरू असून संस्थेच्या आजरा व उत्तुर शाखेत वीज बिल भरणा केंद्र सुरू आहे.यावेळी उपाध्यक्ष दीपक येसादे, संचालक अशोक पाटील, सदाशिवपाटील, विलास पाटील, रवींद्र खोराटे,महादेव आपके, मारुती घोरपडे, अरुण पाथरवट, रमेश कांबळे, सौ.रेखाताई कटाळे, सौ.शोभा येजरे मॅनेजर सुनील पन्हाळकर उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय आजरा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ग्रामीण रुग्णालय आजरा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थिताना महात्मा फुले यांच्या जीवन पट व त्यांनी केलेले स्त्री शिक्षण व बहुजनांविषयी केलेले कार्य त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा केलेला उद्धार याविषयी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी माहिती दिली.

      याप्रसंगी डॉ. सुरजित पांडव डॉ. सचिन शिंदे डॉ. स्वाती पाटील डॉ. प्राचिका धारकर डॉ.मंदिरा सातवेकर तसेच रुग्णालयातील सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.

हनुमान जयंती विशेष…

     रामतीर्थ,आजरा येथे पिंपळ्या मारुती जवळ श्री हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत.

अभिषेक,जन्मकाळ आरती व मंत्र पुष्प,भजन व दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसाद…

 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकामध्ये चराटी- शिंपी गटाचे आव्हान राष्ट्रवादीसमोर कायम

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या -२

mrityunjay mahanews

डॉ.अशोक फर्नांडिस यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!